संचारबंदीत ‘असा’झाला भाजपच्या तालुकाध्यक्षांचा विवाह सोहळा !

अहमदनगर Live24 :- लग्नपत्रिका छापून झाल्या होत्या, १९ एप्रिल लग्नाची तारीख होती, मात्र २१ मार्चपासून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांना त्यांचा शुभविवाह घरातच साजरा करावा लागला. संचारबंदीचे नियम पाळून गर्दी न करता, अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत मास्क लावून आणि सुरक्षित अंतर ठेवून हा विवाह … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित १७ अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा … Read more

मंत्रिमंडळ निर्णय

कोरोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली असून दुधाची विक्री १७ लाख लिटरने कमी झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून २ महिन्यांकरिता ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर दुध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे … Read more

पीक संरचनेत बदल करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. २७ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्याची अर्थव्यवस्था केवळ शेतीपूरक उपाययोजनांवर टिकणारी असणार आहे. त्यामुळे या परिस्थितीत पीक रचनेतील बदल व शेतीपूरक व्यवसायाला पूरक अशा उपाययोजना शेतकऱ्यांसाठी तयार करण्याची सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय … Read more

टाळेबंदीपूर्वी खरेदी केलेल्या वनोपजावरील व्याज व शिक्षार्थ जमीन भाडे माफ

मुंबई दि. 27 : –  सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात 24 मार्च 2020 पासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काष्ठ व्यापाऱ्यांना विहित कालावधीत त्यांनी खरेदी केलेला माल (वनोपज) शासकीय आगारातून हलविणे तसेच विभागातील कर्मचाऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीमुळे आवश्यक त्या परवानग्या घेणेही शक्य होत नाही. म्हणून काष्ठ व्यापाऱ्यांनी टाळेबंदीपूर्वी (24 मार्च 2020 पूर्वी ) खरेदी केलेल्या … Read more

ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवण्यावर भर द्या – केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख डॉ. गडपाले

सोलापूर दि.२७ – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्व्हेक्षण, तपासणी (ट्रेसिंग) आणि वैद्यकीय चाचणी (टेस्टींग) करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा आरोग्य सेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. ए. के. गडपाले यांनी आज येथे दिल्या. डॉ. गडपाले यांच्या नेतृत्वाखालील पथक आज सोलापूर शहरातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी … Read more

नागपुरात मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज

नागपुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरेना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘मेडिकल’ ने पुढाकार घेतला असून तिथे  असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला 220 खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रविवार 26 एप्रिल पासून  हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू झाले आहे. ट्रॉमा … Read more

कोरोनाबाधित महिलांच्या बाळांसाठी ‘मिल्क बँक’

आईला कोरोना झाला तर बाळाला आईजवळ जाता येत नाही. परंतु ही अडचण काही अंशी ससून हॉस्पिटलमधील मिल्क बँकेमुळे दूर झाली आहे. पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे  ‘ससून’ हे नामांकित हॉस्पिटल आहे. तुरुंगातील बंदिवानांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार पद्धती असो की, ज्या बाळांना आईपासून दूध मिळत नाही अशांसाठी मिल्क बँक उपक्रम  असो. या रुग्णालयाने नवनवीन प्रयोग करुन … Read more

कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत

मुंबई, दि. 27 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी होऊन राज्यातील असे अनेक … Read more

पुण्यात कोरोना प्रतिबंधासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. २७ :-  पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत … Read more

विविध सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतन कपात करु नका

सातारा दि. २७ : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबर बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही  परिणाम झाला आहे.  सहकारी बँकांनी तसेच पतसंस्थानी, विविध सहकारी संस्थांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये त्यांना किमान वेतन द्यावे, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले … Read more

सोशल डिस्टन्सिंगचे लोकल रेशनिंग

नाशिक दि. 27 (जिमाका, वृत्तसेवा) : घरातील टाकाऊ पाईप आणि भोंगा एकमेकाला जोडलेला… तराजूजवळ भोंग्याचे तोंड तर त्याला जोडलेल्या पाईपाचे दुसरे तोंड ग्राहकाच्या पिशवीजवळ…सगळ्यांना उभे राहण्यासाठी रिंगण…शांततेत होत असलेले धान्य वितरण… सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे पालन करीत स्वस्त धान्य दुकानाबाहेरचे हे चित्र आहे इगतपुरी तालुक्यातील मानवेढे या अतिदुर्गम गावातील. महिला रेशन दुकानदार पौर्णिमा भागडे यांनी ही अनोखी … Read more

कोरोना उपचाराची सज्जता : १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत

मुंबई, दि. २७: राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किट्स तर २ लाख ८२ हजार … Read more

‘साहब… आपने हमारी बहोत खिदमत की..’!

बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोनाबाधित होने के बाद हमे यहा लाया गया… यहा पे हमारी अच्छी खिदमद की गई..अल्लाह की दुआँसे आज सब ठिक हुआ.. यहॉ के डॉक्टर्स, स्टाफ ने हमारी बहोत खिदमद की.. डॉक्टर साहब ने भी हमे हमारा बहोत ख्याल रखा.. पुरा मुल्क इस बिमारी से मुक्त हो जायगा.. अशा भावना कोरोनातून वाचलेल्या … Read more

कोरोनामुक्त झालेल्या सहा नागरिकांना आज सुटी

नागपूर, दि. २७ :  कोरोनाबाधित सहा नागरिकांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी उपचारानंतर तसेच त्यांच्या दोन्ही तपासणीमध्ये कोरोना विषाणू आढळून न आल्याने आज सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्याने टाळ्या वाजवून निरोप दिला. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये जबलपूरचे चार, संतरजीपुरा व कामठी येथील सहा नागरिकांना 12 एप्रिल रोजी तपासणीमध्ये कोरोना … Read more

डाकिया ‘कॅश’ लाया!

अकोला,दि. २७ (जिमाका) – गावगाड्यातल्या दैनंदिन जीवनाशी एकरुप झालेला हा ‘डाकिया अर्थात पोस्टमन’  हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  ई-मेल, व्हॉट्स ॲप, फेसबुक या संदेशवहन सुविधांच्या गजबजाटात  काहीचा मागे पडला होता. पण ‘लॉक डाऊन’च्या काळात पोस्टमनची गावगाड्याशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली गेली आहे. डाकिया आता टपालासोबत  ‘कॅश’ आणि गरजेच्या वस्तूही आणू लागलाय. याला निमित्त ठरलंय ते  लॉक … Read more

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ मिळणार

मुंबई, दि. 27 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागासाठी तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांचा आगाऊ (ॲडव्हान्स) निधी आज तातडीने वितरित करण्यात आला. कोरोनामुळे उत्पन्नात घट असतानाही समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार … Read more

व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे खरीप हंगाम तयारीचा आढावा

शिर्डी, दि. २७ : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांचे नियोजन, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींच्या पूर्वतयारीचा आढावा महसूलमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री महसूल मंत्री थोरात यांनी घेतलेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये … Read more