अकोले तालुक्यात चक्क जमिनीची झाली चोरी, शेतकऱ्याची तहसिलदाराकडे तक्रार

अकोले- तालुक्यातील धामणगाव आवारी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोरपडवाडी शिवारातील शेतकरी चंद्रभान रामभाऊ गावंडे यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा उताऱ्यावरून अचानक गायब झाला आहे. स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीचा कोणताही ठावठिकाणा न सापडल्याने गावंडे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. गावंडे यांच्या मालकीची सर्वे नंबर १३, गट क्रमांक २/१ ही जमीन त्यांच्या कुटुंबाचा … Read more

विषारी औषध टाकून घोड धरणामध्ये मासेमारी, प्रकल्प व्यवस्थापकाची पोलिसांत तक्रार

बेलवंडी- श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घोड जलाशयात काही लोकांनी विषारी औषधे आणि केमिकल टाकून मासेमारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार घोड धरणाचे व्यवस्थापक शांताराम शितोळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदा मासेमारीवर तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. … Read more

जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी आमदार विठ्ठल लंघे यांचे सरकारला आवाहन

नेवासा- तालुक्यातील जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाला आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत वाचा फोडली. सरकारने अत्यंत कमी किमतीत जमिनी घेऊनही या प्रकल्पग्रस्तांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. या लोकांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी थेट राज्य सरकारला आवाहन केले आहे. आमदार लंघे यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तर तासात हा मुद्दा उपस्थित करताना प्रकल्पग्रस्तांच्या दुरवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने … Read more

शिर्डी डिफेन्स क्लस्टरमुळे हजारोंना रोजगार ! शिर्डीतून थेट लष्करासाठी सामग्री तयार होणार

शिर्डी — साईबाबांच्या पावन भूमीत — केवळ श्रद्धेचा केंद्रबिंदू राहिलेला नाही, तर आता ती औद्योगिक आणि संरक्षण उत्पादनाच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. हा प्रकल्प केवळ संरक्षण सामग्री निर्मितीपुरता मर्यादित न राहता, परिसरातील सामाजिक, आर्थिक आणि रोजगाराच्या … Read more

AMC News आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागात शीघ्र प्रतिसाद वाहन दाखल

अहिल्यानगर – शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन नागरिकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल, असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले. दरम्यान, विधीमंडळाच्या … Read more

अहिल्यानगरमधील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार, संगमनेरसह जिल्ह्यातील तीन ठिकाणी औद्योगिक वसाहत उभा राहणार!

संगमनेर : स्वतःला जलनायक म्हणवणाऱ्यांना संगमनेरातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवता आला नाही. उलट त्यांच्या ठेकेदारांनीच पाणीपुरवठा योजनांचा निधी खिशात घातला. आता त्यांचा बंदोबस्त करणारच, असा इशारा देतानाच संगमनेरसह जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून तीन औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आणि त्या लवकरच सुरू होणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव … Read more

रेशन ई-केवायसीसाठी आज अखेरचा दिवस, आजच ई-केवायसी करा नाहीतर मोफत धान्य होणार बंद

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आज, सोमवार ३१ मार्च ही शेवटची मुदत आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी केले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार नाही, असा इशारा तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे … Read more

अवकाळी पावसाची शक्यता! गहू-कांदा पिकांवर संकट, शेतकरी चिंतेत

नेवासा- तालुक्यात सध्या सतत बदलणारे हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर अवकाळी पावसाचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू आणि कांदा या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती बळिराजाला सतावत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत आणि कोकणपट्टीत अवकाळीने हजेरी लावली होती. आता … Read more

आधुनिक सावित्री उठली पतीच्या जीवावर ; जेवणातून विष देऊन जादूटोणा करून केला जीवे मारण्याचा प्रयत्न

crime news

अहिल्यानगर : हिंदू संस्कृतीत विवाहास अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. मात्र सध्या काहीजण हे सर्व केवळ देखावा करत असल्याचे दिसत आहे. कारण एकीकडे पतीला दीर्घायुष्य … Read more

बिबट्याने नव्हे, तर प्रियकरानेच पळवले, सत्य उघड होताच गाव हादरले! राहुरी प्रकरणाचा धक्कादायक खुलासा

राहुरी : बारागाव नांदूर परिसरात एका विवाहित तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याची अफवा पसरली आणि वन विभागापासून ते प्रशासनापर्यंत सगळ्यांची धावपळ सुरू झाली. पण त्या तरुणीच्या आजूबाजूला सापडलेल्या वस्तूंवरून संशय निर्माण झाला. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सत्य समोर आले. बिबट्याचा काहीही संबंध नसून, त्या तरुणीला तिच्या प्रियकराने पळवले होते. पोलिसांनी दोघांना नेवासा हद्दीतून … Read more

श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभारण्यात येणार, एप्रिलमध्ये होणार कामाला सुरूवात

श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी मागणी गेल्या ३०-३५ वर्षांपासून सातत्याने केली जात होती. आता अखेर ही मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेहरू भाजी मार्केटच्या जागेवर बसवला जाणार असून, येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, फक्त पुतळा नव्हे, तर येथे एक भव्यदिव्य शिवसृष्टीच … Read more

तुमच्या स्वयंपाकघरात देखील प्लॅस्टिकच्या या वस्तू तर नाहीत ना ; असतील तर तात्काळ फेका बाहेर, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार

अहिल्यानगर : पूर्वी रोजच्या वापरातील बहुतांशी वस्तू या मातीपासून तयार केलेल्या असत मात्र कालांतराने बदल होत गेले अन मातीच्या भांड्याऐवजी पितळी, तांबे, लोखंड, स्टिल व आता तर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू दैनंदिन वापरात आहेत. मात्र या वस्तू मानवाच्या आरोग्यासाठी किती चांगल्या आहेत. याबाबत फारसे कोणी पाहत नाही मात्र असे प्लॅस्टिकच्या वस्तू वापरने घातक असल्याचे एका … Read more

गुढीपाडव्याचा मुहूर्त सोनेखरेदीसाठी ठरला खास, सोन्या-चांदीचे भाव वाढले तरी सराफ बाजारात ग्राहकांची झुंबड

अहिल्यानगर : गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळेच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीच्या खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी केली. नगरच्या सराफ बाजारात रविवारी २४ कॅरेट सोने ९०,८३० रुपये प्रति … Read more

मायंबा गडावर भाविकांचा महापूर: अवघ्या एका मिनिटात तब्बल शंभर भाविकांचे होत असे दर्शन

अहिल्यानगर: राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या सुगंधी उटणे लेपन विधी व कावड यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या सात लाख भाविकांनी संजीवन समाधीला जलाभिषेक करत उटणे लावले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समाधीची महापूजा व महा वस्त्रांनी समाधी झाकून यात्रोत्सवाची सांगता झाली. श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असून फाल्गुन अमावस्येला येथे कावड … Read more

वेळ वाचवायला भिजवलेली कणीक फ्रीजमध्ये ठेवताय का? हे आजार होण्याचा धोका वाढला

अहिल्यानगर – वेळ वाचवायच्या नादात बऱ्याच गृहिणी भिजवलेली कणीक फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग एक-दोन दिवसांनी त्याच्या पोळ्या करतात. पण हे आरोग्याच्या दृष्टीनं चांगलंच धोकादायक आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कारण कणीक भिजवून फ्रीजमध्ये ठेवली की काही तासांतच त्यात बॅक्टेरिया तयार होतात. आणि हे बॅक्टेरियायुक्त पदार्थ आपल्या शरीराला नुकसान करतात. फ्रीजमध्ये थंड हवा वापरली जाते, जी अन्नपदार्थ … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये सोने ९२ हजारांवर ! यानंतर भाव किती राहतील? सुवर्णकारांनी केली मोठी भविष्यवाणी

सोने हा आवडता प्रकार असला तरी आता सोने घेणे सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. अहिल्यानगरमध्ये गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला होता. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली. यामुळे सराफ व्यवसायिकांना अपेक्षीत व्यवसाय करता आली नाही, असा दावा सुवर्णकार संघटनेच्यावतीने करण्यात आला. तर सुवर्ण … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’, आजपासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता!

अहिल्यानगर : जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेष म्हणजे १ एप्रिलला वादळी वाऱ्यासोबत गारपीटही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून, लोकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले … Read more

बेलापुरात पुन्हा घरातल्या वस्तूंनी घेतला पेट, कुटुंब झाले भयभीत, नेमकं काय आहे या मागचे खरं सत्य?

श्रीरामपूर : बेलापूर खुर्द इथल्या पुजारी कुटुंबाच्या घरात गुरुवारी (दि. २७) अचानक काही वस्तूंनी पेट घेतला होता. त्यानंतर रविवारी (दि. ३०) पुन्हा असंच काहीसं घडलं. या वेळी तर त्यांच्या घरी आलेल्या भाच्याचा शर्टही पेटला. या सगळ्या गोष्टींमुळे पुजारी कुटुंब चांगलंच घाबरलंय. आता पोलिस आणि अंनिससमोर या घटनांमागचं खरं कारण शोधण्याचं मोठं आव्हान आहे. बेलापूर खुर्द … Read more