असेल बजेट 6 ते 6.50 लाखांचा तर ‘या’ 3 SUV कार आहेत बेस्ट ऑप्शन! तुमच्याच बजेटमध्ये मिळेल तुम्हाला उत्तम कार

आपण कारच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कार घेताना कोणतीही व्यक्ती सगळ्यात अगोदर आपला बजेट आणि त्या बजेटमध्ये मिळणारी उत्तम अशी कार प्रामुख्याने निवडण्यावर किंवा शोधण्यावर भर देत असते.

Ajay Patil
Published:
budget suv car

Budget SUV Car:- सणासुदीच्या कालावधीमध्ये असो किंवा इतर कालावधीमध्ये बरेचजण कार खरेदी करतात. तसे पाहायला गेले तर स्वतःचे घर आणि त्या घरापुढे चारचाकी असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे कित्येक जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात.

यामध्ये जर आपण कारच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कार घेताना कोणतीही व्यक्ती सगळ्यात अगोदर आपला बजेट आणि त्या बजेटमध्ये मिळणारी उत्तम अशी कार प्रामुख्याने निवडण्यावर किंवा शोधण्यावर भर देत असते.

भारतीय कार बाजारपेठेचा विचार केला तर सध्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून अनेक बजेटमधील कार मॉडेल्स वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

त्यामुळे ग्राहकांना देखील आता कार खरेदी करताना निवड करणे सोपे होते. याच पद्धतीने तुमचा बजेट जर सहा लाखापासून ते साडेसहा लाख रुपयापर्यंत असेल व तुम्हाला एसयुव्ही कार घ्यायची असेल तर सध्या बाजारामध्ये नामांकित कंपन्यांचे तीन दमदार कारचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचीच माहिती आपण थोडक्यात घेऊ.

 या आहेत बजेट मधील एसयूव्ही कार

1- ह्युंदाई एक्स्टर एक कार तीच्या  सेगमेंट मधील एक सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. या कारमध्ये स्पेस चांगला देण्यात आलेला असून पाच लोक आरामात या कारमध्ये बसू शकतात.

या कारचे इंजिन पाहिले तर ते 1.2- लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून जे 83 पीएस पावर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच यात पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे.

या कारचे इंजिन स्मूथ आणि चांगलं परफॉर्मन्स देण्यासाठी सक्षम असून शहरात प्रवास करण्यासाठी ही कार एक चांगला ऑप्शन आहे.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारमध्ये अँटी लॉक सिस्टम व त्यासोबत एबीडी आणि सहा एअरबॅग  देण्यात आलेले आहेत. या कारची किंमत सहा लाख 12 हजार रुपयांपासून सुरू होते.

2- टाटा पंच आपल्याला माहित आहे की टाटा मोटरची ही टाटा पंच देशांमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी कार असून एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मधील कार आहे. या कारमध्ये स्पेस चांगली देण्यात आलेली असून या कारचे फीचर्स देखील उत्तम आहेत.

टाटा पंचमध्ये 1.2- लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून जे ७२.५ पीएस पावर आणि 103 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला पाच स्पीड गिअर बॉक्स जोडलेला आहे. एका लिटरमध्ये ही कार 18.95 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते. या कारची किंमत सहा लाख 13 हजार रुपयांपासून सुरू होते.

3- निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट निसान इंडिया या कंपनीने नुकतीच मॅग्नाइट फॅसिलिफ्ट भारतामध्ये लॉन्च केली असून या कारची बाहेरची डिझाईन अतिशय नाविन्यपूर्ण आहे. तसेच इंटिरियर अगोदर पेक्षा थोडं कुल दिसते.

तसेच या कारमध्ये फीचर्स देखील उत्तम आणि दमदार देण्यात आलेले आहेत.या कारमध्ये 999 सीसी इंजिन देण्यात आले असून जे ७२ पीएस पावर आणि 96 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

या कारमध्ये पाच स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे तसेच स्पेस देखील चांगला आहे. सुरक्षेकरिता या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सह इबीडी देण्यात आले असून सहा एअरबॅग आहेत. निसानच्या या नवीन मेगनाईट फेसलिफ्टची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe