Real Estate: पुणे शहराजवळ रियल इस्टेटमध्ये करायची गुंतवणूक तर पुरंदर विमानतळाजवळील ‘ही’ ठिकाणे ठरतील फायद्याचे, वाचा माहिती

Ajay Patil
Updated:
real estate update in pune

Real Estate:- सध्या भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र अधिक विकसित होत असून गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. रियल इस्टेट मधील गुंतवणुकीचे एकंदरीत स्वरूप बघितले तर भविष्यकाळातील विकास या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असते. आज ज्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल त्या ठिकाणी येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये कसा विकास होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी कशा पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकतात याचा प्रामुख्याने विचार करून रियल इस्टेटमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करतात.

यामध्ये जर आपण पुणे शहराचा विचार केला तर हे एक वेगाने विकसित झालेले शहर असून  अजून देखील मोठ्या प्रमाणावर पुणे शहर व परिसराचा विकास होत आहे. त्यामुळे पुणे शहरात आणि पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीला खूप मोठा वाव आहे. या दृष्टिकोनातून पाहिले तर पुण्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या लोहगाव विमानतळावरील भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पुरंदर तालुक्यामध्ये एक विमानतळ होत असून या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे आहे.

हे विमानतळ पुरंदर  तालुक्यात होणार असून ते पुरंदर विमानतळ म्हणून देखील ओळखले जाते. तसे पाहायला गेले तर या विमानतळाचे बांधकाम अजून सुरू झालेले नाही. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून पुरंदर विमानतळाचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे. साधारणपणे 40 ते 45 किलोमीटर पुणे शहरापासून अंतरावर असलेले हे विमानतळ आज जरी लांब आहे.

परंतु येणाऱ्या कालावधीत या विमानतळाचा जेव्हा विकास होईल तेव्हा पुणे शहराचा देखील विस्तार होईल व यामध्ये हे अंतर कमी होण्यास मदत होईल. या ठिकाणचा राष्ट्रीय महामार्ग 48 आणि 65 व इतर महत्त्वाचे चार मार्गांच्या माध्यमातून शहराच्या इतर भागांशी पुरंदर विमानतळ जोडले जाईल. तसेच या विमानतळाची कनेक्टिव्हिटी पूणे शहरातील महत्त्वाच्या औद्योगिक ठिकाणांशी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून रिंग रोड देखील महत्त्वाचा ठरणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या कालावधीत या विमानतळाच्या आसपास निवासी आणि कमर्शियल जागांसाठीची मागणी वाढेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भविष्यात होणारा फायदा लक्षात घेता जमिनींमध्ये गुंतवणूक देखील केलेली आहे. याच दृष्टिकोनातून पुरंदर विमानतळाजवळ भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याची राहील याची माहिती घेणार आहोत.

 पुरंदर विमानतळा जवळील गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे ठिकाणे

1-सासवड जर आपण सासवडचा विचार केला तर पुणे रेल्वे स्टेशन आणि पुरंदर विमानतळ या दोघ ठिकाणांशी एक उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी सध्या चांगल्या वैद्यकीय तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून नेक शॉपिंग मॉल आणि मनोरंजनाचे इतर पर्याय देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सध्या जर आपण या ठिकाणी प्रॉपर्टीच्या किमती पाहिल्या तर एका प्लॉटकरिता तीन लाख रुपयापासून ते दोन बेडरूमच्या फ्लॅटसाठी दीड कोटी रुपयांपर्यंत सध्या किमती आहेत.

2- धानोरी धानोरी हे पुरंदर विमानतळा सोबतच लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्टेशनची उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले ठिकाण आहे. धानोरीमध्ये सध्या निवासी प्रकल्पांशिवाय अनेक नामांकित शाळा, महाविद्यालय तसेच हॉस्पिटल, नर्सिंग होम, मार्केट आणि एक मॉल देखील आहे. या ठिकाणी जर आपण पाहिले तर मालमत्तेच्या किमती  या 5870 रुपये चौरस फुटापासून ते 6,962 रुपये चौरस फुटापर्यंत आहेत. सध्या या ठिकाणी पॅलेडियम ग्रँड तसेच गिनी बेलीना इत्यादी प्रकल्प आहेत.

3- बिबवेवाडी हे पुण्यातील दक्षिणेकडील महत्त्वाचे असलेले ठिकाण असून बिबवेवाडी मध्ये सामाजिक व शैक्षणिक सुविधा तसेच बाजारपेठा देखील चांगल्या विकसित झालेले आहेत. तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी सायबर सिटी मगरपट्टा, हडपसर औद्योगिक वसाहत आणि सर्व आयटी पार्कचा समावेश आहे. या ठिकाणी सध्या घराच्या किमती 7084 रुपये प्रति चौरस फूट ते 11502 रुपये प्रतिचौरस फुटापर्यंत आहे. या ठिकाणी कोहिनूर जीवा तसेच संस्कृती पंचतत्व सारखे प्रकल्प आहेत.

4- भोसले नगर आगामी येऊ घातलेल्या पुरंदर विमानतळापासून अवघ्या 11 किलोमीटरवर भोसले नगर असून या परिसराशी पुणे शहरातील इतर महत्त्वाच्या भागांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. भोसले नगर या ठिकाणी कॉमर्स झोन आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क सारखे रोजगार केंद्रे तसेच रुग्णालय व शाळा देखील चांगले विकसित आहेत. साधारणपणे 2021 पासून येथील मालमत्तेच्या किमतींचा विचार केला तर त्या 13337 प्रति चौरस फुटावरून एप्रिल 2023 मध्ये 14801 प्रती चौरस फुटापर्यंत वाढले आहेत.

अशा पद्धतीने भविष्यकालीन फायद्याच्या आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पुरंदर विमानतळा जवळील ही ठिकाणे खूप फायद्याचे ठरू शकतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe