कष्टाने उभारली नारळापासून विविध उत्पादने तयार करणारी कंपनी! महिन्याला आहे 20 लाखापर्यंत कमाई, वाचा यशोगाथा

सुमीला यांनी नोकरी करत असताना काहीतरी व्यवसाय करावा असे मनाशी ठरवले व आज त्या नारळापासून अनेक उत्पादने बनवतात व इतकेच नाही तर त्यांची ग्रीनौरा इंटरनॅशनल कंपनी नारळापासून बनवलेली अनेक प्रॉडक्ट संपूर्ण जगात विकते.

Published on -

Business Success Story:- कुठलीही गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट करायची आहे हे जर ठरवले तर त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते व या मेहनतीमध्ये सातत्य ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते.कुठलेही ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याचा जो काही रस्ता असतो तो सहज नसतो.

त्या मार्गावर चालत असताना असंख्य प्रकारच्या अडीअडचणी येतात व त्या अडचणीवर मात करत पुढे चालणे गरजेचे असते व तेव्हा कुठे ध्येय साध्य होत असते. कुठलीही व्यक्ती या जगामध्ये कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकतात.

तर त्यासाठी समर्पण आणि कष्ट खूप गरजेचे असतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण केरळ राज्यातील त्रिशूल या ठिकाणी राहणाऱ्या सुमीला जयराज यांची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच तरुण-तरुणींना प्रेरणादायी आहे. सुमीला यांनी नोकरी करत असताना काहीतरी व्यवसाय करावा असे मनाशी ठरवले व आज त्या नारळापासून अनेक उत्पादने बनवतात व इतकेच नाही तर त्यांची ग्रीनौरा इंटरनॅशनल कंपनी नारळापासून बनवलेली अनेक प्रॉडक्ट संपूर्ण जगात विकते.

अशाप्रकारे केली व्यवसायाला सुरुवात
सुमीला जयराज या केरळमधील त्रिशूल या ठिकाणच्या रहिवासी असून जेव्हा त्यांचे लग्न झाले त्यानंतर त्या मुंबईला राहायला गेल्या. त्यानंतर मुलांच्या संगोपन आणि घरकाम यामध्येच त्यांचा संपूर्ण वेळ जात होता. असे जवळपास सहा वर्ष गेले व त्यानंतर त्यांचे पती कामानिमित्त दुबईला शिफ्ट झाले.

मुलंही जरा मोठी झाली व ते त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त राहायला लागली. तेव्हा सुमीला यांच्या मनामध्ये आले की आता रिकामे राहण्यापेक्षा काहीतरी नोकरी तरी करावी व त्याकरिता त्या मुंबईवरून केरळला शिफ्ट झाल्या. केरळला आल्यानंतर त्यांनी व्हर्जिन कोकोनट ऑइल तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली.

परंतु या ठिकाणी काम करत असताना त्यांना व्हर्जिन कोकोनट ऑईलच्या व्यवसायामध्ये आवड निर्माण झाली. त्यापुढे व्हर्जिन कोकोनट ऑइल बनवणाऱ्या त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आले. परंतु तरी देखील त्यांचे त्या नोकरीमध्ये मन रमले नाही व त्यांनी शेवटी 2011 मध्ये नोकरीला राजीनामा देऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले.

त्यानंतर 2012 मध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी दोन महिला आणि ड्रायव्हर अशा तीन व्यक्तींना सोबत घेऊन त्यांच्या घराजवळ असलेल्या एका शेडमध्ये ग्रीननट नावाचा एक छोटा प्रॉडक्ट युनिट सुरू केले. या युनिटमध्ये ते नारळापासून डेसिकेटेड पावडर तसेच वर्जिन कोकोनट ऑइल आणि मिल्क पावडर असे नारळाचे संबंधित प्रॉडक्ट बनवायला लागले.

अगदी छोट्या स्तरावर त्यांनी सुरुवातीला व्यवसायाची सुरुवात केली व एका वर्षांनी त्यांना कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाली व या ठिकाणाहून त्यांच्या नशिबाने यशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. हळूहळू व्यवसायामध्ये जम बसवला व त्यांनी 2021 मध्ये ग्रीननट इंटरनॅशनल नावाची स्वतःच्या मालकीची एक छोटी कंपनी सुरू केली.

जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे व्यवसाय
त्यांची ग्रीनौरा सध्या ग्रीननट्स ब्रँड खाली तब्बल तेरा पेक्षा जास्त उत्पादने बनवते व वेबसाईटच्या माध्यमातून त्याची विक्री देखील करते. नारळापासून उत्पादने बनवण्यासाठी ताज्या नारळाचा वापर केला जातो व यामध्ये नारळाचे तेल तसेच नारळाचे दूध, डेसिकेटेड नारळ पावडर तसेच नारळाचा व्हिनेगर आणि नारळाचे लोणचे इत्यादी प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे त्यांनी बनवलेल्या या उत्पादनांना जगातील मलेशिया तसेच सिंगापूर, अमेरिका व युरोपीय देशातून फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत त्यांनी या कंपनीला आज यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले असून त्यांचे मासिक उत्पन्न 20 लाख रुपयांच्या घरात आहे व वार्षिक उत्पन्न जर बघितले तर तब्बल दोन कोटी चाळीस लाख रुपये आहे.

अशा पद्धतीने सुमीला जयराज यांच्या यशोगाथा वरून आपल्याला दिसून येते की जर तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली व त्याकरिता आवश्यक असलेले कष्ट जर घेतले तर नक्कीच माणूस यशाच्या शिखरावर पोहोचते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe