नादखुळा ! युट्युबचे व्हिडिओ पाहून सुचली विदेशी भाजीपाला लागवडीची कल्पना ; आता कमवतोय लाखों

Farmer Success Story : अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब चा वापर मोठा वाढला आहे. कोणत्याही बाबी विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर युट्युब किंवा गुगलच्या माध्यमातून सहजतेने माहिती आता लोकांना उपलब्ध होऊ लागली आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव देखील आता मोठ्या प्रमाणात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू लागले आहेत.

याच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण सुलभ झाली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची देखील आता यामुळे माहिती उपलब्ध होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील युट्युबवर व्हिडिओ पाहून विदेशी भाजीपाला शेती यशस्वी करून दाखवली आहे.

विशेष म्हणजे या विदेशी भाजीपाला पिकाच्या शेतीतून हा अवलिया शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहे. दरम्यान आज आपण या अवलियाची यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यातील येळगाव येथील विष्णू गडाख नामक शेतकऱ्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मात्र उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरी ऐवजी शेतीला निवडलं. विशेष म्हणजे आपल्या ज्ञानाचा त्यांनी शेतीमध्ये वापर केला.

वेगवेगळे प्रयोग त्यांनी आपल्या शेतीत राबवले आहेत. याच प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दोन एकर वडीलोपार्जित शेत जमीनीपैकी अर्धा एकरावर विदेशी भाजीपाला लागवडीचा प्रयोग केला आहे. दरम्यान ते आपल्या दीड एकर शेत जमिनीवर पारंपारिक पिकांची शेतीही करतात. म्हणजेच पारंपारिक पिकांना देखील बगल दिली नाही आणि फक्त पारंपारिक पिकांचीचं शेती न करता त्यांनी नगदी भाजीपाला वर्गीय पिकांची देखील लागवड केली आहे.

विशेष म्हणजे विष्णू यांनी उत्पादित केलेला दीड एकरावरील विदेशी भाजीपाला त्यांनी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री करणे ऐवजी स्वतः बाजारपेठेत जाऊन थेट ग्राहकांना विक्री केला आहे. यामुळे त्यांना अधिक नफा राहिला असून ग्राहकांना देखील चांगला दर्जेदार भाजीपाला मिळाला आहे. विक्रीचे व्यवस्थापन सुयोग्य असल्याने त्यांना भाजीपाला लागवडीतून अवघ्या चार महिन्यात अर्धा एकर शेत जमिनीवर सव्वा लाखाचा निव्वळ नफा राहिला.

गडाख आपल्या दीड एकर शेत जमिनीवर गहू हरभरा यांसारख्या पारंपारिक पिकांची लागवड करतात. तसेच अर्धा एकर शेत जमिनीवर विदेशी भाजीपाला पिकांची लागवड करतात. यामध्ये ब्रोकली, रेड कॅबेज, लेटुस, सॅलेरी, झुकिनी, लोलोरुसा, टरनिप, शलगम अशा २२ ते २५ प्रकारच्या भाज्यांची लागवड गडाख करत आहेत. निश्चितच प्रयोग हा छोटाच आहे तसेच जगावेगळा देखील नाही. मात्र योग्य नियोजन आखून केवळ अर्ध्या एकर शेत जमिनीत गडाख यांनी सव्वा लाखांची कमाई करून इतरांसाठी आदर्श रोवला आहे.

नवयुवक शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! ‘या’ हंगामी पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवलं 5 लाखांचं उत्पन्न ; वाचा ही यशोगाथा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe