कमी शेती क्षेत्रासाठी उत्तम ठरेल 20 एचपीचा ‘हा’ मिनी ट्रॅक्टर! कमी खर्चात होतील शेतीची कामे व वाचेल पैसा

बहुसंख्य कॅप्टन ट्रॅक्टर हे इंधन कार्यक्षम तंत्रज्ञानासह व इंजिनसह येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी इंधनांमध्ये शेतीची जास्तीची कामे करता येणे शक्य होते. त्यामुळे तुम्हाला देखील मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही कॅप्टन 200 डीआय या मिनी ट्रॅक्टरचा विचार करू शकतात.

Published on -

Captain 200 DI Mini Tractor:- शेतीमध्ये ट्रॅक्टर हे अनेक प्रकारच्या कामांसाठी खूप उपयुक्त असे यंत्र असून अगदी शेतीची पूर्व मशागती पासून तर पिके काढणीपर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे अवजारांच्या माध्यमातून पार पाडली जातात. ट्रॅक्टरचा वापरामुळे शेतीचे अनेक अवघड कामे आता अतिशय सोप्या पद्धतीने व कमी कष्टाने तसेच कमीत कमी वेळेत करणे शक्य झालेले आहे.

परंतु बऱ्याच शेतकऱ्याकडे शेती कमी असते व त्यामुळे त्यांना मोठा ट्रॅक्टर खरेदी करणे आर्थिक दृष्टिकोनातून परवडत नाही. त्यामुळे असे कमी क्षेत्र असलेले शेतकरी मिनी ट्रॅक्टर घेण्याकडे वळतात. आज जर आपण ट्रॅक्टर बाजारपेठ बघितली तर अनेक कंपन्यांचे उत्कृष्ट असे मिनी ट्रॅक्टर बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

परंतु त्यामध्ये कॅप्टन ट्रॅक्टर हा भारतीय शेतकऱ्यांमधील एक विश्वसनीय असा ब्रँड असून कॅप्टन कंपनीने अनेक प्रगत तंत्रज्ञान वापरून उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर तयार केले आहेत.

बहुसंख्य कॅप्टन ट्रॅक्टर हे इंधन कार्यक्षम तंत्रज्ञानासह व इंजिनसह येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी इंधनांमध्ये शेतीची जास्तीची कामे करता येणे शक्य होते. त्यामुळे तुम्हाला देखील मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही कॅप्टन 200 डीआय या मिनी ट्रॅक्टरचा विचार करू शकतात.

कॅप्टन 200 डीआय मिनी ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये
या ट्रॅक्टरमध्ये 895 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर मध्ये वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे. जे 20 अश्वशक्ती निर्माण करते. तसेच हा मिनी ट्रॅक्टर वेट टाईप एअर फिल्टर सह येतो व त्यामुळे इंजिनचे धुळीपासून संरक्षण होते.

या मिनी ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर सतरा एचपीची आहे व ज्यामुळे हा ट्रॅक्टर जवळपास सर्व ट्रॅक्टर चलित शेती अवजारे आरामशीर चालवू शकतो. या ट्रॅक्टरचे इंजिन 2300 आरपीएम जनरेट करते.

तसेच यामध्ये 19 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आलेली असून याची हायड्रोलिक क्षमता 600 किलो इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकावेळी अधिक मालाची वाहतूक करणे शक्य होते. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 885 किलो असून त्याचा व्हीलबेस 1500 मिमी इतका आहे.

कॅप्टन 200 डीआय मिनी ट्रॅक्टरची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
या मिनी ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल/ पावर( पर्यायी) स्टेरिंग देण्यात आलेले आहे व यामुळे शेतात तसेच खडबडीत रस्त्यावर आरामशीर ड्राईव्ह करता येते. हा ट्रॅक्टर आठ फॉरवर्ड + दोन रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्ससह येतो.

हा मिनी ट्रॅक्टर सिंगल क्लच आणि सिंक्रोमेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो. कॅप्टन कंपनीने या मिनी ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 28 किमी प्रतितास ठेवला आहे. तसेच यामध्ये मल्टी स्पीड पीटीओ प्रकारचा पावर टेकऑफ देण्यात आला आहे. जो पाचशे चाळीस आरपीएम जनरेट करतो. हा ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो.

किती आहे कॅप्टन 200 डीआय मिनी ट्रॅक्टरची किंमत आणि मिळणारी वारंटी?
भारतीय बाजारपेठेमध्ये या मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत तीन लाख 29 हजार ते तीन लाख 39 हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. या मिनी ट्रॅक्टर वर मिळणाऱ्या वॉरंटीचा विचार केला तर यावर ट्रॅक्टर सह 700 तास किंवा एक वर्षाची वारंटी कंपनीने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe