शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीच्या पाण्याची चिंता मिटली; 21 वर्षीय युवकाने शोधलं भन्नाट तंत्रज्ञान, असा होणार शेतकऱ्यांना फायदा

Ajay Patil
Published:

Agriculture News : जगभरात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात माणसाने वेगवेगळे शोध लावले आहेत. मंगळावर आणि चंद्रावर देखील माणसाची जाण्याची तयारी आहे. यासाठी नासा आणि इस्रो यांसारख्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मोठमोठ्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. एकंदरीत माणूस चंद्रावर जात आहे. पण आजही आपल्या देशातील शेती पारंपारिक पद्धतीनेच होत आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वावर वाढला असला तरी देखील भारतीय शेती अजूनही पारंपारिक विळख्यात अडकली आहे.

पारंपारिक तंत्राच्या माध्यमातूनच आपल्या देशात शेती होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. जरी देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असली तरी देखील शेती व्यवसायात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अजून व्यापक स्तरावर झालेला नसल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की आपल्या देशातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीमधून अपेक्षित कमाई होत नाही. याच पार्श्वभूमीवर आता देशातील काही संशोधकांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाला विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘त्या’ शिक्षकांच्या मानधनात केली मोठी वाढ; वित्त विभागाची मान्यता

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश मधील एका 21 वर्षीय युवकाने एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अधिकच सोयीचे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. या युवकाने ऍग्रो फार्मिंग सेंसर प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतीच्या जमिनीचं तापमान, आर्द्रता आणि हवेचं तापमान ओळखले जाईल आणि त्यानुसार आपोआप पिकांना पाणी दिले जाणार आहे.

यामुळे अधिकच्या पाण्याने किंवा कमी पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होणार नाही असा दावा या तंत्रज्ञानाला विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. उदय दुर्गाप्रसाद या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांन हे तंत्रज्ञान विकसित केल आहे. तो आचार्य नागार्जुन विद्यापीठात बीटेक च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. मूळचा सिरकाकुलम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उदय आपल्या गावातील शेती अगदी लहानपणापासून पहात आहे. या क्षेत्रभेटीदरम्यान मात्र त्याला असं जाणवलं की अद्याप गावातील शेतकऱ्यांना पिकाला किती पाणी दिले पाहिजे याची माहिती नाही.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अवकाळीच्या तोंडावर ‘त्या’ 12 हजार शेतकऱ्यांना मिळालेत 40 कोटी रुपये; तुम्हाला लाभ मिळाला की नाही?

शेतकरी बांधव अंदाधुंद पद्धतीने पिकांना पाणी देतात. यामुळे अनेकदा अधिक पाणी झाल्याने पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही परिणामी उत्पादन त्यांना कमी मिळत. जास्त पाणी झाले की शेतात पाणी साचते आणि यामुळे पिकावर वेगवेगळे रोग येतात. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असं काही तंत्रज्ञान विकसित करण्याचं ठरवलं ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला किती पाणी लागतं हे समजेल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनेच पिकांना पाणी देता येणे शक्य होईल. यासाठी त्याने या संशोधनावर काम सुरू केलं. त्याचे तीन वर्गमित्र राजेश, रवी तेजा आणि ज्योत्सना यांचे या प्रकल्पावर सहकार्य लाभले आणि या चौघांनी मिळून हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला.

या संशोधनाच्या माध्यमातून डिजिटल तापमान आणि ह्युमिडिटी (डीएचटी) लेव्हल सेन्सरच्या मदतीनं, ते तापमान आणि आर्द्रता ओळखण्यात यशस्वी झाले आहेत. बीएमपी280 सेन्सर आणि मॉइश्चर सेन्सरनं पिकाला आवश्यक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रेशर अॅप्टिट्युड रेग्युलराईज केलं. या तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना उदयन सांगितलं की, या तंत्रज्ञानामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये Arduino इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट विकसित करण्यात आले आहे आणि सर्व सेन्सर्स जोडलेले आहेत.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे राजधानीमधील वाहतुकीत होणार मोठा बदल; तब्बल पाच महिने ‘या’ ठिकाणची वाहतूक बंद, पहा….

यात जमिनीचा सुपीकता दर, त्यातील पोषक द्रव्ये, पाण्याची शोषण क्षमता, पीक योग्यता आणि इतर मापदंड मोजण्यासाठी सॉलिड टेस्ट घेतली जाते. यानुसार मग मातीचा प्रकार आणि चाचणी अहवालांचा अभ्यास करून ठराविक कालावधीत पिकासाठी लागणारं पाणी आणि पोषकतत्त्वांची गणना होत असते. एकंदरीत या सेंसर च्या माध्यमातून डेटा गोळा केला जातो आणि त्यानुसार पिकासाठी पाणी व्यवस्थापन केलं जातं. पाण्याव्यतिरिक्त पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले इतर पोषक घटक देखील संतुलित मात्रामध्ये यामुळे दिले जातात. याशिवाय हे तंत्रज्ञान पीक वाढीचा ही मागोवा घेण्यास सक्षम आहे.

यामुळे पीक वाढीसाठी आवश्यक असलेल्या घटकांची पूर्तता शेतकऱ्यांना करता येणे शक्य होणार आहे. पीकवाढी मध्ये कोणत्या समस्या येत आहेत याची शेतकऱ्यांना माहिती झाल्यानंतर शेतकरी या समस्येचे निराकरण करू शकणार आहेत आणि पीक उत्पादन वाढवू शकणार आहेत. सध्या उदय व त्याची टीम हे तंत्रज्ञान कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. निश्चितच उदय यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले हे काम कौतुकास्पद असून यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा :- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जारी केलेला नंबर नॉट रीचेबल; आता शेतकऱ्यांनी करावं काय?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe