सतेज पाटील यांनी केला छत्रपतींच्या घराण्यातील सुनेचा अपमान? काय घडले होते त्या दिवशी कोल्हापूरमध्ये? सतेज पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका

माघारी नाट्यामध्ये मात्र काँग्रेसचे नेते सतेज पाटील चांगलेच भडकल्याचे दिसून आले. कारण त्यांनी उत्तर कोल्हापूरची निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली असून ऐनवेळी मधुरीमा राजे यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मात्र सतेज पाटील अत्यंत भडकल्याचे दिसून आले व त्यांनी रागाच्या भरात छत्रपती घराण्याच्या सुनेवरच टीका केल्याचे दिसून आले.

Published on -

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून सगळीकडे नुसता निवडणुकीचा धुराळा उठल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्ज माघारीच्या दिवसानंतर राज्यामध्ये प्रचाराने वेग घेतला असून अनेक ठिकाणी दिग्गजांच्या सभा देखील पार पडायला लागल्या आहेत व त्यामुळे आता या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत सर्वांचा उत्साह मात्र शीगेला पोहोचल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र अर्ज माघारीच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदार संघामधून एक वेगळीच घटना समोर आली होती व ती म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपती घराण्याच्या सुनबाई व खासदार शाहू महाराज यांचे पुत्र मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी अर्ज माघारीच्या दिवशी अचानकपणे अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये काँग्रेसचे जे काही बंडखोर उमेदवार होते त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नाही व त्यामुळे मधुरिमा राजे छत्रपती यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मागे घेतली. परंतु या सगळ्या माघारी नाट्यामध्ये मात्र काँग्रेसचे नेते सतेज पाटील चांगलेच भडकल्याचे दिसून आले. कारण त्यांनी उत्तर कोल्हापूरची निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली असून ऐनवेळी मधुरीमा राजे यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मात्र सतेज पाटील अत्यंत भडकल्याचे दिसून आले व त्यांनी रागाच्या भरात छत्रपती घराण्याच्या सुनेवरच टीका केल्याचे दिसून आले.

यावेळी बोलताना त्यांनी दम न होता तर कशाला उभे राहिलात? यासोबतच झक मारलीस अशा शब्दांमध्ये राग व्यक्त केला. विशेष म्हणजे त्यांचे हे सगळे कृत्य सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले.

परंतु या घटनेने मात्र महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला गेला असून अशा प्रकारचे शब्द हे काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातील नसून शिवछत्रपतींच्या घराण्यातील सुनेच्या विरोधात आहेत व हे कृत्य छत्रपतींच्या घराण्याचा अपमान असल्याची भावना महाराष्ट्रातून व्यक्त होताना दिसून येत आहे.

सतेज पाटील यांनी बिनशर्थ माफी मागण्याची होत आहे मागणी
आपल्याला माहित आहे की,महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या दोन गाद्या असून त्या खूप आदरणीय आहेत. शिवछत्रपती हे संपूर्ण भारताची अस्मिता असून या दोन्ही गाद्यांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. शिवरायांच्या घराण्यातील सुनेच्या विरोधात असल्या भाषेत टीका करणारे सतेज पाटील व त्यांच्या काँग्रेसचा माज उतरवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता स्वस्त बसणार नाही अशा प्रतिक्रिया देखील महाराष्ट्रातून उमटताना दिसून येत आहेत.

इतकेच नाही तर या कृत्याबद्दल सतेज पाटील यांनी शिवरायांच्या घराण्याची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रातून होताना दिसून येत आहे. इतकेच नाही तर ज्यावेळी विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला होता तेव्हा शिवप्रेमी संघटनांनी या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आवाज उठवला व प्रशासनाला या अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करायला भाग पाडले होते.

तेव्हा मात्र सतेज पाटील हे अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने गडावर गेले होते. आज छत्रपती घराण्यातील सुनेच्या विरोधामध्ये असल्या शब्दात टीका करणाऱ्या सतेज पाटलांची हिम्मत विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधामध्ये का दिसून आली नाही असा देखील प्रश्न आता विचारला जात आहे.

याआधी देखील शरद पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी केला आहे छत्रपती घराण्याचा अपमान?

1- शरद पवारांनी संभाजी राजे छत्रपतींचे उडवली होती खिल्ली- याआधी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून छत्रपती घराण्याचा अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून वक्तव्य करण्यात आलेली आहेत.

यामध्ये जर शरद पवार यांचे वक्तव्य बघितले तर त्यांनी कोल्हापूर गादीचे प्रतिनिधी असलेले श्रीमंत शाहू महाराज यांचे सुपुत्र युवराज संभाजी राजे छत्रपती यांना जेव्हा राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेत खासदारकी मिळाली होती त्यावेळी शरद पवार यांनी म्हटले होते की,आतापर्यंत राजे हे पेशव्यांची नियुक्ती करत होते.

परंतु आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करू लागले. अशा प्रकारचे वक्तव्य तेव्हा पवारांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जर बघितला तर तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता.

जर संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेवर घेण्यामागे निर्णयाचा उदात्त हेतू बघितला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करून त्यांच्या वंशज यांना प्रतिनिधित्व द्यावे हा एक उदात्त हेतू होता. परंतु तेव्हा देखील शरद पवारांनी अशा पद्धतीने खिल्ली उडवली होती.

2- संजय राऊत यांनी देखील केला होता अपमान- आपल्याला माहित आहे की संजय राऊत यांनी देखील अत्यंत खालच्या दर्जाचे टीका छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज यांच्या बद्दल केली होती.

यावेळी संजय राऊत म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज यांची कागदपत्रे तपासली पाहिजेत. असल्या पद्धतीचे वक्तव्य करण्याचे धाडस संजय राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठिंबा शिवाय करू शकणार नाहीत अशी प्रतिक्रिया तेव्हा उमटली होती. तेव्हा देखील भाजप वगळता इतर कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा निषेध केला नव्हता.

3- उद्धव ठाकरे यांचे ‘ती’ अट देखील अपमानास्पदच होती- जून 2022 मध्ये महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा महायुती व महाविकास आघाडी या दोघांपैकी कुणाकडेही उमेदवार निवडून आणण्याची क्षमता न होती. तेव्हा संभाजी राजे छत्रपती यांनी सर्वांनी आपल्याला बिनशर्थ पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे आवाहन केले होते.

यावेळी मात्र संभाजी राजे छत्रपती यांनी मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधावे अशी अट उद्धव ठाकरे यांच्याकडून घालण्यात आली होती. जर छत्रपती घराण्याचा इतिहास बघितला तर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर त्यांना न बोलता स्वतः कोल्हापूरला जाऊन त्यांना उमेदवारी देणे यामध्ये अपेक्षित होते.

परंतु त्यांनी तसे न करता संभाजी राजे छत्रपती यांनाच मातोश्रीवर बोलवल्याचा प्रकार घडला. या सगळ्या प्रकारामुळे मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी मातोश्री वर जाण्याचे टाळले व शिवबंधन देखील बांधायचे नाकारले. उद्धव ठाकरे यांच्या या कृतीमुळे देखील एक प्रकारे छत्रपती संभाजी राजे यांचा अपमानच केला गेला असे दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe