Ahmednagar News: गणेश विसर्जन मिरवणुकीत डान्स केला आणि घरी येऊन आला हृदयविकाराचा झटका! पोलीस कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू

आज संपूर्ण देशामध्ये लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे व या सगळ्या भक्तीमय वातावरणामध्ये अहमदनगर येथील पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांचे मात्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

Ajay Patil
Updated:
ahmednagar news

Ahmednagar News:- गेल्या दहा दिवसापासून श्री गणेशाचे आगमन झालेले होते व सगळीकडे भक्तीमय वातावरणात अवघा महाराष्ट्र न्हावून निघालेला होता. आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संपूर्ण देशात सगळ्यांच्या लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप दिला जात आहे व आज सगळीकडे राज्यातील मानाच्या गणपतीचे देखील विसर्जनासाठीच्या मिरवणुका पार पडत आहेत. या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये मात्र अहमदनगर शहरात एक धक्कादाय घटना घडली असून यामुळे सगळीकडे हळूहळू व्यक्त केली जात आहे.

 पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांना गाठले मृत्यूने

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज संपूर्ण देशामध्ये लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे व या सगळ्या भक्तीमय वातावरणामध्ये अहमदनगर येथील पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांचे मात्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या  मिरवणुकीमध्ये त्यांनी काल भन्नाट असा डान्स देखील केला होता. परंतु त्यानंतर त्यांना मृत्यू गाठेल हे कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हते. ही सगळी गणेश विसर्जनाची मिरवणूक संपवून ते घरी आले व घरी येताच त्यांना हृदविकाराचा तीव्र स्वरूपाचा झटका आला व त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते व काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या एकत्रितपणे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दुपारी गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आलेली होती.

 ज्ञानेश्वर मोरे यांनी केला होता मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स

कोतवाली पोलीस स्टेशनच्या पार पडलेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ज्ञानेश्वर मोरे यांनी एका मराठी गाण्यावर खूप चांगल्या पद्धतीने डान्स केला व सगळ्यांची वाहावा देखील त्यांना मिळाली होती.

परंतु ध्यानीमनी नसताना विसर्जन मिरवणुकीतून घरी आल्यानंतर मात्र त्यांना हृदयविकाराचा तीव्र स्वरूपाचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. या सगळ्या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर आज शोककळा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe