Ancestral Property Rule:- मालमत्ता किंवा प्रॉपर्टी हा एक संवेदनशील विषय असून याबाबत भारतात अनेक प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा प्रॉपर्टी किंवा मालमत्तेच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेताना हा त्या नियमांच्या किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यावा लागतो.
बऱ्याचदा अशा प्रकारचे कायदे किंवा नियम माहिती नसल्याने बऱ्याच जणांचा गोंधळ होतो व विनाकारण वाद उद्भवतात. त्यामुळे मालमत्तेच्या बाबतीत असलेले नियम किंवा कायदे थोड्याफार प्रमाणात का असेना आपल्याला माहीत असणे गरजेचे असते.
आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये मालमत्तेच्या बाबतीत भावा भावांमध्ये किंवा भावाबहिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये अनेक प्रकारचे वाद असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यातल्या त्यात वडिलोपार्जित जी काही संपत्ती असते त्या बाबतीत बरेच वाद आपल्याला दिसून येतात.
वडिलोपार्जित संपत्ती जर म्हटले तर ती अशी संपत्ती असते की तुमचे वडील असतील किंवा आजोबा किंवा पंजोबा यांच्याकडून संपत्ती मिळालेली असते तिला वडिलोपार्जित संपत्ती म्हटले जाते. परंतु या संपत्तीच्या बाबतीत जर काही नियम बघितले तर यामध्ये कुटुंबाने चार पिढ्यांपासून वेगळे राहू नये असाही एक नियम आहे.
त्यामध्ये जर एका पिढीत घराचे विभाजन झाले तर मालमत्ता त्यापुढे वडिलोपार्जित राहणार नाही. तसेच वारसाने मिळालेली प्रत्येक मालमत्ता ही वडीलोपार्जित नसते हे देखील यामध्ये महत्त्वाचे आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितले तर वडिलोपार्जित संपत्ती मिळाली नसेल तर एखादा व्यक्ती किती कालावधीपर्यंत दावा करू शकतो? हे देखील यामध्ये महत्त्वाचे आहे.
यामध्ये म्हटले जाते की वडिलोपार्जित संपत्तीवर चार पिढ्या दावा करू शकतात.परंतु अशा पद्धतीचा दावा करण्याकरिता एक ठराविक वेळ देण्यात आला आहे व त्यावेळी नंतर मात्र वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क असतो तो संपुष्टात येतो.
वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याचा कालावधी किती आहे?
याबाबतीत कायदा बघितला तर त्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करायचा असेल तर तो बारा वर्षापर्यंत करता येऊ शकतो. यामध्ये एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेवर आपला हक्क असेल आणि मृत्युपत्रातून चुकीच्या पद्धतीने तुम्हाला बाहेर केले गेले आहे असे जर वाटत असेल तर बारा वर्षाच्या आत न्यायालयात दाद मागता येऊ शकते.
परंतु या विशिष्ट कालावधीमध्ये जर एखादा व्यक्ती दावा करण्यामध्ये अयशस्वी ठरला तर त्याचा त्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क संपुष्टात येतो. त्यानंतर मात्र जर वैध असे कारण असेल तर न्यायालय म्हणणे ऐकू शकते किंवा मालमत्ता हातातून देखील काढून घेऊ शकते. तसे पाहिले गेले तर वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क काढून घेणे तितके सोपे नाही.
यामध्ये पालकांनी कमावलेली मालमत्ता असेल तर त्यातून मुलांना ते हक्क नाकारू शकतात. परंतु काही विशेष परिस्थितीमध्ये मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेतून बाहेर काढण्याची परवानगी न्यायालयाने दिल्याची देखील अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील.