कपाशीची पूर्व हंगामी लागवड करु नका
अकोला : कपाशी पिकावर शेंद्री (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. अकोला जिल्ह्यामध्ये १.६० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम २०२० मध्ये कपाशी पिकाचे लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले असून त्यापैकी ७०% कोरडवाहू व ३०% ओलित क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पॅकेटसचे आवंटन दिले आहे. … Read more