अहिल्यानगर महानगरपालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

अहिल्यानगर : महानगरपालिकेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी युनियन च्या माध्यमातून पाठपुरावा केला असल्यामुळे त्याला यश आले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्मचाऱ्यांनी देखील चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढावा. महापालिका प्रशासनाने देखील उत्पादनाची साधने शोधून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत. महापालिका संस्था ही कर्मचाऱ्यांची असून … Read more

Ahilyanagar Breaking : माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला; गंभीर जखमी,हजारो समर्थक हॉस्पिटलबाहेर..

अहिल्यानगरमधून एक मोठे वृत्त आले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला झालाय. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी … Read more

टी. एन. एस. इंडिया फाउंडेशन मुंबई अंतर्गत डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये इलेक्ट्रिक वाहन प्रशिक्षण सुरू

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआय, एमआयडीसी अहिल्यानगर या संस्थेचा टी. एन. एस. इंडिया फाउंडेशन सोबत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सामंजस्य करार झाला आहे. टी. एन. एस. इंडिया फाउंडेशन “कॅम्पस टू इंडस्ट्रियल करिअर्स” या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना चांगले करिअर पर्याय निवडण्यासाठी आणि एक मजबूत करिअर मार्ग तयार करण्यासाठी परिवर्तन कार्यबल तयारी कौशल्य प्रशिक्षण प्रदान करते. हा कार्यक्रम … Read more

Home Loan घेण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ सरकारी बँकांचा पर्याय तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ! वाचा….

Home Loan

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे होम लोन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान जर तुम्हीही स्वप्नातील घराच्या निर्मितीसाठी गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष फायद्याची ठरणार आहे. कारण की आज आपण सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या टॉप 3 सरकारी बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. … Read more

कळसुबाई शिखरावर ‘फक्त ५ मिनिटात’ पोहचणार तीस वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

Kalsubai Peak And Harishchandragad Ropeway : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड ही दोन प्रसिद्ध ठिकाणे पर्यटक आणि दुर्गप्रेमींच्या आवडीची आहेत. आता या दोन्ही ठिकाणी रोपवे उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. राज्य सरकारने ‘पर्वतमाला’ योजने अंतर्गत ४५ रोपवे प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यात कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. अहिल्यानगर … Read more

अहिल्यानगरचा औद्योगिक नकाशा बदलणार ! हजारो तरुणांना रोजगाराची संधी 1039 कोटींच्या प्रकल्पाला कॅबिनेटची मंजूरी

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सिलोन बेव्हरेज ही नावाजलेली कंपनी सुपा एमआयडीसी परिसरात १०३९ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्याला आर्थिक चालना तर मिळेलच, पण स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. या भागात आधीपासूनच काही मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत, आणि आता सिलोन … Read more

पाथर्डी तहसील कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पाथर्डी- तालुक्यातील तहसील कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या कामासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला “तुझं काम करून देतो” असं सांगून मोटारसायकलवर बसवत एका व्यक्तीने तिला वनदेव परिसरात नेलं आणि तिथे तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या प्रकरणी मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी जांभळी गावातील … Read more

अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! जिल्हा बँकेनं पीक कर्जाची रक्कम एकरी एवढ्या हजारांनी वाढवली

अहिल्यानगर- अहिल्यानगरातून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत २०२५-२६ या वर्षासाठी खरीप आणि रब्बी हंगामातील बाजरी आणि ज्वारीच्या पिकांसाठीचं पीक कर्ज एकरी दहा हजारांनी वाढवण्यात आलं. यापूर्वी हे कर्ज एकरी ३०,००० रुपये होतं, आता … Read more

Ram Shinde : कोणामुळे वाचले सभापती राम शिंदेंचे सभापतीपद ?

Ram Shinde News

विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती राम शिंदे यांच्या बाजूने विरोधी पक्षांनीच पाठिंबा दर्शवला आहे. त्यांना पदावरून हटवण्यासाठी 19 मार्च 2025 रोजी विरोधकांनी मांडलेला प्रस्ताव अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अचानक मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे विधान परिषदेत एक नवीन वातावरण निर्माण झाले असून, सभापतींच्या पदावरील त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री … Read more

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांचे घेता येणार दर्शन, १० ते २६ एप्रिलपर्यंत साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन!

शिर्डी- शिर्डी हे साईबाबांचं पवित्र तीर्थक्षेत्र देशभरातील करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. पण काहींना ही संधी मिळत नाही. अशा भाविकांच्या मागणीनुसार, साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्याची विनंती शिर्डी साईबाबा संस्थानला करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत संस्थानने यंदा १० एप्रिल ते २६ एप्रिल … Read more

सभापती राम शिंदे यांना मोठा दिलासा, विरोधकांनी अविश्वास ठराव घेतला मागे! नेमके काय आहे कारण?

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला अविश्वास ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २६ मार्च रोजी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचं पत्र सभापतींना सादर केलं. या निर्णयामुळे सभागृहात काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा संवादाचं वातावरण दिसू … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘त्या’ पोस्टमुळे आमदार सत्यजित तांबे सोशल मीडियावर ट्रोल !

अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी संगमनेरच्या मालपाणी उद्योग समूहाचे गिरीषभाऊ मालपाणी यांची कन्या दिव्या आणि नागपूरच्या नवभारत माध्यम समूहाचे निमीषजी माहेश्वरी यांचे पुत्र राघव यांच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित राहिल्याचे नमूद केले.   त्यांनी लिहिले, “महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांसमवेत उपस्थित राहिलो. नवविवाहित … Read more

पापड-कुरडई ते चकली, उन्हाळ्यात गावाकडच्या महिलांची वाळवणाची लगबग!

उन्हाळा आला की गावागावांत एक वेगळीच चैतन्यता येते. हवेत कच्च्या कैरीचा दरवळ, पिकलेल्या आंब्याचा गोड सुगंध, मोगरा-बकुळीची मादकता आणि घराघरांतून येणारा गव्हाच्या चिकाचा खमंग वास यामुळे सगळीकडे उत्साह संचारतो. उन्हाळा आणि वाळवण ही जोडी तर पूर्वीपासूनच गावाकडच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजही ग्रामीण भागात ही परंपरा कायम आहे. पुढच्या वर्षासाठी साठवणूक म्हणून महिलांची या काळात … Read more

पाथर्डी तालुक्यात दुचाकी आणि आयशर टेम्पोच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू

पाथर्डी- तालुक्यातील मोहटे गावात एक भीषण अपघात घडला, ज्याने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. बुधवारी सकाळी पाथर्डी-बीड राज्य महामार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार शेषराव परमेश्वर सानप (वय ३४, रा. आनंदगाव, ता. शिरूर, जि. बीड) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, सानप यांना संभाळायची संधीच मिळाली … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ सहापदरी महामार्ग आता आठपदरी बनवला जाणार ! कसा आहे रूट ? पहा…..

Maharashtra New Expressway : गेल्या एक-दीड दशकाच्या काळात महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत भासते. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग तर मोठ्या प्रमाणात बनवले जातच आहेत शिवाय ग्रामीण भागातील रस्ते सुद्धा आता अधिक छान झाले आहेत. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करोडो रुपयांची तरतूद करून … Read more

दुष्काळी तालुक्यात जन्म घेणं हा गुन्हा आहे का? आमदार दाते यांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल

पारनेर – “दुष्काळी तालुक्यात जन्म घेतला म्हणून आम्ही काय पाप केलं का?” असा सवाल आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत विचारला. पारनेर तालुक्यावर निसर्गाची कायमच अवकृपा राहिली आहे. दुष्काळी तालुका म्हणून आम्हाला ओळखलं जातं. गेल्या पन्नास वर्षांपासून इथले शेतकरी शेतीसाठी पाण्याचा संघर्ष करत आहेत. पण दुसरीकडे सांगली, सातारा, सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपये खर्चून उपसा जलसिंचन … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित म्हशींच्या बाजाराला झाली सुरूवात

शिर्डी :सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी बाजार समितीला राज्यात वेगळं स्थान मिळवून देत आहे. नव्याने सुरू झालेल्या म्हैस बाजारामुळे परिसरातील म्हैस पालक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी सांगितलं. … Read more

अहिल्यानगरात अतुल शहा यांचं मार्गदर्शन, शुध्द शाकाहार घेतल्यास आजारही आपल्यापासून दूर राहतात!

अहिल्यानगर – निसर्गाच्या जवळ राहून जर आपण शुध्द शाकाहारी आहार घेतला, तर कोणताही आजार आपल्या आसपासही फिरकणार नाही, असं मुंबईचे अतुल शहा यांनी आपल्या अनुभवातून सांगितलं. त्यांच्या या व्याख्यानाने उपस्थितांना निरोगी जीवन आणि रोगमुक्तीचा एक नवा दृष्टिकोन दिला आणि सगळेच मंत्रमुग्ध झाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीदिन आणि १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त … Read more