Property Law:- भारतामध्ये प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे कायदे असून ते प्रॉपर्टीचे हस्तांतरण किंवा प्रॉपर्टीमध्ये असणारा अधिकार याबाबतीत स्पष्टता आणतात. आता लग्न म्हटले म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा असा प्रसंग असतो व यामध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांचे घर वगैरे सोडून पतीसोबत राहायला येते व संपूर्ण नवीन कुटुंब असते.
परंतु जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा साहजिकच प्रॉपर्टीच्या बाबतीत काही प्रश्न आपल्या मनात येतात. म्हणजे मुलगी लग्न होऊन आल्यानंतर तिचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टीवर अधिकार असतो का? तसेच तिच्या सासर्यांच्या प्रॉपर्टीवर सून म्हणून तिचा काय हक्क असतो? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात.

जर आपण कायदेशीर दृष्ट्या बघितले तर सध्या महिलांना अनेक अधिकार देण्यात आलेले आहेत व असेच काही कायदेशीर अधिकार लग्नानंतर देखील महिलांना दिले जातात.
पतीच्या संपत्तीवर लग्नानंतर पत्नी म्हणून काय अधिकार असतो?
हिंदू उत्तराधिकारी कायदा, भारतीय उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायदा जर बघितले तर यामध्ये कोणत्याही मालमत्तेचा वारसा ठरवण्यात या कायद्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. या कायद्यांमध्ये मालमत्तेवर नेमका कुणाचा किती अधिकार आहे हे निश्चित केलेले आहे.
या कायद्यानुसार बघितले तर केवळ लग्न केल्यामुळेच पत्नीला तिचा पती किंवा सासरच्या मालमत्तेवर हक्क मिळत नाही तर तो अनेक परिस्थितीवर अवलंबून असतो. यामध्ये जर आपण बघितले तर भारतीय कायद्यानुसार पती जिवंत असताना पत्नीला त्याने स्वतः मिळवलेल्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो.
मात्र पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला मालमत्तेत हक्क मिळतो. परंतु जर मृत्यू होण्यापूर्वी त्याने इच्छापत्र लिहून ठेवले असेल तर त्या आधारे त्याच्या मालमत्तेवरील वारसदार ठरवले जातात. सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे जर पतीने त्याच्या मृत्युपत्रात पत्नीच्या नावाचा समावेश केला नसेल तर तिला मालमत्तेत हक्क मिळत नाही.
परंतु कायदेशीर नियमानुसार बघितले तर घटस्फोट किंवा पतीपासून विभक्त झाल्यास महिलेला मात्र पतीकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार मात्र आहे. विभक्त झाल्यानंतर पत्नी पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही.
सासऱ्यांच्या संपत्तीवर सून म्हणून काय असतात अधिकार?
जर आपण हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम आठ नुसार बघितले तर महिलेला पती किंवा सासरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर देखील दावा करता येणार नाही. परंतु पतीचा जर मृत्यू झाला तर त्यानंतर मात्र सासरच्या मालमत्तेत मात्र महिलेला हक्क मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर तिला पतीचा वाटा यामध्ये मिळू शकतो.