सुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा

अहमदनगर : महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची जामखेड येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० एप्रिल रोजी कर्जत येथे तर ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची २० एप्रिल रोजी शेवगांव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे संयोजक प्रसाद ढोकरीकर यांनी दिली. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नगर … Read more

प्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही

अहमदनगर : बाळासाहेब विखे आणि पवार यांचे वैर नव्हते. अलीकडे राजकारणासाठी त्यांच्यातील वादाचा गवगवा केला जात आहे. प्र‌वरा परिसरात या विखे कुटुंबियांची हिटलरशाही चालते.  त्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यांनी सख्या भावाला एवढा त्रास दिला आहे, तर इतरांची काय व्यथा, अशी टीका डॉ. अशोक विखे यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरचे … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा !

संगमनेर :- आदर्श आचारसंहिता लागू असल्याची माहिती असूनदेखील प्रचारफेरीसाठी विनापरवाना वाहन वापरणाऱ्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात भरारीपथक दोनचे प्रमुख कैलास पांडुरंग राऊत यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लोखंडे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. लोखंडे यांनी सोमवारी (१५ एप्रिल) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा, निमगाव … Read more

अच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस

अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये … Read more

…म्हणून अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही!

मुंबई: देशात विविध टप्प्यात मतदान होतय. मोठ मोठ्या सेलिब्रिटी मतदानाचं आवाहन करत आहेत. मात्र अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट हे तिघेही भारतात मतदान करु शकणार नाहीत. कारण ते भारतीय नागरिक नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना ? पण हे खरं आहे. हे तिघेही आतापर्यंत आपल्याला देशभक्तीचं गुणगाण करताना दिसले. मग ते त्यांच्या सिनेमातून … Read more

लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा – डॉ. सुजय विखे

जामखेड :- निवडणूक विचाराची आहे. मतदान करताना विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा. दोन्ही उमेदवारांची कौटुंबिक पाश्र्वभूमी तपासा, समोरच्या उमेदवाराची सखोल माहिती घेऊनच मतदान करा. कुणाची दहशत आणि गुंडगिरी आहे हे पहा आणि लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा, असे आवाहन भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले. जामखेडमधील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे … Read more

श्रीगोंद्यातील युवतीला फसवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू

श्रीगोंदे :- अजूनज परिसरातील युवतीस फसवून शारीरिक संबंध ठेवणारा गार येथील विनायक पांडुरंग मगर याचा शोध दौंड पोलिस घेत आहेत. दरम्यान, आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पीडित मुलगी बारामती येथील खासगी कंपनीत नोकरी करत असताना मगर याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. गर्भवती राहिल्यावर ती माझ्याशी लवकर लग्न कर … Read more

माजी खासदार वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून अखेर हकालपट्टी करण्यात आली. पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार वाकचौरे यांच्यावर ही कारावाई करण्यात आली. लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्व जागा भाजप, शिवसेना एकत्रित लढवत आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून … Read more

विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर कॉंग्रेस पक्षविरोधी नेते !

शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला केला.  ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत, असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहेर दिला.  शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संगमनेर … Read more

सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले – मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर :- साकळाई पाणी योजनेची मागणी २५ वर्षांपूर्वीची आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले. अनेक जुने प्रश्न आम्ही सोडवले. साकळाईचा प्रश्नही सोडवू. कोणाच्याही वाट्याचे पाणी कमी न करता साकळाईला पाणी उपलब्ध होईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी नगर आणि श्रीगोंद्याच्या जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेला मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी … Read more

माजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना टोमणे

अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले यांनी खा.दिलीप गांधीना टोमणे मारले. माजी मंत्री पाचपुते यांनी साकळाईसाठी आपण कसे प्रयत्न केले, याचा पाढा वाचला. मागील सभेत खासदार गांधी यांनी डॉ. विखेंना मतदान करा एवढे म्हटले असते, तरी लोकांनी डोक्यावर घेतले … Read more

महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवून मारहाण

अहमदनगर :- भांडण झालेल्या तरुणास घरात लपवून ठेवल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली. केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुप्रिया महेश गाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. फिर्यादीच्या घरासमोर मोठ्याने आरडाओरड सुरू होती. ते … Read more

मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार ?

अहमदनगर :- कुटुंबातील मी थोरला मुलगा असूनही वडील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी मंगळवारी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत विखे बोलत होते. नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. मोठ्या भावालाही … Read more

‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही ?

पारनेर :- सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे परिवाराला काँग्रेस पक्षाने काय दिले नाही.असा सवाल साधत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे ३५ वर्षे खासदार होते. परंतू त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. काल परवा आलेले तुझा बंदोबस्त करतो, अशी भाषा वापरत आहेत. उमेदवारांना अशी भाषा शोभत नाही. ज्या भाजपवर … Read more

वीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी

कोपरगाव :- वीजचोरीप्रकरणी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांना सोमवारी १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. वाजे यांच्या समर्थ बर्फ कारखान्यात वीजचोरी होत असल्याचे आढळल्याने २१ लाख ६३ हजार रुपयांच्या बिलाची आकारणी करून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या कारखान्यावर मुंबईच्या वीज कंपनीच्या भरारी पथकाने छापा टाकला. मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार … Read more

सुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल !

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, … Read more

डॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकूण १२ उमेदवारांच्या खर्च तपासणीत त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश आहेत. १ ते १० एप्रिल या कालावधीत उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शनिवारी झाली. प्रत्येक उमेदवाराला … Read more

लावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर झाला कलेक्टर !

अहमदनगर :- शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या कोल्हाटी समाजातील अमित मारुतराव काळे हा गेल्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेल्या आठवड्यातच अमित कलेक्टर झाला असून, अमित या समाजातील पहिला मुलगा आहे जो कलेक्टर झाला आहे. नगर शहरातील बुरूडगाव रस्ता येथील काळे गल्ली येथे राहणाऱ्या अमितने जिद्द, चिकाटीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तमाशासाठी गावोगाव … Read more