पैशाने पैसा वाढतो हे शंभर टक्के खरे आहे! पण पैसे गुंतवताना कराल ‘या’ चुका तर मात्र पैसा न वाढता होईल कमी

गुंतवणूक ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भविष्यकालीन समृद्ध आर्थिक जीवनाच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून जो काही पैसा कमावला जातो तो पैसा चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणे हे खूप गरजेचे असते.

Ajay Patil
Published:
mutual fund

Mutual Fund Investment Tips:- गुंतवणूक ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भविष्यकालीन समृद्ध आर्थिक जीवनाच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून जो काही पैसा कमावला जातो तो पैसा चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणे हे खूप गरजेचे असते.

म्हटले जाते की पैशाने पैसा वाढतो हे तितकेच खरे आहे. परंतु पैसा कोणत्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवताना मात्र काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. आता उपलब्ध गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर यामध्ये म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक काही वर्षापासून आपल्याला वाढताना दिसून येत आहे.

परंतु ही गुंतवणूक शेअर मार्केटच्या चढउतारावर काहीशी अवलंबून असते. त्यामुळे यामध्ये जोखीम ही थोडीफार प्रमाणात का असेना ती येतेच. म्हणून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही याबाबत संभ्रमावस्था दिसून येते. या अनुषंगाने जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच फायदा होतो व पैशाने पैसा वाढतो हे तत्व वास्तविक स्वरूपात उतरते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ही काळजी घ्या

1- कधीही एकाच योजनेमध्ये गुंतवणूक करू नका- जेव्हाही तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा गुंतवणूक करताना तुम्ही कष्टाने कमावलेल्या पैशांची जी बचत केलेली असेल ती बचत एकाच ठिकाणी गुंतवु नका.खास करून म्युच्युअल फंड योजनेमध्ये जिथे बहुतेक परतावा बाजारातील चढउतारांवर अवलंबून असतो त्या ठिकाणी हा नियम नक्कीच पाळा.

तुम्हाला जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर किमान दोन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. यामागील प्रमुख कारण म्हणजे जर तुम्ही एकाच म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले जोखमीची शक्यता असते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे म्युच्युअल फंडाचे स्वरूप देखील वेगवेगळे असते व परताव्याच्या स्वरूपात आपल्याला यामधील फरक देखील दिसून येतो.

त्यामुळे तुम्ही एकापेक्षा जास्त फंडांमध्ये गुंतवणूक केली तर एका मध्ये कमी परतावा मिळाला तरी ही तुम्हाला दुसरा मजबूत परतावा देणारा फंड असेल तर भरपाई निघून जाते.

2- कुठल्या फंडांमध्ये पैसे गुंतवाल हे आधी ठरवा?- म्युच्युअल फंडाचे प्रकार येतात व त्यामुळे तुम्ही कुठल्या फंडामध्ये पैसे गुंतवत आहात याचा योग्य तो तपास करून काळजीपूर्वक निवड करा. साधारणपणे तुम्ही पहिल्यांदाच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही लार्ज कॅप्स फंडामध्ये गुंतवणूक करून सुरुवात करावी.

कारण या प्रकारच्या फंडामध्ये धोका कमी असतो. त्यानंतर तुम्ही मल्टी किंवा मिडकॅप फंडांची निवड करू शकतात. अशा प्रकारच्या फंडांमध्ये थोडी जोखीम जास्त असते. परंतु मजबूत परतावा देखील मिळण्याची मोठी संधी आहे. तसेच तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्यात गुंतवणूक करणारे काही फंड किंवा डेट फंड तुम्ही ठेवू शकतात.

समजा शेअर बाजार जर घसरला तर गोल्ड फंड आणि डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओची योग्य प्रकारे काळजी घेतात व तुम्हाला नुकसान कमी होते.

3- फंड हाऊस निवडताना त्यात वैविध्य जपा- म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की तुम्ही एकाच फंड हाऊसच्या सर्व योजनांमध्ये पैसे गुंतवू नये. यामागील प्रमुख कारण म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे चांगले मानले जात नाही.

कारण काही समस्या उद्भवली तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही योजनेनुसार वेगवेगळ्या फंड हाऊसमधून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची गुंतवणुकीची संबंधित असलेली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe