एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून त्या माध्यमातून चांगला पैसा कमावून आपण आपले जीवन समृद्ध बनवू शकतो. रिकामे बसण्यापेक्षा केव्हाही काहीतरी गेलेले बरे या उक्तीप्रमाणे रिकामा वेळ जर असेल तर या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे आपल्या फायद्याचे ठरते. यामध्ये जर आपण महिला वर्गाचा विचार केला तर महिला वर्गाकडे बराचसा वेळ असतो.
घरचे सगळे कामे आटोपून रिकाम्या वेळेत महिलांनी जर एखादा व्यवसाय उघडला तर वेळेचा सदुपयोग देखील होईल आणि हातात पैसा देखील खेळता राहील. या दृष्टिकोनातून व्यवसायाची सुरुवात खूप महत्त्वाची ठरु शकते. अगदी याच पद्धतीने आपण जर वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये एक व्यवसाय असा आहे की तुम्ही घरबसल्या सुरू करू शकतात व त्या व्यवसायाचे नाव आहे बुटीक व्यवसाय होय. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही घरी राहून कपडे विकू शकतात व स्टायलिश कपडे डिझाईन देखील करू शकतात. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण या व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत.
बुटीक व्यवसायातील महत्त्वाचे कंगोरे
1- बुटीक व्यवसाय सुरू करायचा तर अगोदर प्लॅनिंग करा
कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना तुम्हाला त्या व्यवसायाची पूर्ण प्लॅनिंग बनवणे खूप गरजेचे असते. तुम्ही अगोदरच प्लॅनिंग सेट केली तर तुम्हाला त्या प्लॅनिंगनुसार काम करता येते. त्यामुळे या व्यवसायात देखील तुम्हाला प्लॅनिंग करताना हा व्यवसाय सुरू करण्याचे ठिकाण ठरवणे गरजेचे आहे व नेमके तुम्हाला कोणते ग्राहक टार्गेट करायचे आहेत
यावर फोकस करणे गरजेचे आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला लागणारी उपकरणे, एम्ब्रोईडरी मशीन आणि चांगल्या दर्जाचे साहित्य खरेदी करण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग तयार करणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला ऑर्डर देण्याचा दिवस आणि कोणती किंमत तुम्हाला ठेवायची हे देखील ठरवणे गरजेचे आहे. कारण या गोष्टीचा मोठा इम्पॅक्ट हा ग्राहकांच्या मागणीवर होत असतो.
2- तुमचा बजेट व्यवस्थित तयार करा– कुठलाही व्यवसाय सुरू करताना तुमचे बजेट ठरवून घेणे खूप गरजेचे आहे. अगदी त्याचप्रमाणे बुटीक व्यवसाय करता देखील तुम्हाला तुमचा बजेट व्यवस्थित पाहून त्या पद्धतीने नियोजन करावे लागेल. समजा तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला काही कामगार देखील लागतील किंवा तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने हा व्यवसायाची सुरुवात करायची असेल
तर तुम्ही राहत असलेले गाव किंवा शहर या ठिकाणच्या मागणीचा अभ्यास करून त्याप्रमाणे बजेट आणि तुमच्या व्यवसायामधील कपड्यांचे डिझाईन आणि फॅशनची निवड करणे गरजेचे आहे. समजा तुम्हाला हा व्यवसाय घरबसल्या सुरू करायचा आहे तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांची मदत घेऊन त्याची सुरुवात करू शकतात. घरात हा व्यवसाय सुरू केला तर तुमचे बजेट निम्मी कमी होते व तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही.
3- बुटीक व्यवसायातून असा मिळतो पैसा– समजा तुम्हाला भविष्यामध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारायचा आहे तर तुम्ही या करता तुमचा एक ब्रँड देखील तयार करू शकता व ग्राहकांच्या मागणीनुसार त्या पद्धतीने नियोजन करू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणे गरजेचे असून एखाद्या फॅशन मॅक्झिनमध्ये देखील तुम्ही जाहिरात देऊ शकता. तसेच ऑनलाईन माध्यमातून तुम्ही तुमच्या बुटीकमध्ये डिझाईन केलेले ड्रेस ऑनलाइन पद्धतीने देखील विकू शकतात.
तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने व्यवसायात वाढ करू शकतात. याकरिता तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पेज तयार करून तुमच्या उत्पादनाची माहिती रोज त्या पेजवर टाकून ती लोकांपर्यंत पोहोचू शकतात व लोकांना त्याची माहिती होईल व तुमची विक्री वाढण्यास देखील मदत होईल.
बुटीक व्यवसाय हा एक चांगला पैसा देणारा व्यवसाय असून उत्तम मार्केटिंग, व्यवसायाची परफेक्ट प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंग नुसारच कामाची आणि व्यवसायाची आखणी जर केली तर नक्कीच बुटीक व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगला पैसा मिळू शकतो.