Driving License:- आधार कार्ड, पॅन कार्ड या सोबत ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना हे कागदपत्र देखील महत्वाचे कागदपत्र असून तुम्ही जेव्हा रस्त्यावर वाहन चालवत असतात तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या जवळ असणे खूप गरजेचे आहे.
आता आपल्याला माहित आहेस की ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्हाला काढायचे असेल तर आरटीओ ऑफिसच्या हेलपाट्या मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. एक लांबलचक प्रोसेस असते व कधीकधी मध्यस्थ लोकांना याकरिता आपल्याला पैसे देखील द्यावे लागतात.
या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याचदा खूप वेळ आणि खर्च देखील होत असतो. परंतु जर हेच ड्राईविंग लायसन्स तुम्हाला घरी बसून बनवता आले तर खूप चांगले होईल असा विचार प्रत्येकाच्या मनात बऱ्याचदा येत असेल. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या बनवू शकतात
किंवा नवीन लायसन्स किंवा लायसन्स सह त्यावरील पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आता अर्ज करू शकता. हा फॉर्म सोप्या पद्धतीने जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही आधार इ केवायसीचा वापर करू शकतात. मोबाईल वरून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी कसा अर्ज करावा लागतो याची संपूर्ण प्रक्रिया आपण या लेखात पाहणार आहोत.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
1- त्याकरता सर्वात प्रथम तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan# साइटवर जावे लागेल व या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस या कॉलम मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस हा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
2- त्यानंतर असलेल्या ड्रॉप डाऊन मेनू मध्ये अप्लाय फॉर लर्नर लायसन्स वर क्लिक करावे लागेल व या ठिकाणी तुम्ही eKYC आधारचा वापर केला तर टेस्ट साठी आरटीओ ऑफिसला तुम्हाला जावे लागणार नाही. तुम्ही घरी बसून लर्नर लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकतात. जर तुम्ही या ठिकाणी नॉन आधार इ केवायसी हा पर्याय निवडला तर आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल.
3- त्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हा पर्याय निवडावा लागेल व आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी हा नंबर व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर आधार इ केवायसीच्या माध्यमातून सगळी माहिती आपोआप भरली जाईल.
4- जर तुम्ही नॉन आधार इ केवायसी पर्यायाची निवड केली असल्यास यामध्ये फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉगिन करावे लागेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एप्लीकट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग/ लर्नर लायसन्स हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या जवळील आरटीओची निवड या माध्यमातून करावी लागते. त्यानंतर इतर आवश्यक माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा व स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्ट करीता स्लॉट बुक करा.
5- ऑनलाइन टेस्ट करिता लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर मिळतील. ऑफलाइन टेस्ट करता तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागते. या पद्धतीने लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला प्रिंट लर्नर लायसन्स पर्यायावर जाऊन ते डाऊनलोड करू शकतात.
ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर काय करावे?
जर ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यासंबंधी तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. तक्रार नोंदवल्यानंतर त्या तक्रार ची एक प्रत तुमच्याजवळ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर नोटरी कार्यालयामध्ये जावे आणि एक प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावे. यामध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे अशा पद्धतीने उल्लेख केला जाणे महत्त्वाचे असते.