काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला – ना.राधाकृष्ण विखे पाटील

Published on -

Ahmednagar News : विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे असून,त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला असल्याची प्रतिक्रीया महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,परदेशात गेल्यानंतर राहूल गांधीवर तिथल्या वातावरणाचा परीणाम होतो त्यातून असे वक्तव्य करण्याचे शहाणपण त्यांना सुचत असल्याचा टोला लगावून परदेशात जावून देशविरोधी वक्तव्य करून प्रसिध्दी मिळविण्याची हौस आहे.पण आपण काय बोलतो याचे भानही त्यांना राहात नाही.यापुर्वी भारतीय लोकशाहीच्या विरोधातील वक्तव्य असो की, संसदेत त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कालावधीतील अध्यादेश फाडण्याची राहूल गांधी यांची भूमिका म्हणजे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणारीच होती असा आरोप त्यांनी केला.

आता थेट आरक्षण रद्द करण्याच्या त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे.लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणारे चेहरे जनतेला समजले असल्याकडे लक्ष वेधून राहूल गांधीचे वक्तव्य संविधानाचा अपमान करणारे आणि जनतेचा हक्क, अधिकार हिरावून घेणारे असल्याने त्यांच्या वक्तव्याचा मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

काॅग्रेसने नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला.त्यामुळे राहूल गांधीची भाषा आणि काँग्रेसची आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका संविधान बदलाची असल्याचे आता लपून राहीलेले नाही. भारतीय जनता पक्षाने नेहमीच संविधानाचा आदर केला.आरक्षण रद्द होवू देणार नाही असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe