पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या छावण्यांना दंड

जामखेड :- तालुक्यातील २१ छावणीचालक संस्थांना सहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे सर्वच छावणीचालकांचे धाबे दणाणले आहे. यातील अनेक छावण्या पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. तालुक्यात पन्नास छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पंचेचाळीस सुरू झाल्या आहेत. ५ एप्रिलला पाच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.  शासनाने छावणी चालकांवर अनेक अटी घातल्या आहेत. तथापि, छावणी … Read more

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश?

अहमदनगर :- पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.  त्यासाठी १२ एप्रिलचा ‘मुहूर्त’ ठरला असून  डाॅ. सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभेत हा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दाेघेही … Read more

निष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम !

श्रीगोंदा :  भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस आघाडीचे काम करण्याचा निर्णय करणार असल्याचे निष्ठावंत भाजप पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची  शहरातील बालाजी मंगल कार्यालयात बैठक झाली . त्यात … Read more

कोणी किती माया गोळा केली हे जनतेसमोर आणणारच : नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव :- राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर कुणी किती माया गोळा केली, याची माहिती गोळा करून जनतेपर्यंत नेणार आहे. पक्ष शिस्तीच्या नावाखाली दडपशाही करणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम प्रामाणिक कार्यकर्ते करतील, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघ, जनसंघ व भाजपचा स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे … Read more

जनतेला स्वप्ने दाखवणारे विखे पाटील २३ मार्चनंतर गायब होतील !

अहमदनगर :- ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार? या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले. पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला. जेऊर बायजाबाई … Read more

तिकीट कापले तरीही पक्षाचेच काम करणार – खा.दिलीप गांधी

अहमदनगर :- राजकारणामध्ये चढ – उतार चालू असतात. पक्षाने जरी मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही, माझे तिकीट कापले मात्र तरीही नाराज न होता, न थांबता पक्षाचेच काम करणार हे मी जाहीर केले आहे. पक्षविरोधी कृती करणे आमच्या रक्तात नाही. २००४ मध्येही पक्षाने माझे तिकीट कापले होते, तरीही पक्षाचेच काम केले, असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार तथा … Read more

बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल

योग गुरु बाबा रामदेव यांनी आरोग्य उत्तम राहावे यासाठी विविध नियम सांगितले आहेत. हे नियम प्रत्येक व्यक्तीने फॉलो करावेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे हे नियम आहेत. आजपासूनच तुम्ही हे नियम फॉलो करण्यास सुरुवात केल्यास फायदा होऊ शकतो. पहिला नियम सकाळी उठताच पाणी पिण्याची सवय लावावी. तुम्हाला बद्धकोष्ठता, सांधेदुखी, वाढते वजन समस्या असल्यास सकाळी गरम पाणी प्यावे. … Read more

धनश्री विखेंचा अर्ज का ठरला अवैध ? २६ अर्ज ठरले वैध !

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांनी एकूण ३८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये २६ उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत. यापैकी सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला, तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर पाच उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिली.  … Read more

स्मशानभूमीत खोदले शेततळे ; पं. स. सदस्यासह सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

नेवासे : भानस हिवरा येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीत शेततळे खोदल्याने दफन केलेल्या मृतदेहांची हाडे वर आल्याने त्यांची विटंबना झाली. त्यामुळे पंचायत समिती सदस्य किशोर जोजर यांच्यासह सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  काही गावगुंडांनी शेततळ्यासाठी पोकलेनने स्मशानभूमीत खोदकाम केले. त्याममुळे काही कबरी उघड्या पडल्या. पुरलेल्या मृतदेहांची हाडे वर आली. काम रोखण्याचा प्रयत्न केला असता … Read more

राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे देशाच्या विकासाला खीळ- अण्णा हजारे

पारनेर : राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते.  या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन

संगमनेर : आचारसंहितेचे उल्लंघन करत विनापरवानगी सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने युतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.  अकोले विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी सदाशिव लोखंडे … Read more

विखे समर्थक भाऊसाहेब कांबळेंच्या बॅनरवरुन विखेंचाच फोटो गायब

शिर्डी : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिर्डी मतदारसंघातील श्रीरामपूर इथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.यावेळी बॅनरवरुन विखेंचा फोटो गायब होता. विखे समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत. पण विखे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना थोरातांची साथ मिळाल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. पण या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी … Read more

सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखेंचा अर्ज बाद

अहमदनगर: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काल (गुरुवार) भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.  पण आता निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे आता धनश्री विखे-पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. पण असं असलं तरी सुजय विखे-पाटलांचा भाजपकडून निवडणूक … Read more

फरार सरपंचासह एक जणास अटक

कोपरगाव :- तालुक्यातील मोर्विस येथे महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करताना तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी ट्रॅक्टर पकडला. परंतु यातील आरोपी सरपंचासह तिघे जण फरार झाले होते, पैकी सरपंच एकनाथ चंद्रभान माळी व त्याचा सहकारी नीलेश गोरख वाघ यास कोंबिंग ऑपरेशन करून पकडण्यात कोपरगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी कामगार … Read more

५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. भगवान विश्वनाथ वाघमारे (६३, ढाकणवाडी, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. त्यान घरात एकटी असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला उचलून आणून तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना १ एप्रिल … Read more

सुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या त्या तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ !

अहमदनगर :- लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास … Read more

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर:  लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झालेली असून विविध पक्ष संघटना यांचे लोकसभा प्रचाराचे रॅली, सभा यासारखे कार्यक्रम चालू आहेत. निवडणूकीचे अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाकडून आपली राजकीय ताकत दाखविण्‍याच्‍या उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामध्‍ये मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत तसेच सध्‍या लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्‍याची प्रक्रिया चालू असून विविध राजकीय … Read more

‘त्या’ चा बालहट्ट पुरवला नाही म्हणून काँग्रेसला धोका – आ. बाळासाहेब थोरात

 श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे.  त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली.  लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब … Read more