नगरला शासकीय मेडिकल कॉलेज हवे ! खा. नीलेश लंके यांचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांना साकडे

Ahmednagarlive24
Published:

महाराष्ट्रातील मोठया लोकसंख्येचा, मोठया क्षेत्रफळाचा जिल्हा असलेल्या नगर जिल्हयामध्ये शासकीय मेेडीकल कॉलेज सुरू करून वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुविधा तसेच त्याअनुषंगाने आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून नगर जिल्हयात शासकिय मेडीकल कॉलेजला मान्यता देण्याचे साकडे खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना मंंगळवारी घातले. दरम्यान, मंत्री नडडा यांनी खा. लंके यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत नगर जिल्हयामध्ये हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत ग्वाही दिली.

संसदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत खा. लंके यांनी मंगळवारी मंत्री नड्डा यांची भेट घेउन नगर जिल्हयामध्ये शासकीय कॉलेजची अशी आवष्यकता आहे हे पटवून दिले. खा. सुळे यांनीही खा. लंके यांची मागणी रास्त असल्याचे सांगत लवकरात लवकर त्यांच्या मागणीस प्रतिसाद देण्याचा आग्रह धरला. त्यावर नड्डा यांनी लंके यांच्या मागणीचा लवकरच सकारात्मक विचार झालेला असेल असे खा. सुळे यांना आश्‍वस्त केले.

या मागणीसंदर्भात मंत्री नड्डा यांना देण्यात आलेेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, केेंंद्रीय आरोग्य मंत्री या नात्याने नगर जिल्हयातील समस्या व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याबाबत आपणास माहीती असेलच. नगर जिल्हयाचा विचार करता जिल्हयासाठी एका शासकीय मेडीकल कॉलेजची अत्यंत आवष्यकता आहे.

नगर जिल्हयातील बहुतांश विद्यार्थ्यांना  वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या जिल्हयात जाण्याची वेळ येते. त्यामुळे केवळ आर्थिक बोजा पडत नाही तर पात्रता असलेले विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शासकीय मेडीकल कॉलेजची निर्मीती झाल्यानंतर  केवळ विद्यार्थ्यांना  शिक्षण मिळणार नाही तर जिल्हयात आरोग्य सेवांमध्ये चांगली सुधारणा होणार आहे.

लंके यांनी निवेदनात पुढे नमुद केले आहे की, नगर जिल्हयामध्ये आवष्यक ती जमीन तसेच पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय जनतेमधून नगर जिल्हयामध्ये शासकीय कॉलेज असावे अशी सार्वत्रीक मागणी आहे. या सर्व बाबींचा विचार करून नगर जिल्हयात शासकीय मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत अशी विनंती खा. लंके यांनी मंत्री नड्डा यांच्याकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe