Ahmednagar News : राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांचे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अतोनात असे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला का शिरावला गेला होता.
आता रब्बी हंगामात ही निसर्गाचे हे दुष्टचक्र कायमच असून शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेला पीक पुन्हा एकदा वाया गेल आहे. दरम्यान आता येणाऱ्या मान्सून बाबत देखील वेगवेगळे तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. अमेरिकन हवामान विभागाने भारतासहित आशिया खंडात यंदा अलनिनोमुळे तुम्ही पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा देशात दुष्काळी परिस्थिती यामुळे निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून देखील आत्तापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र भारतीय वैज्ञानिकांनी याविषयी आत्तापासूनच अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान आता पारनेरच्या ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात होणाऱ्या अढी-गुढी अर्थातच होईकाच्या कार्यक्रमात यंदा पावसाळी काळात पाऊसमान कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा :- कांदा सानुग्रह अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री भुसेंनी थेट तारीखच सांगितली
सालाबादप्रमाणे या मंदिरात याहीवर्षी होईकाचा कार्यक्रम झाला. खरं पाहता पारनेरच्या ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात दरवर्षी गुढीपाडव्याच्या महूर्तावर अढीगुढी सोहळा, कार्यक्रम पार पडत असतो. याही वर्षी परंपरागत पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित झाला होता. बुधवारी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात पावसाअभावी खरीप व रब्बी हंगामातील शेती उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे तसेच येत्या वर्षात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कसा असतो हा अढी-गुढीचा कार्यक्रम?
पारनेर व परिसरात असे म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यात पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात होणारा अढी-गुढी (होईक) कार्यक्रमाला मोठं महत्त्व प्राप्त आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा अविरतपणे सुरू आहे. परिसरातील नागरिक यामध्ये मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. यावर्षीही हा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमासाठी मंदिराच्या प्रांगणात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अधिक मासासह एकूण 13 मराठी महिन्यांचे 13 तसेच राजा व प्रधान यांचे प्रत्येकी एक असे एकूण 15 आढय़ा (खड्डे) करण्यात आले होते.
हे पण वाचा :- आता नवीन वाद पेटणार ! समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1000 कोटींचा घोटाळा?; राज्यात एकच खळखळ
यानंतर मग या आढय़ांमध्ये पाणी भरण्यात आले. पाणी जिरल्यानंतर यामध्ये हळद लावलेली ज्वारी वडाच्या पानांत गुंडाळून आडय़ांमध्ये ठेवण्यात आली. त्यावर दगड ठेवण्यात आले होते. यानंतर पुन्हा एकदा आढय़ा पाण्याने भरण्यात आल्या. यानंतर मग या आढीच्या पूजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी सकाळी पोलीस पाटील प्रताप औटी व भैरवनाथ मंदिराचे पुजारी संतोष पुजारी यांनी याचे पूजन केले. आढी पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर वडाच्या पानात गुंडाळलेली ज्वारी पुन्हा बाहेर काढण्यात आली.
यामध्ये अधिक महिना वगळता इतर सर्व आढय़ांमधील वडाची पाने कोरडी निघाली असल्याची माहिती देण्यात आली. त्यावरून येत्या वर्षात ज्वारी ज्या पद्धतीने कोरडी निघाली त्या पद्धतीने पावसाळा कोरडा जाईल अर्थातच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल अशी भाकणूक एकंदरीत यामध्ये वर्तवण्यात आली. शिवाय रोगराई आणि महागाई देखील वाढेल असेही सांगितलं जात आहे. निश्चितच यंदाच्या पावसाळ्यात पाऊस कमी राहणार असल्याचा हा अंदाज शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर घालणारा आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाच वर्षांपासून बंद असलेला ‘हा’ पूल ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार,…