डिझायर ठरली मारुतीची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंग कार! NCAP क्रॅश टेस्टिंग मध्ये प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी मिळाले उच्च गुण

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये मारुती सुझुकीच्या येणाऱ्या सेडान डिझायरला पाच स्टार रेटिंग मिळाले असून यामध्ये प्रौढांसाठी 34 पैकी 31.24 तर मुलांच्या सुरक्षिततेकरिता 49 पैकी 39.20 गुण मिळाले आहे. प्रौढ व मुलांसाठी घेण्यात आलेल्या व्यवसायिक संरक्षण क्रॅश चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात.

Published on -

Global NCAP Crash Test:- कुठलीही कार घेण्याअगोदर ज्याप्रमाणे आपण त्या कारची किंमत आणि त्यामध्ये मिळत असलेली वैशिष्ट्ये यांचा विचार करतो. अगदी त्याचप्रमाणे त्या कारमध्ये देण्यात आलेल्या सुरक्षा विषयीची फीचर्स पाहणे देखील तितकेच गरजेचे असते व याकरिता संबंधित कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये किती रेटिंग मिळाली आहे हे देखील आपल्याला माहित असणे तितकेच गरजेचे आहे.

कारण कार खरेदी करताना ती एखाद्या अपघात समयी किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहीत असणे कधीही फायद्याचे असते. या दृष्टिकोनातून जर आपण मारुती सुझुकी कंपनीची काही दिवसात येणारी सेडान डिझायर चा विचार केला तर तिला नुकत्याच झालेल्या ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये पाच स्टार रेटिंग मिळाली आहे.

आठ नोव्हेंबर रोजी हे निकाल जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे मारुतीची पाच स्टार मिळवणारी ही पहिली कार ठरणार आहे. जिला कोणत्याही क्रश टेस्ट एजन्सी कडून प्रदान करिता पाच स्टार आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चार स्टार रेटिंग देण्यात आली आहे.

क्रॅश टेस्टिंगमध्ये प्रौढांसाठी मिळाले 31.24 तर मुलांच्या सुरक्षाकरिता मिळाले 39.20 गुण
ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये मारुती सुझुकीच्या येणाऱ्या सेडान डिझायरला पाच स्टार रेटिंग मिळाले असून यामध्ये प्रौढांसाठी 34 पैकी 31.24 तर मुलांच्या सुरक्षिततेकरिता 49 पैकी 39.20 गुण मिळाले आहे. प्रौढ व मुलांसाठी घेण्यात आलेल्या व्यवसायिक संरक्षण क्रॅश चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात.

त्यामधील फ्रंटल इम्पॅक्ट टेस्टच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये 64kmph वेगाने घेण्यात आलेल्या फ्रंटल इम्पॅक्ट टेस्टमध्ये डिझायरला 16 पैकी 13.23 गुण मिळाले. या प्रकारच्या टेस्टमध्ये ड्रायव्हरच्या छातीचे संरक्षणासाठी मार्जिनल तर प्रवाशांच्या छातीचे संरक्षण पुरेसे या प्रकारचे वर्णन या प्रकारच्या टेस्ट मध्ये करण्यात आले.

दुसरे म्हणजे कारमधील प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्या गुडघ्याचे आणि डोक्याचे संरक्षणासाठी चांगले असे वर्णन करण्यात आले. तसेच दुसऱ्या प्रकारची टेस्ट बघितली तर ती साईड इम्पॅक्ट टेस्ट असून साठी कार 50 किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आली यामध्ये 16 पैकी 16 गुण या कारला मिळाले.

तसेच साईड पोल इम्पॅक्ट टेस्ट मध्ये ड्रायव्हरचे पोट आणि नितंब यांची सुरक्षितता चांगली असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे या तीन टेस्टच्या आधारे प्रौढ संरक्षण श्रेणी ठरवण्यात आली व यामध्ये 34 पैकी 31.24 गुण मिळाले.

कार मधील मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन क्रॅश टेस्ट
या प्रकारच्या टेस्टमध्ये देखील प्रौढांसाठी घेण्यात येणाऱ्या टेस्ट सारखेच काही प्रकार असतात. यामध्ये फ्रंटल इम्पॅक्ट टेस्टमध्ये तीन वर्षाच्या मुलाचे डमी समोरासमोर बसवण्यासाठी बनवली गेली व यामध्ये डोके आणि मानेच्या भागाला संपूर्ण संरक्षण मिळाले.

परंतु जेव्हा समोरून टेस्ट घेण्यात आली तेव्हा मानेच्या भागाला मर्यादित संरक्षण मिळाले. तसेच या चाचणी दरम्यान 18 महिन्यांच्या बाळाची डमी पाठीमागे असलेल्या सीटवर इंस्टॉल करण्यात आलेली होती व या टेस्टमध्ये डोक्याला संपूर्ण संरक्षण यामध्ये मिळाले.

तसेच दुसऱ्या प्रकारची चाचणी म्हणजे साईड इफेक्ट चाचणी होय व यामध्ये दोन्ही डमीच्या बाल प्रतिबंध प्रणालीने संपूर्ण संरक्षण प्रदान केले असून बालसंरक्षण श्रेणीमध्ये 49 पैकी 39. 20 गुण मिळवले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe