श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी!

श्रीगोंदा : मामा भाच्याचं एक वेगळंच नात असतं, परंतू श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मात्र मामा फिर्यादी तर भाचा आरोपी झाला आहे. मामानेच आपल्याच भाच्याविरोधात शेतातील विहिरीवरील स्टार्टर चोरीप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सागर निंभोरे रा. घोडेगाव, असे संशियत आरोपीचे नाव आहे. गोरख दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोडेगाव शिवारात … Read more

विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे

शेवगाव : निवडणुकीपुरते राजकारण, निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे माझे धोरण असून, निधी देतानाही मी कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही, शहरात सरसकट सर्व नगरसेवकांना निधी दिला. यापुढील काळातही सार्वजनिक कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल, विकासाच्या मुद्यावर आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून, विकास कामांसाठी यापुढील काळातही … Read more

एकटे राहणारी मुले असतात लट्ठ !

न्यूयॉर्क : लठ्ठपणासाठी बदलती जीवनशैली एक प्रमुख कारण समजले जाते. अमेरिकी शास्त्रज्ञांनंी लठ्ठपणाशी संबंधित एक नवीन दावा केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार, जी मुले एकटी राहतात वा वाढत्या वयामध्ये ज्या मुलांच्या शेजारीपाजारी कुणी राहत नाही वा त्यांना शेजाऱ्यांची सोबत मिळत नाही, त्यांच्यामध्ये मोठेपणा अन्य मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाची शक्यता एक-तृतियांशाने जास्त असते. या अध्ययनाचे प्रमुख आणि कार्नेल … Read more

चक्क कॉफीपासून बनविले सनग्लासेस !

लंडन : कॉफी पिण्याच्या कामी येते आणि सनग्लासेस म्हणजे चष्मा उन्हापासून बचाव करण्यासाठी. डोकेदुखी कमी करण्यासाठी दोन्हींची मदत होते. असे असले तरी कॉफी व सनग्लासेस यांच्यात एखादा फार जवळचा संबंध नाही. मात्र लवकरच दोन्हीमध्ये एक नाते तयार होणार आहे. कारण आता कॉफीचा सनग्लासेस बनविण्यासाठी वापर केला जात आहे. युक्रेनमधील ओचिस आयवेयर ब्रँडने एक संशोधन करत … Read more

आधार लिंक केले असेल तरच दारू भेटणार !

नवी दिल्ली : दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल सतत येत असलेल्या तक्रारीनंतर आता उत्पादन शुल्क विभागाने ही समस्या सोडवण्यासाठी अनोेखी शक्कल लढवली आहे. त्यानुसार दारूची बाटली खरेदी करण्यापूर्वी आधारकार्ड जोडावे लागणार आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे कुठेही रिकामी बाटली फेकणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करता येईल. कागदावर ही योजना चांगली वाटत असली तरी, त्यामुळे चोरून पिणाऱ्यांची चांगलीच अडचण … Read more

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही !

शेवगाव – तालुक्यातील शेतकऱ्यांची गेल्या ४ ते ५ वर्षांत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. निसर्ग साथ देत नाही, शासन मदत करत नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिलेला नसून, पूर्व भागात तर शेतकरी मोडून गेला आहे, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे … Read more

अशोक चव्हाण म्हणतात मी महाराष्ट्रात खूश…

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बनविण्याची व मध्य प्रदेशच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी देण्याची तयारी केली आहे; परंतु चव्हाण यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारण्यास नकार देत आपण महाराष्ट्रात खूश आहोत, आपल्याला राज्यातच ठेवावे, असे म्हटले असल्याचे वृत्त आहे. याबाबतच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : सार्वजनिक स्वच्छतेच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ची दखल घेत अमेरिकेतील बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदींचा या पुरस्काराने गौरव होणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह एका ट्विटद्वारे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भात … Read more

देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत आनणार्‍या हुकुमशाहीचा निषेध !

अहमदनगर :- भाजप प्रणित मोदी सरकारच्या हुकुमशाही निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत सापडल्याचा पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात निषेध नोंदविण्यात आला. तर अर्थव्यस्थेसाठी वारंवार धोक्याचा इशारा देणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना इंडियन लॉरिस्टर अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी सन्मानची मानवंदना देण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर … Read more

अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेवगाव :- तालुक्यातील मुरमी येथे पावसात अंगावर वीज पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव साहेबराव गरड (वय ७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी रोजी रात्री नऊ वा. घडली. तर याच दिवशी सामनगाव येथे पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून एक गाय दगावली. शुक्रवारी देवराव गरड हे घराच्या पडवीत झोपले … Read more

थोरातांच्या तालुक्यात विखे पाटलांकडून विकासकामांसाठी १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर!

संगमनेर :- तालुक्यातील १६ गावांमधील मूलभूत सुविधांकरिता युती सरकारच्या माध्यमातून १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. सावरगाव तळ, मालुंजे, निमोण, अंभोरे, चंदनापुरी, जोर्वे, मनोली, शिबलापूर, आश्वी खुर्द व बुद्रूक, ओझर खुर्द, कोल्हेवाडी, चिंचपूर, पिंपरी लौकी, उंबरी बाळापूर या गावांचा यात समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठीचा प्रस्ताव … Read more

आमदार राहुल जगताप यांच्या निधीतील तब्बल ३ कोटी ८० लाख खड्ड्यांत…

श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते. बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे … Read more

आमदार मुरकुटे यांची आजपासून विकास दिंडी

नेवासा :- आमदार बाळासाहेब मुरकुटे हे विकास दिंडीच्या माध्यमातून मंगळवारपासून १२ सप्टेंबरपर्यंत नेवासे तालुक्यातील गावोगावी जनजागृती करणार करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजनांसह लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्यातील विकासकामांचा लेखाजोखाही ते गावोगावच्या बैठकांत जनतेसमोर ठेवणार आहेत. जिल्ह्यात विकासकामांचा सर्वाधिक ओघ नेवासे तालुक्यात आणल्याचा आमदार मुरकुटे यांचा दावा आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, सभामंडपासह अंतर्गत रस्ते, … Read more

शरद पवार यांच्या विषयी सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर

शिर्डी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक लिखाण करुन जनतेच्या भावना दुखावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. लोणी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मिडीयावर एका व्यक्तीने माजी केंद्रीय मंत्री … Read more

प्रसिद्ध निवेदक आणि रेडिओ जॉकी आर.जे ऋषि शेलार यांना महाराष्ट्राचा युवा आयडॉल पुरस्काने सन्मान

अहमदनगर :- आपल्या सुमधुर आवाजे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे निवेदक ,युवा व्याख्याते ,लेखक, कवी, रेडिओ जॉकी, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व ऋषिकेश शेलार यांना  महाराष्ट्राचा युवा आयडॉल निवेदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या अनोख्या आवाजाने त्यानी रसिक प्रेक्षकांना अगदी थोड्या दिवसात आपलेसे केले आणि संपूर्ण महाराष्ट्राचा साठी त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श बनून गेले.  सर्व … Read more

विधानसभेसाठी भाजपकडून राहुल झावरे ?

पारनेर :- अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर १२-०घोषणा करुन त्यादृष्टीने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात बांधणी सुरु केली. पारनेर -नगर विधासभा मतदारसंघासाठी भाजपकडून विखे कुटूबियांशी पस्तीस वर्षापासून घनिष्ठ संबध असलेले माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पुत्र पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांना विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे विखेंनी आदेश देवून प्रवरेची यंत्रणा सक्रिय केल्याने … Read more

अजित पवारांना अटक होण्याची शक्यता

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला असल्याने अजित पवार यांना अटक होवू शकते. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोललं … Read more

विवाहित तरुणीची आत्महत्या

राहाता : तालुक्यातील साकुरी येथे एका विवाहितेने छपराच्या बांबुला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील कविता विजय गायकवाड (वय १८) ही विवाहित महिला साकुरी येथील १३ चारीजवळ बनरोड येथे माहेरी आली होती. काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास ती तीच्या … Read more