तुमच्याही मोबाईल नंबरमध्ये ‘हे’ अंक जोडून आहेत का? असतील तर जीवनात येऊ शकतील अनेक समस्या? वाचा माहिती

अंकशास्त्रामध्ये मोबाईल क्रमांक व त्यासंबंधी जीवनावर पडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम इत्यादी बद्दल देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अंकशास्त्रानुसार बघितले तर अनेक मोबाईल क्रमांकामध्ये अनलकी नंबरच्या जोड्या जुळलेल्या असतात व अशा अंकांच्या जोड्यांमुळे जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Ajay Patil
Published:

Numerology:- ज्याप्रमाणे भारतीय परंपरेमध्ये ज्योतिषशास्त्राला महत्त्व आहे. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्राला देखील तितकेच महत्त्व आहे. आपल्याला माहित आहे की, ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीची जन्मतारीख तसेच त्याचा जन्मवार व जन्मवेळ इत्यादी वरून व्यक्तीचे भविष्य ठरवले जाते किंवा सांगितले जाते.

अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार व्यक्तीची जन्म तारीख व त्या जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो व त्यावरून व्यक्तीचे भविष्य तसेच त्याचे व्यक्तिमत्व व स्वभाव इत्यादी सांगितला जातो. त्यामुळे अंकशास्त्राला देखील ज्योतिषशास्त्र इतकेच महत्त्व आहे.

इतकेच नाहीतर अंकशास्त्रामध्ये मोबाईल क्रमांक व त्यासंबंधी जीवनावर पडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम इत्यादी बद्दल देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अंकशास्त्रानुसार बघितले तर अनेक मोबाईल क्रमांकामध्ये अनलकी नंबरच्या जोड्या जुळलेल्या असतात व अशा अंकांच्या जोड्यांमुळे जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे मोबाईल क्रमांक घेताना सदरील नंबर घेण्याचे टाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्या नंबरच्या जोड्या अनलकी ठरतात? याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेऊ.

तुमच्याही मोबाईल क्रमांकामध्ये आहेत का या अंकांच्या जोड्या?

1- क्रमांक 27 आणि 72- आपल्याला माहित आहे की,मोबाईल क्रमांकामध्ये दहा अंक असतात व यामध्ये अंक हे एकमेकांना जोडून येतात. परंतु अशात जोडून येणारे काही अंक मात्र योग्य किंवा चांगले नसतात. मोबाईल क्रमांकामध्ये जर 27 आणि 72 क्रमांक जोडून आले असतील तर ते दुर्भाग्याचे किंवा अनलकी ठरते.

27 आणि 72 हे क्रमांक मोबाईल क्रमाकांमध्ये कोणत्याही ठिकाणी एकत्र आले तर अशा लोकांना सांधेदुखी तसेच युरीन इन्फेक्शन यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तसेच व्यवसायामध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी येतात. हे लोक पैसे भरपूर कमावतात परंतु त्याचा योग्य वापर करू शकत नाही. अशा लोकांना अनेक वेळा नोकरी देखील बदलावी लागते.

2- क्रमांक 26 आणि 62- व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकामध्ये जर कुठेही 26 किंवा 62 नंबर एकत्र आले असेल तर अशा व्यक्तीच्या शिक्षणामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडचणी निर्माण होतात. तसेच नवविवाहित मुलगी असेल तर तिचे तिच्या सासू सोबत चांगले संबंध राहत नाहीत.

तसेच अशा लोकांना नेहमी पैशांची अडचण भासते. मुले असतील तर ते मुलींच्या मागे नाहक वेळ आणि पैसा वाया घालवतात. तसेच अशा लोकांना डायबेटीस होण्याची शक्यता असते व कुटुंबात अनेकदा विनाकारण वाद होतात. त्यामुळे अशा प्रकारचा नंबर घेणे टाळावे.

( टीप- वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. याला कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय पुरावा नाही. ही माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे व याबद्दल अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe