White Sandal wood: एका एकरात केलेली सफेद चंदनाची लागवड 10 ते 15 वर्षात देईल कोटींचे उत्पन्न! वाचा या शेतकऱ्याचा सफेद चंदन लागवडीचा अनुभव

Published on -

White Sandal wood:- आजकाल शेतकऱ्यांचा कल हा कमीत कमी खर्चामध्ये कोणते पीक हे जास्तीत जास्त नफा देऊ शकेल याकडे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो व तसे पाहायला गेले तर ही काळाची गरजच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याकडे आपल्याला दिसून येतो.

त्या अनुषंगाने जर आपण साग लागवड किंवा बांबू लागवड आणि त्यासोबतच चंदन लागवडीचा विचार केला तर तुमच्याकडे जर एक एकर जमीन असेल व ती जमीन जर तुम्ही कसत नसाल तर तुम्ही अशा जमिनीमध्ये चंदनाची लागवड करून दहा ते बारा वर्षानंतर कोटीत उत्पन्न मिळवू शकतात हे मात्र निश्चित.

बऱ्याच शेतकऱ्यांकडे जास्त जमीन असते व ते पुरेशा प्रमाणात जमीन न करता बाकीची जमीन त्यांची पडीक असते. अशा जमिनीमध्ये काही महत्त्वाच्या झाडांची लागवड करून आपण दीर्घ कालावधीसाठी यामध्ये चांगला पैसा मिळवू शकतो. याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्ह्यातील जंगल सालीक गावातील अविनाश यादव यांचा विचार केला तर त्यांनी पांढरा चंदनाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे व एवढेच नाही तर त्यांनी पांढऱ्या चंदन लागवडीचा पाया घालण्याचे महत्त्वपूर्ण काम हे पूर्वांचल मध्ये केलेले आहे.

त्यांना या माध्यमातून दहा वर्षानंतर कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा देखील विश्वास त्यांना आहे. त्यामुळे या लेखात आपण सफेद चंदनाची लागवड व त्यातून मिळणारा नफा व अविनाश यादव यांनी कशा पद्धतीने सफेद चंदन लागवडीचे नियोजन केले याबाबतची माहिती बघणार आहोत.

 सफेद चंदनाची लागवड अशा पद्धतीने ठरते फायद्याची

अविनाश कुमार यादव यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, साधारणपणे 2012 मध्ये त्यांच्या मनात आले की सफेद चंदनाची लागवड करावी. प्रायोगिक तत्त्वावर म्हणून त्यांनी शेतामध्ये अगोदर पाच ते सात झाडे सफेद चंदनाची लावलेली होती. या माध्यमातून त्यांना समजून आले की पांढऱ्या चंदनाच्या लागवडीमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होऊ शकतो

व त्याकरताच त्यांनी 2017 ते 18 या कालावधीत कर्नाटक राज्यातून 50 पांढऱ्या चंदनाच्या रोपांची लागवड केली व त्यावेळी त्यांना दोनशे रुपये प्रतिरोप किमतीने सफेद चंदनाची रोपे मिळाले.

याविषयी त्यांनी देशातील 80 कृषी विज्ञान केंद्र आणि 25 कृषी विद्यापीठांना भेट देऊन आधुनिक शेती तंत्राची माहिती घेतली. आज या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी जे काही चंदनाची रोपटे लावलेली होती त्यांचे रूपांतर आता वृक्ष होण्याच्या दिशेने सुरू आहे.

 जास्त काळजी घेण्याची नसते गरज

जर आपण सफेद चंदनाच्या झाडांचा विचार केला तर याकरिता फारशी काळजी घेण्याची आवश्यकता नसते. लागवडीच्या पहिल्या वर्षामध्ये काही प्रकारचे विशेष काळजी घ्यावी लागते. लागवडीसाठी आवश्यक जमिनीचा विचार केला तर अगदी ओसाड असलेल्या जमिनीवर देखील त्याची लागवड करता येते.

झाडांचे संगोपन तुम्ही अगदी कमीत कमी पाण्यात देखील करू शकतात. सफेद चंदनाचे झाड साधारणपणे 18 ते 25 फूट असते व ते तयार होण्याकरिता साधारणपणे बारा ते पंधरा वर्षाचा कालावधी जायला लागतो. तसेच सुरुवातीला पांढरा चंदनाच्या वाढीसाठी आधार लागतो व त्याकरिता काही वनस्पतींची गरज भासते.

 एका एकरमध्ये पांढऱ्या चंदनाची पाचशे रोपे लावता येतात

जर तुम्हाला एका एकर क्षेत्रावर जर पांढरा चंदनाची लागवड करायची असेल तर कमीत कमी तुम्हाला पाचशे रुपयांची आवश्यकता भासते. लागवड करताना दहा फूट अंतर दोन रोपांमध्ये असणे आवश्यक आहे.

साधारणपणे तुम्हाला एका एकरात जर पांढरी चंदन लावायचे असेल तर रोप लागवडीकरिता एक लाख रुपयांचा खर्च येतो. सफेद चंदनाचा वापर औषधे तसेच साबण, अगरबत्ती तसेच जपमाळ, फर्निचर, लाकडी खेळणी, सुवासिक अत्तरे तसेच हवानाच्या वस्तू आणि परदेशात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

 एक एकर चंदन लागवडीतून मिळणार एक कोटीपर्यंत उत्पन्न

समजा तुमच्याकडे एक एकर जमीन आहे. तर यामध्ये तुम्ही चंदनाची लागवड करू शकतात. एका एकराकरीता आहे एक लाख रुपये गुंतवून तुम्ही 12 ते 15 वर्षात 60 लाख रुपयांचा नफा या माध्यमातून मिळवू शकतात. जर आपण सफेद चंदनाच्या लाकडाची किंमत पाहिली तर ती दहा ते पंधरा हजार रुपये किलो असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र 25 ते 30 हजार रुपये प्रति किलो पर्यंत असते अशी माहिती देखील अविनाश यादव यांनी दिली.

जर यामध्ये अविनाश यादव यांचा विचार केला तर  त्यांनी लागवड केलेली चंदनाची झाडे आता विकायला तयार होण्याच्या मार्गावर असून त्यातून त्यांना एक कोटी 90 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांना आहे. तसेच पांढऱ्या चंदनाच्या लागवडीकरिता विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया नाही. परंतु सफेद चंदनाचे झाड तोडण्या अगोदर मात्र वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe