Real Estate Tips: भविष्यात घराच्या विक्रीतून चांगला पैसा मिळावा म्हणून घर घेत आहात का? तर या गोष्टींची घ्या काळजी! मिळेल भविष्यात चांगला पैसा

Ajay Patil
Published:
real estate tips

Real Estate Tips:- आजकाल रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा कल वाढला असून गुंतवणुकीतून चांगला परतावा किंवा भविष्यात आपल्याला रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीतून खूप चांगला पैसा मिळतो यामुळे रियल इस्टेटमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येते.

तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर घरांची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात व प्रामुख्याने घरांची खरेदीचा विचार केला तर स्वतःच्या राहण्यासाठी तर घर घेतले जाते परंतु मोठ्या प्रमाणावर घरांची खरेदी ही भविष्यकालीन आर्थिक कमाईच्या दृष्टिकोनातून देखील केली जाते.

म्हणजेच बरेच जण आज घर खरेदी करतात किंवा घरात गुंतवणूक करतात व ते घर भविष्य काळामध्ये विकून त्यातून आपल्याला चांगला परतावा मिळेल हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु यामध्ये जेव्हा आपण घर खरेदी करतो त्यावेळी काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते.

तरच तुम्हाला भविष्य काळात या माध्यमातून चांगला पैसा किंवा चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण पाहू की जर तुम्हाला भविष्यकाळात घर रिसेल करायचे असेल व त्यातून चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे याबद्दलची माहिती घेऊ.

 भविष्यकाळात घराची विक्री करण्याच्या उद्देशाने घर घेत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी

1- सगळ्यात महत्त्वाचे घराचे लोकेशन बघा जेव्हा आपण जमीन किंवा घर किंवा इतर कोणत्याही प्रकारची रियल इस्टेट खरेदी करतो म्हणजेच त्यामध्ये पैसे गुंतवतो त्यावेळी घराचे किंवा इतर मालमत्तेचे लोकेशन बघणे खूप गरजेचे आहे. आपल्याला माहित आहेच की कुठल्याही मालमत्तेची किंमत वाढवण्यामध्ये त्या मालमत्तेचे लोकेशन खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. समजा तुम्हाला भविष्यकाळात चांगला पैसा किंवा चांगला परतावा मिळावा अशी अपेक्षा असेल तर मालमत्ता खरेदी करत असताना ती अशा ठिकाणी खरेदी करावी ज्या ठिकाणी भविष्यकाळात मोठी वाढ होऊ शकते किंवा त्या ठिकाणचे लोकेशन विकसित होऊ शकते. ज्या ठिकाणी तुम्हाला वाढीची शक्यता दिसत आहे अशा ठिकाणी तुम्ही मालमत्ता खरेदी करणे फायद्याचे ठरते. कारण लोकेशन तुम्हाला भविष्यामध्ये त्या मालमत्तेच्या विक्रीतून चांगला परतावा मिळण्यासाठी खूप मोठी मदत करू शकते. यासोबतच प्राईम एरियामध्ये आधीपासून असलेल्या मालमत्तेच्या तुलनेत तुम्हाला या ठिकाणी कमी प्रारंभीक गुंतवणूक करावी लागे.

2- बिल्डरची माहिती घ्या- फ्लॅट किंवा घर खरेदी करत असताना बिल्डर किंवा रिअल इस्टेट डेव्हलपर ची माहिती घेणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मालमत्ता खरेदी करायची असेल तर बिल्डर हा त्यामधील सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

त्यामुळे तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल तर नामांकित बिल्डरच्या माध्यमातून ते खरेदी करणे गरजेचे आहे. याकरिता बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून घ्यावा म्हणजेच तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

3- रेरामध्ये नोंदणी पाहणे तुम्ही एखाद्या घराची खरेदी करत असाल तर त्या अगोदर ते घर रियल रिस्टेट रेग्युलेटर ऑथॉरिटी म्हणजेच रेरामध्ये त्या बिल्डरने नोंदणी केली आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.  घर रेरामध्ये रजिस्टर नसेल तर ते घर खरेदी करू नये. नाहीतर भविष्यामध्ये या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागू शकतो.

4- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पब्लिक ट्रान्सपोर्ट- जेव्हा तुम्ही घर घ्यायचा प्लॅनिंग करता तेव्हा त्या घरापासून व सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी किती अंतरावर आहेत हे देखील बघणे गरजेचे आहे. जर त्या परिसराला चांगली कनेक्टिव्हिटी असेल तर भविष्यकाळ त्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या दरांमध्ये वाढ होते.

त्यामुळे घर खरेदी करताना ते अशा ठिकाणी करा की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवास करायला सोपे जाऊ शकते. नंतर तुम्ही ते घर किंवा ती मालमत्ता विकली तरी तुम्हाला चांगला पैसा भविष्यकाळात मिळू शकतो. त्यामुळे घर खरेदी करताना कनेक्टिव्हिटीला देखील खूप महत्त्व असते.

4- इतर पायाभूत सुविधा बघणे- आपण ज्या ठिकाणी मालमत्ता किंवा घर खरेदी करणार आहात त्या अगोदर त्या घरापासून किंवा त्या घराच्या जवळ शाळा तसेच हॉस्पिटल, उद्याने तसेच महत्त्वाची शॉपिंग कॉम्प्लेक्स किती अंतरावर आहेत ते देखील बघणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा भविष्य काळामध्ये तुम्हाला त्या घराच्या विक्रीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी खूप प्रमाणावर मदत करतात व तुम्ही ज्या ठिकाणी घर खरेदी करणार असाल त्या ठिकाणी कमीत कमी भविष्यकाळात अशा प्रकारच्या सुविधा विकसित होतील अशी शक्यता आहे की नाही हे देखील बघणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe