Bjp Candidate List Maharashtra : येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान राजकीय पक्षांनी आता आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी बीजेपीने अर्थातच भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या पहिल्या यादीत मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव बीजेपीने जाहीर केले नाही.
त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. अशातच काल अर्थातच पाच मार्च 2024 ला गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला.
बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाचा हा दौरा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपा संदर्भातच आयोजित झाला असावा अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतं आहेत.
दरम्यान अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर मराठवाड्यातील बीड सहित अन्य लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर बीडमधून यावेळी प्रीतम मुंडे ऐवजी पंकजाताई मुंडे यांना खासदारकीचे तिकीट दिले जाईल अशी शक्यता आहे. नाराज पंकजाताईंना साधण्यासाठी केंद्रीय नेतृत्व त्यांना खासदारकीची उमेदवारी बहाल करू शकते असा दावा होत आहे.
शिवाय मराठवाड्यातील हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद या जागेसाठी देखील महायुतीकडून भाजपचे उमेदवार उभे राहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. हिंगोलीत भाजपाकडून तानाजी मुरकुटे यांना उमेदवारी मिळणार असे वृत्त समोर आले आहे.
जालना येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद येथून बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
तसेच नांदेड येथून नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांच्या भाचीला अर्थातच मिनल खतगावकर यांना खासदारकीची उमेदवारी बहाल होऊ शकते, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आला आहे.