म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून नागरिकांचे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्याची स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण होते. या दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून सोडत पद्धतीने परवडणाऱ्या दरांमध्ये घरांची विक्री केली जाते हे आपल्याला माहिती आहे.
अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला जर नवी मुंबईमध्ये व्यवसायाकरिता गाळा हवा असेल तर सिडकोच्या माध्यमातून तब्बल 243 गाळ्यांच्या योजना जाहीर करण्यात आलेली असून याकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 14 मार्च 2024 पासून सुरुवात करण्यात आली
असून हे गाळे नवी मुंबईतील उलवे रोड या ठिकाणी आहेत. त्यामुळे नक्कीच लहान व्यवसायिकांना ही योजना अत्यंत फायद्याची ठरणार असे दिसून येत आहे. उलवे नोड मधील बामण डोंगरी संकुलात असलेली ही 243 दुकाने ई निविदा प्रक्रियेद्वारे विकले जाणार आहेत.
उलवे नोड परिसर आहे वेगाने विकसित होणारा
नवी मुंबईतील उलवे नोड हा परिसर एक वेगाने विकसित होणारा असून कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत पाहिले तर या ठिकाणी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही प्रकारचे कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारची आहे.
रस्ते तसेच रेल्वे, अटल सेतू आणि भविष्यात सुरू होऊ शकणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखील कनेक्टिव्हिटी आहे. या परिसरामध्ये आवश्यक सर्व पायाभूत सुविधा असून या परिसराच्या जवळ असणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदर या परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यासोबतच बामण डोंगरी येथील सिडको गृह संकुलाला नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामण डोंगरी स्थानकाद्वारे उत्तम अशी कनेक्टिव्हिटी देखील मिळाली आहे. अटल सेतूपासून हा गृहसंकुलाचा परिसर जवळच आहे.
या योजनेच्या महत्त्वाच्या तारखा
1- ऑनलाइन नोंदणीची तारीख 14 मार्च ते 13 एप्रिल 2024
2- ई लिलावासाठी वेबसाईटवर अर्ज तसेच अनामत रक्कम व प्रक्रिया शुल्क भरणे- 14 मार्च ते 13 एप्रिल 2024
3- बंद निविदा सादर करणे– 14 मार्च ते 12 एप्रिल 2024
4- ई लिलाव– 14 एप्रिल 2024
5- निकाल जाहीर करण्याची तारीख 15 एप्रिल 2024