चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

मुंबई दि.२८:- राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढत आहेत. … Read more

‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त … Read more

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि.28 : पुणे विभागातील 243  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1  हजार 563  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1  हजार 231  आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 89  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 53  रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 1 हजार … Read more

ऑनलाइन दीक्षान्त समारोह घेणारे दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत देशातील पहिले विद्यापीठ

वर्धा, दि 28 (जिमाका) : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. तसेच सार्वत्रिक कार्यक्रम आयोजित करण्यावर सुद्धा बंदी आहे. अशा परिस्थितीत डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य उपयोग करीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन दीक्षा देणारे वर्ध्यातील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. Maha Info Corona Website विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पदवी व … Read more

सुनेने दिला सासूच्या पार्थिवाला अग्निडाग !

संगमनेर :- येथील प्रसिद्ध वकील प्रदीप मालपाणी यांच्या मातोश्री व वकील ज्योती मालपाणी यांच्या सासू माजी मुख्याध्यापिका सरोजदेवी राजेंद्र मालपाणी (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी डाग त्यांच्या स्नुषा ज्योती यांनी दिला. मालपाणी परिवाराच्या वतीने दशक्रियाविधी, अकरावा, बारावा आदी विधींना फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मोठी रक्कम दिली आहे. या उपक्रमाचे अनेकांनी याचे … Read more

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी टिकटॉक कंपनीकडून ५ कोटींची मदत

मुंबई दि. २८:  टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि)  कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले आहेत. टिकटॉक इंडियाचे प्रमुख … Read more

शेकडो लोकांना तृप्त करणारी.. शिवभोजन थाळी

जगभरात कोरोना अर्थात कोविड 19 या संसर्गजन्य विषाणूने हाहाकार माजवला आहे. सगळे जग हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसरत करत आहे. सगळे उद्योग, व्यवसाय नाईलाजास्तव बंद करावे लागले. सगळीकडे रस्त्यावरची चाकं थांबली तशी औद्योगिक नगरीतलीही चाके थांबली…  हातावर पोट असणाऱ्यांची मात्र अबाळ झाली नाही…  त्यांच्यासाठी शिवभोजन योजना खूप लाभदायी ठरत आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून रोज शेकडो … Read more

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय उद्यापासून दोन दिवस बंद

मुंबई, दि. २८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट … Read more

लॉकडाऊनमध्ये पोलीस उपनिरीक्षक मुलीचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा !

अहमदनगर Live24  :- लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे किरण वसंत निंभोरे आणि पोलीस उपनिरीक्षक राणी वाल्मिक डफळ या दोघांचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा नुकताच घोटवी गावी घरामध्ये पार पडला. सुमारे वर्षभरापूर्वी ठरलेल्या या विवाहासाठी अपेक्षित असणारा खर्च पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सुमारे दोन … Read more

अखेर बालयोद्ध्यानं करोना चक्रव्यूह भेदलं…!

रायगडमधील उरण तालुक्यातील जासई येथे आई सुजादेवी आणि वडील गोविंद कुमार यांच्याबरोबर राहणारं अवघ्या 18 महिन्यांचं बाळ, नाव अम्रित गोविंद कुमार निषाद. दि. 12 एप्रिल रोजी या बाळाला ताप आल्याचं निमित्त झालं. आई-वडिलांनी जासईतल्या संजीवनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासून दि.13 एप्रिल रोजी उरणच्या ग्रामीण रुग्णालयाला पाठविले. येथील शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली, बाळाला … Read more

बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई दि २८: उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली. या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्या रितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलंद … Read more

खबरदार सोशल डिस्टन्स मोडाल तर ! पोलीस ठेवणार ड्रोनद्वारे नजर

श्रीरामपूर : सोशल डिस्टन्सच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या सबबी सांगून काही व्यक्ती, संस्था नियम मोडत आहेत. त्यांच्यावर लवकरच दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली. शिवाजी चौकात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. देशांमध्ये कोरोना बाधिताची संख्या … Read more

‘पॉझेटिव्ह ते निगेटिव्ह’ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसह संपूर्ण प्रशासन या आपात्कालीन परिस्थितीत अतिशय संवेदनशीलपणे काम करीत आहे. तरीसुद्धा भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. शासकीय वैद्यकीय … Read more

बचतगटांच्या ‘मास्क’चे सुरक्षा कवच

अमरावती २८ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क उपयुक्त ठरत आहेत.  मास्कची मागणी पाहता लॉकडाऊनच्या काळात अमरावतीतील १३ बचतगटांनी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बचतगटांनी बनविलेले मास्क आरोग्य क्षेत्रात सेवेत असणाऱ्यांसोबतच सफाई कामगारांनाही सुरक्षा देत आहेत. दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत अमरावतीतील 13 महिला बचतगटांचा … Read more

राज्यात ६७ लाख १४ हजार ७४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई .दि. 28 :-  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांना या योजनेमधून … Read more

कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथिल करा

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड 1 जून 2018 पासून नुतणीकरण करण्यात आलेले नाही. यातील अनेक बांधकाम कामगारांनी नोंदणी कार्ड नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतू यवतमाळ जिल्ह्यात गत वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकांची आचारसंहिता आणि आता कोरोनाचा संसर्ग यामुळे या कार्डांचे नूतनीकरण करण्याचे राहिले … Read more

रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन

मुंबई, दि. 28: कोरोना  विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक  वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे  शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना संपर्क करता येईल. 1)    निशुल्क क्रमांक -1800224950 2)   बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरिता )-1967 3)   022-23720582 4)   022-23722970 5)   022-23722483 6)   022-23721912 (खालील क्रमांक … Read more

कोरोना टेस्टिंग लॅबचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला फायदा

नाशिक, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेली स्वॅब तपासणी लॅबचे काम आजपासून सुरु झाले आहे. कोरोनाची प्राथमिक तपासणी या लॅबच्या माध्यमातून होणार असून त्यामुळे रुग्णांचे निदान तात्काळ होऊन पुढील निर्णय घेणे सहज शक्य होणार आहे. या लॅबच्या माध्यमातून दिवसाला 180 नमुने तपासणी होणार असून दुसरे यंत्रही लवकरच … Read more