पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी

मुंबई, दि.२२ : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८ ते १० तासात  पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही. या घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेसबुक द्वारे संवाद साधून केले आहे. ही घटना घडलेली जागा दुर्गम … Read more

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल

मुंबई, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन … Read more

जाणून घ्या कोरोना व्हायरसची राज्यातील स्थिती आणि तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ … Read more

‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात विलगीकरणानेच मिळेल विजय

नागपूर, दि.22 :  नागपूर शहर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सेवा असतानाही राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर शहर आणि विभागातही कोरोना रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे. हे येथील सतर्क प्रशासकीय यंत्रणा, लॉकडाऊनदरम्यान लोकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवून दिलेली साथ यामुळेच शक्य झाले. यापुढेही लॉकडाऊनला प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने घेतले तर नागपूर विभागातील साखळी लवकरच तुटेल. विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर मध्ये डिझेल विक्री वेळात बदल

अहमदनगर Live24 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्ह्यातील  कॅन्‍टोंमेन्‍ट झोन  वगळता जिल्ह्यात सार्वजनिक सोयीसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल पंपावरील डिझेल विक्रीची वेळ वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. अहमदनगर जिल्‍ह्याच्‍या महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये डिझेल विक्रीची वेळ आता सकाळी 5 ते सायं 5 वाजेपर्यंत निश्चित करण्‍यात आली आहे. तसेच पेट्रोल विक्री पूर्वीप्रमाणेच दररोज सकाळी … Read more

सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात…

9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शासन व प्रशासन स्तरावर चिंतेची बाब निर्माण झाली होती. दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशांमुळे लागण पसरल्याचे लक्षात येताच, त्या प्रवाशांकडून कुठपर्यंत संसर्ग पोहोचला, याचा विद्युतगतीने शोध घेण्यास सुरुवात केली. विभागीय आयुक्त म्हणून डॉ.दीपक म्हैसेकर यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन … Read more

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

मुंबई, दि. 21 : परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवाराकेंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात.  जर ३० एप्रिल नंतर १५ … Read more

कौतुकास्पद : महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची मुलगी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रुग्णसेवेत…!

अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या भयंकर संकटात मुलगा अमेरिकेत आणि मुलगी टाटा हॉस्पिटल च्या कॅन्सर वार्डमध्ये काम करते अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्याच्या जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. संपूर्ण जगात कोरोना चा हैदोस सुरू आहे.भारतातही कोरोनाचे पेशंट थोड्या प्रमाणात का होईना वाढत आहेत. महाराष्ट्रात तीच … Read more

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय मुंबईत उतरणार

मुंबई, दि 22 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने  काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या … Read more

डॉक्टरची IDEA : कोरोना टाळण्यासाठी बनवले असे यंत्र ज्याने स्पर्श न करता हात धुता येतात !

अहमदनगर Live24 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसाठी व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टिने सुरक्षितेसाठी विशेष यंत्रणा बनवली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझर किंवा नळाच्या पाण्यानं हात स्वच्छ करतो. पण त्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझरची बाटली आणि नळाला हात लावतो. त्यामुळं संसर्ग होण्याची … Read more

ग्रामीण भागातील जनतेने मनरेगाच्या रोजंदारीचा लाभ घ्यावा

मुंबई, दि. 21 : टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले असून शेतकरी , शेतमजूर व ग्रामीण जनतेने  शासनाच्या योजनेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपानराव भुमरे यांनी केले आहे. शासनाने सोशल … Read more

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

मुंबई, दि. 22 : कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनासमवेतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती समाज माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फॉरवर्ड केली जात आहे. … Read more

लॉकडाऊन काळात कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६३ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.२२ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६२ हजार ९८७ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३ हजार ८६९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४४ हजार १३५ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत … Read more

स्थलांतरित आणि गरीबांना अन्नधान्य वाटप करण्याची परवानगी द्या

मुंबई,  दि. 22 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित बेघर कामगार, मजूर, गरीब व गरजू नागरिक राज्यात विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे. या नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नसल्याने राज्य सरकारकडून अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर बचत झालेले 5 टक्के धान्य या नागरिकांना सवलतीच्या दरात वाटप करण्याची परवानगी … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी

मुंबई, दि. २२ : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोविड-१९ विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर … Read more

गारपीट व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

मुंबई, दि. 22 : एप्रिल 2020 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना आज मंत्रालयातून निर्गमित करण्यात आले. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आपत्ती काळात मदत व्हावी, याकरिता राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट

अहमदनगर Live24 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधित्तांचा १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 22 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या आठवडा अखेरीस सुरु होत असलेल्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज, तरावीह पठण, इफ्तार, धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. देशवासियांची एकजूटच कोरोनाविरुद्धच्या लढाईत विजय … Read more