अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्षाचा प्रयत्न ! संत ज्ञानेश्वर मंदीराचा आराखडा तयार करण्याच्या निर्णयाचे स्वागत – ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहिल्‍यानगर मधील श्री.संत ज्ञानेश्‍वर मंदिराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी अर्थसंकल्पातून करण्‍यात आलेल्‍या निर्णयाचे आपण स्‍वागत करीत असून, जिल्‍ह्याच्‍या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकसीत होणा-या ज्ञानेश्‍वर सृष्‍टीचे स्‍वप्‍न महायुती सरकारच्‍या सह‍कार्याने पुर्णत्‍वास जाईल असा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

Published on -

महायुती सरकारचा लोककल्‍याणकारी अर्थसंकल्‍प शेतकरी, महीला आणि युवक यांच्या उत्कर्षाचा असून, गायीच्या दूध करीता पाच रुपयांच्‍या अनुदानासह महिलांना प्रोत्‍साहन युवकांना संधी आणि वारकरी बांधवाना सामाजिक सुरक्षा देणा-या अर्थसंकल्‍पातून सामाजिक उत्कर्ष साध्‍य करण्‍याचा प्रयत्‍न यशस्वी होईल.नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीराचा विकास आराखडा तयार करण्याच्या निर्णयाचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे.

राज्‍यातील शेतक-यांच्‍या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्‍याचा संदेश आजच्‍या या अर्थसंकल्‍पातून मिळाला असून, पीकविमा योजने बरोबरच नमो किसान सन्‍मान योजना, सोयाबीन आणि कापूस उत्‍पादकांना पाच हजार कोटी रुपयांची मदत, कांदा उत्‍पादकांना अनुदान देण्‍याच्‍या निर्णया बरोबरच गायीच्‍या दूधासाठी १ जुलै २०२४ पासून पाच रुपयांचे अनुदान देण्‍याच्‍या निर्णयाचे मंत्री विखे पाटील यांनी स्‍वागत केले आहे.

दूग्ध व्‍यवसायाला पाठबळ देताना अहिल्‍यादेवी मेंढी शेळी पालन विकास महामंडळातून रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्यासही दिलेली चालना महत्‍वपूर्ण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री अन्‍नपुर्णा योजना, मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण,तसेच मुलीना मोफत शिक्षण व परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णया बरोबरच राज्‍यातील अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस आणि बचत गटातील महीलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देण्‍याची तरतुद निश्चितच महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणा करीता महत्‍वपूर्ण आहे.

अहिल्‍यानगर मधील श्री.संत ज्ञानेश्‍वर मंदिराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी अर्थसंकल्पातून करण्‍यात आलेल्‍या निर्णयाचे आपण स्‍वागत करीत असून, जिल्‍ह्याच्‍या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकसीत होणा-या ज्ञानेश्‍वर सृष्‍टीचे स्‍वप्‍न महायुती सरकारच्‍या सह‍कार्याने पुर्णत्‍वास जाईल असा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe