धक्कादायक ! घरात सिगारेट ओढल्यास तुरुंगवास

बँकॉक : थायलंडमध्ये एख नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअंतर्गथ लोक आपल्या घरामध्येही सिगारेट ओढू शकत नाहीत. समजा घरामध्ये सिगारेट ओढताना पकडले गेले तर त्यांना थेट गजाआड केले जाईल. सोबतच संबंधित व्यक्तीवर घरेलू हिंसेचा खटलाही चालविला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी धूम्रपानामुळे सहा लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात ६० टक्के फक्त मुले असतात. ती … Read more

राष्ट्रवादी सोडणाऱ्या फुटिरांना पाडा – जयंत पाटील

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेलं आहे, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्त्व देऊन राष्ट्रवादीसोबत राहतील आणि पक्षाची साथ सोडणाऱ्या फुटिरांना पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील … Read more

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर : नगर मनमाड महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१८) रात्री ८ च्या सुमारास घडली. दिलीप माणिक सोनवणे (वय ४२, रा. वनराई कॉलनी, नवनागापुर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, नवनागापुरमधुन सह्याद्री चौकाकडून वनराई कॉलनीकडे जाणाऱ्या रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या मारूती … Read more

छिंदमच्या नगरसेवकपदाबाबत सुनावणी पूर्ण

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन उपमहापौर व विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या नगरसेवक पदाबाबत महासभेने केलेल्या ठरावावर नगरविकास राज्यमंत्र्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. यावेळी मनपासह छिंदमनेही म्हणणे सादर केले.याप्रकरणी आता नगरविकास राज्यमंत्र्याकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मनपाच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव … Read more

महापालिका कामगाराचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू

अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला. बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना … Read more

कर्जत – जामखेडमध्ये परिवर्तन अटळ जामखेडमध्ये शिवस्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत

जामखेड :- राज्यामध्ये जलयुक्त शिवार या योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सरकार सांगत आहे, एवढा मोठा निधी खर्च होऊनही राज्यात दुष्काळ कसा याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जामखेड येथे बोलताना केले. जामखेड येथे शिवस्वराज्य यात्रेचे अतिशय भव्य आणि जोरदार स्वागत करण्यात आले. खर्डा ते जामखेड हा पूर्ण … Read more

नगर जिल्ह्यासाठी कांदा अनुदानासाठी ७३ कोटी मंजूर

अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात … Read more

महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा

संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेला जे खोट सांगत आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे या महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही आजपासून काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला अमरावती येथून सुरुवात करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. संगमनेर येथे सहकार … Read more

महाराष्ट्रातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर बुधवारी मोर्चा

अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस कॉ.आनंदराव वायकर व प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांनी दिली. या दोन राज्यव्यापी संघटनांच्या वतीने … Read more

शिक्षकांची शासनाकडून वारंवार फसवणूक शिक्षक दिनावर घालणार बहिष्कार

नगर- शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो. मात्र शिक्षकाला गुरू मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात मागील पाच वर्षात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे शासन  वारंवार दुर्लक्ष करित असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शिक्षकांची वारंवार  फ़सवणुक होत असून या  मागण्यांचा तत्काळ शासन आदेश न काढल्यास येत्या शिक्षक काळ्या फिती लावून दिनावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. … Read more

काय होणार श्रीगोंदा मतदारसंघात ?

श्रीगोंदा :- विधानसभा मतदार संघात या वेळी पुन्हा पाचपुते विरुद्ध जगताप अशीच लढत होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा याही इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्यांचा पत्ता आपोआप कट होईल.नागवडे व जगताप यांची दिलजमाई झाली तर पाचपुते विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत ह्या निवडणुकीत … Read more

दहा हजार रुपयांसाठी तरुणाची दगडाने ठेचून हत्या

जळगाव :- लायटिंगच्या व्यवसायातून ३५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये बाकी असल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये वाद झाले. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांनी तरुणाच्या घरी जाऊन बाहेर बोलावले. काही अंतरावर नेऊन त्याला बेदम मारहाण केली. दोघांनी पाच वेळा वीस किलो वजनाचा दगड तरुणाच्या डोक्यात घालून हत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री ईश्वर … Read more

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

नगर :- शहर व उपनगरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांची पुन्हा दाणादाण उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेचे काही रस्त्यांचे पॅचिंग करण्यात आले होते. त्या काही रस्त्यांवरील डांबर पावसाने वाहून गेले. या पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची … Read more

शेतकरी आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर :- नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनशाम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किसन लोटके, बाळासाहेब पवार, अशोक … Read more

भाजपने अष्टपैलू नेता गमावला

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली … Read more

माजी महापौर कळमकर यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करत आमदारकीचा ‘अभिषेक’ ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असतानाच सावेडीत माजी महापौर अभिषेक कमळकर यांच्या स्टेजवर सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला यांची झलक नगरकरांना पहायला मिळाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानने सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला हिला बोलावून रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली.  10,000 हून अधिक तरुण यावेळी उपस्थित होते, दरम्यान रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचून आपणही आगामी काळात विधानसभा … Read more

‘या’दिवशी होवू शकतात विधानसभा निवडणुका

अहमदनगर ;- विधानसभेच्या प्रशासकीय कामांना गती आली आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याची चिन्हे असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी 31 तारखेला प्रसिध्द करण्यात येणार असून शनिवारी यादीवर निर्णय घेण्याचा अंतिम दिवस होता. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यालयांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज … Read more