अहमदनगरच्या ‘त्या’ सरपंचाचा अभिनव उपक्रम! शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या नववधूला मिळणार ‘इतक्या’ हजाराचं स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Ahmednagar Viral News : भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 ते सत्तर टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल जात. विशेष बाब अशी की शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत.

दरम्यान वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आता शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जात असून शेतीमधून अधिक उत्पादन कशा पद्धतीने मिळवले जाईल यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळ तंत्रज्ञान शिकवलं जात आहे. अलीकडे नवयुवकांनी देखील चांगले शिक्षण घेतलेले असतानाही शेतीमध्ये आपलं नशीब आजमवायला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र; पाऊस, वादळ, महापूर, गारपीट, दुष्काळ याचा निसर्गाच्या संकेतावरून अंदाज कसा लावायचा? डख…

निश्चितच शेतीप्रधान देशासाठी ही एक चांगली बाब आहे. लॉंग टर्म मध्ये यापासून देशाला निश्चितच चांगला बेनिफिट मिळणार आहे. मात्र तूर्तास ग्रामीण भागात एक भयावय सत्य समोर येत आहे. खरं पाहता, ग्रामीण भागातील नवयुवक वयाच्या पस्तीशीच्या उंबरठ्यावर पोहचूनही अविवाहित आहेत. मुलींना आता शेतकरी नवरा नको ग बाई असं वाटू लागलं आहे. यामुळे कृषीप्रधान देशात जर शेतकरी मुलाला पसंती दिली जात नसेल तर निश्चितच ही एक चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे शेतकरी पालक देखील आपल्या मुलीचे लग्न हे सरकारी नोकरदार किंवा चांगल्या उच्च पगारावर असलेल्या खाजगी नोकरदाराशी आपल्या मुलीच्या लग्नाची लगीनगाठ बांधत आहेत.

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगरकरांना मिळणार गोड बातमी ! पुणे-अहमदनगर रेल्वे सुरु होणार, रेल्वे बोर्डाच्या सदस्याने दिली माहिती

शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या मुली देखील शेतकरी मुलाऐवजी नोकरदार मुलालाच पसंती देतात. यामुळे वयाची 30 ते 35 वर्ष उलटूनही अनेक शेतकरी मुलांचे लग्न झालेली नाहीत, अद्याप ते लग्नाळूच आहेत. दरम्यान आता ही परिस्थिती बदलावी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातुन एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील मौजे दरेवाडी येथील सरपंच आनंदा दरगुडे यांनी शेतकरी अर्थांनी योजना सुरू केली आहे. या शेतकरी अर्धांगिनी योजनेअंतर्गत शेतकरी मुलांसोबत मुलींनी लग्न केलं तर अशा मुलींना पाच हजार 555 रुपयांची रोख रक्कम आणि संसार उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. यामुळे सध्या अहमदनगरच्या या सरपंचाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा :- नोकरदारांसाठी कामाची बातमी! तुमच्या खात्यात किती पीएफ जमा झाला माहिती आहे का? नाही ना मग ‘या’ पद्धतीने 2…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe