Ahmednagar Politics : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही.
कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता. मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं.
आयुष्यात दुःख आल्याशिवाय सुःखाची किंमत कळत नाही म्हणतात, त्याप्रमाणे अडीच वर्षे हुकुमशाही, दडपशाही राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर कर्जत-जामखेडकरांच्या लक्षात आलं आ. राम शिंदे आमदार म्हणुन योग्यं आहेत.
नेता मोठ्या घरातला असुन उपयोगाचा नसतो, आपला नेता आपल्यातलाचं असावा लागतो कारण अडचणीच्या काळात शेवटी आपला तो आपलाच असतो. असे प्रतिपादन आ. राम शिंदे यांनी केले.
आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेडचे येथे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, सरपंच राजेंद्र ओमासे, भाजपा नेते पांडुरंग उबाळे यांच्या पुढाकाराने हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तनासह विविध उपक्रम घेण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष बापुराव ढवळे म्हणाले की, अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिराच्या भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्यापुर्वीचं कर्जत-जामखेडमध्ये रामराज्याच्या आनंद कर्जत-जामखेडकर साजरा करुन घेत आहेत.
मी मागच्या दाराने आमदार झालो, पण मी सरकार घेऊन आलो आहे. त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व विकास करण्यासाठी तुमच्या आशिर्वादाने तालुकासाठी पुन्हा काही तरी चांगले मिळणार आहे. –आ. राम शिंदे