EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून देशातील लाखो पीएफ धारकांना आनंदाची बातमी देण्यात आली व ती म्हणजे पीएफ खात्यावर जमा होणाऱ्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करण्यात आली व ही वाढ 0.10% सह 8.25 टक्के इतकी करण्यात आली.
याआधी कर्मचाऱ्यांना 8.15% दराने व्याजदराचा फायदा मिळत होता. आपल्याला माहित आहे की जे काही नोकरी करणारे व्यक्ती असतात त्यांचे पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होत असतात व यामध्ये कर्मचाऱ्यांची मूळ पगार व महागाई भत्त्याचे 12 टक्के इतकी रक्कम पगारातून कापली जाते व ती ईपीएफ खात्यामध्ये जमा केली जाते
व महत्वाचे म्हणजे नियोकत्याच्या माध्यमातून देखील तितकीच रक्कम ईपीएफ खात्यामध्ये जमा होते. या जमा रकमेवर व्याज मिळते व या माध्यमातून कर्मचारी पेन्शनची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करू शकतात.
परंतु आता ईपीएफ खात्यावर जमा झालेल्या रकमेवर 8.25 टक्के दराने म्हणजेच वाढीव दराने व्याज मिळणार आहे.
परंतु या वाढलेल्या व्याजदराचा चांगला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला ईपीएफ खात्यामध्ये तुमचे योगदान वाढवावे लागेल. परंतु ते कसे वाढवावे याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल. याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये अशा पद्धतीने वाढवा योगदान
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये योगदान वाढवायचे असेल तर तुम्हाला व्हॅलेंटरी प्रॉव्हिडंट फंडाचा आधार घ्यावा लागेल. यालाच आपण व्हीपीएफ असे देखील म्हणतो. कुठलाही ईपीएफओ सदस्य या हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंडांमध्ये योगदानाची सुविधा घेऊ शकतो.
याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पगार कपातीची कुठल्याही प्रकारची मर्यादा नसून यामध्ये जर कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तर तो पगाराचे शंभर टक्के योगदान देऊ शकतो. यामध्ये ज्याप्रमाणे ईपीएफमध्ये पैसे तुमच्या पगारातून कापले जातात
अगदी त्याच पद्धतीने या व्हॅलंटरी प्राइवेटंट फंड अर्थात व्हीपीएफमध्ये देखील प्रत्येक महिन्याला पगारातून ऑटोमॅटिक पैसे कापले जातात. तुम्हाला देखील तुमचे ईपीएफ खाते व्हीपीएफशी जोडायचे असेल तर याकरता तुम्ही तुमच्या एचआरची मदत घेऊ शकतात.
यासाठी एक प्रक्रिया असते. पीएफ खात्यामध्ये तुम्हाला किती योगदान द्यायचे आहे याकरिता तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो व तो तुमच्या एचआरकडे सादर करावा लागतो. त्यानंतर तुमचे व्हीपीएफ खाते ईपीएफ खात्याशी लिंक करण्याची प्रक्रिया केली जाते
व ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या व्हीपीएफ खात्यामध्ये पैसे कापण्यास सुरुवात होते. यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब अशी आहे की जर तुम्ही एकदा व्हीपीएफ खात्याची निवड केली तर त्यामध्ये कमीत कमी पाच वर्षांसाठी पैसा जमा करणे बंधनकारक असते.
व्हीपीएफ खात्याविषयी महत्त्वाची माहिती
व्हीपीएफचा लॉक इन कालावधी पाच वर्षाचा आहे व त्यानंतर तुम्ही जर पैसे काढले तर त्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही. परंतु या उलट जर तुम्ही निश्चित कालावधीच्या अगोदर जर पैसे काढले तर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स द्यावा लागतो.
व्हीपीएफ वरील व्याज आणि पैसे काढण्याची रक्कम करमुक्त आहे. एवढेच नाही तर व्हॉलंंट्री प्रॉव्हिडंट फंड अर्थात व्हीपीएफ खात्यामध्ये असलेल्या पैशांवर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा फायदा देखील मिळतो.
यामाध्यमातून तुम्ही एका आर्थिक वर्षांमध्ये तब्बल एक लाख 50 हजार रुपये पर्यंतचे कर सूट मिळवू शकतात. प्रमाणे आपण ईपीएफ खाते ट्रान्सफर करू शकतो त्याप्रमाणे व्हीपीएफ खाते देखील ट्रान्सफर करता येऊ शकते.