धकधक गर्ल माधुरी दीक्षितची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

Ahmednagarlive24
Published:

बॉलीवूडवर आणि रसिकांच्या मनावर आपल्या अदांनी व सौंदर्याने अधिराज्य गाजवणार्‍या धकधक गर्ल अर्थात माधुरी दिक्षित सर्वांना सुपरिचित आहे. तिचे श्रीराम नेने यंच्याशी लग्न झाले आहे.

परंतु तिची लव्ह स्टोरी खूप थोडक्यांना माहीत आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही.

तिचा ‘बकेट लिस्ट’हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

माधुरी तिच्या प्रेमकथेबद्दल सांगताना म्हणते की, ती लॉस एंजेलिसला भावाला भेटायला गेली असता तिथे तिची भेट श्रीराम नेनेंशी झाली. तेव्हा श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती.

यानंतर त्यांच्या भेटी- गाठी होत गेल्या. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या मुलाखतीत माधुरी दीक्षितचे कोणावर क्रश आहे? असा प्रश्न विचारला होता.

यावर उत्तर देताना ती म्हणाली की, माझे कोणावरही क्रश नाही. लोकांचे माझ्यावर क्रश असते. यानंतरचा प्रश्न होता माधुरी दीक्षितचे खरे नाव काय आहे? माधुरी दीक्षित हेच तिचे खरे नाव असल्याचे माधुरीने सांगितले.

आपल्या डाएटबद्दल बोलताना माधुरी म्हणाली की, तिच्या आहारात जास्तीत जास्त फळं आणि भाज्या असतात.

तसेच माधुरी ‘जीवन एक संघर्ष’ या सिनेमासाठी आयुष्यात पहिल्यांदा परदेशात गेली होता. तिच्या दोन्ही मुलांना माधुरीचा ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा आवडतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment