स्वतःला फकीर म्हणवून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांची संपत्ती तब्बल…

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अपक्ष म्हणून नीलेश लंके यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी निवडणूक अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे दाखल केले. निलेश लंके यांनी गेल्या महिन्यात आ.विजय औटी यांच्या विरोधात बोलताना ‘मी फकीर आहे, माझे बँकेत खाते ही नसल्याचे वक्तव्य केले होते, मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर त्यांची खरी संपत्ती समोर आली आहे. लंके … Read more

पालकमंत्री शिंदेच्या मतदारसंघात पवार ‘पॉवर’ पुढे विखे पाटीलही हतबल !

कर्जत :- विधानसभा निवडणुका जाहिर होण्या आगोदरच कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांचा वावर जास्त वाढल्याने मतदारसंघ अधिक चर्चेत आलाय . आता तर राज्यातील वजनदार पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात पवार घराण्याने दंड थोपटल्यामुऴे हा मतदारसंघ अधिक हॉट झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी  दहा वर्षात स्वत:ची अशी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली नसल्याने त्यांची मदार आता खा. … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सन १९६२ पासूनच्या १२ निवडणूकांचा इतिहास

एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सन १९६२ मध्ये महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक झाली. एकूण २६४ विधानसभा मतदार संघापैकी अनुसूचित जातीसाठी ३३ आणि अनुसुचित जमातीसाठी १४ मतदार संघ राखीव होते. अनुसूचित जातीच्या ३३ मतदार संघापैकी श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. १९६२, १९६७ आणि १९७२ च्या विधान सभेच्या निवडणुकीसाठी हा मतदार … Read more

फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या प्रथम क्रमांक

प्रवरानगर दि २ आक्टोंबर २०१९ – नुकत्याच कोळपेवाडी येथे पार पडलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ वर्षें वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या या संघाने फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून या संघाची राज्यस्तरावर निवड झाली असल्याची माहिती संचालिका सौ.लीलावती … Read more

कॉंग्रेस सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना 5000 मासिक भत्ता : सत्यजित तांबे

मुंबई : बेरोजगारी हा सामाजिक प्रश्न असून युवकांची होणारी सामाजिक कुचंबना, महागाई, वाढीव शुल्क यामुळे पालकांवरील अवलंबित्व लक्षात घेता, राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याच्या किमान 02 वर्षेपर्यंत दरमहा 5000 रु. बेरोजगार भत्ता देण्याचे आमच्या सरकारचे धोरण असेल असेही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले. सरकारी पद भरतीचा विषय राज्यभर तापलेला … Read more

समोरासमोर येऊन चर्चा करा – आ.संग्राम जगताप

नगर : ‘निवडणुका सुरु झाल्या आहेत. विरोधक भावनिक आरोप व आवाहन, जाती-पातीचे राजकारण करण्याबरोबरच खोटे आरोप करून तेढ निर्माण करतील. मात्र, खोटे आरोप व जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान आहे, समोरासमोर येऊन चर्चा करा, मग पाहू कोण किती खरे आहे ते. यासाठी कधीही व कोठेही बोलवा मी तयार आहे,’ असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी … Read more

पालकमंत्री राम शिंदेसह माजी मंत्री पाचपुतेंनी भरला अर्ज

नगर : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात मंगळवारी एकूण सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारअखेर एकूण १७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून तब्बल ११३ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. मंगळवारी … Read more

नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार

नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली. ‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने … Read more

महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात गुन्हा

संगमनेर: महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोबर) सकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. या वेळी शिवसेनेची एक महिला पदाधिकारी या कार्यक्रमासाठी येत असताना जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी महिला पदाधिकारी येत असल्याचे अरगडे यांना सांगितले, … Read more

भाजपच्या यादीत नाव येताच आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केले हे काम !

नेवासे :- भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच नेवासे तालुक्यातील अनेक गावांत भाजप, सेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला. मुरकुटे यांनी फेरी काढत देवदर्शन घेतले. भाजपची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित, अशी परिस्थिती असताना नेवासे तालुक्यात संदिग्ध वातावरण होते. आमदार मुरकुटे यांना नाकारत भाजपचे तिकीट बदलले … Read more

अनिल राठोड यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला येणार !

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेत प्रवेशाबद्दलच्या काही अफवा होत्या, पण त्यात काहीच तथ्य नव्हते, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म आणल्यानंतर उपनेते राठोड यांचे केडगावकरांनी रंगोली चौकात स्वागत केले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, अंगत महानोर, नगरसेवक आमोल येवले, विजय पठारे, सुनील सातपुते, आबा सातपुते,पप्पू ठुबे, … Read more

नगर मध्ये रंगणार भैय्या VS भैय्या लढत

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदारसंघात मागील २०१४च्या निवडणुकीतही या दोन्ही भय्यांमध्येच प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मते विभागली गेली, व त्याचा फायदा जगतापांना झाला. २५ वर्षे आमदारकी केल्यानंतर राठोडांचा त्यावेळी पराभव झाला. या पार्श्वभूमीवर यंदा युती व आघाडी … Read more

मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक डॉ. किरण लहामटेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघात मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अकोले तालुक्यातील जनतेचा कौल जाणून घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. डॉ. लहामटे … Read more

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरातांकडे आहे इतकी संपत्ती पण चारचाकी एकही नाही !

संगमनेर :- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार थोरात कुटुंबीयांकडे जंगम व स्थावर अशी सुमारे बारा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात दहा कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर सुमारे दोन कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. परंतु थोरात यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले … Read more

शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात,राष्ट्रवादीला धक्का !

अहमदनगर :- शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इछुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारास सुरवात

अहमदनगर :- आ. संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास मंगळवारी (दि. १) सकाळपासून सुरुवात केली आहे. शहरात प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन केले असून प्रभाग क्रमांक १२ मधील प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन व नारळ वाढवून केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार … Read more

अहमदनगर चे राजकारण : बाप शिवसेनेत मुलगा राष्ट्रवादीत !

अहमदनगर – थंडगार पडलेली शिवसेनेची बुलंद तोफ अंबादास पंधाडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अनिल राठोड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच पंधाडे त्यांच्या भेटीसाठी शिवालयात पोहोचले. पंधाडे यांचा मुलगा सारंग हे मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे खास कार्यकर्ते आहेत. नगरच्या राजकारणात ‘बाप इकडं आणि बेटा तिकडं’ असं चित्र यानिमित्ताने दिसून आलं. बाप … Read more

गॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर !

अहमदनगर :- घरगुती सिलेंडरच्या दरात आजपासून ( मंगळवार ) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर नगरमध्ये सिलेंडरच्या दरात ५९८ रुपयांवरून ६११ रुपये भाव … Read more