Vastu Tips:- वास्तुशास्त्राला भारतामध्ये खूप महत्त्व असून घराचे बांधकाम असो किंवा घरातील अंतर्गत रचना किंवा घरातील कुठली वस्तू कोणत्या जागी असावी याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला मिळते.
असे म्हटले जाते की वास्तुशास्त्रानुसार जर सगळे नियम पाळून जर घराची अंतर्गत व बाह्य रचना केली तर त्याचे अनेक फायदे मिळतात. वास्तुशास्त्रामध्ये अगदी घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे तसेच बेडरूम कोणत्या दिशेला असावे किचन कसे असावे? इत्यादीबद्दल देखील महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे व त्यामुळे घराचे बांधकाम बहुतांशी वास्तुशास्त्रानुसारच केले जाते.
अगदी वास्तुशास्त्रामध्ये कुठले झाड घरामध्ये लावल्याने आणि ते कोणत्या दिशेला लावल्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते किंवा आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होतो याच्याबद्दल देखील माहिती मिळते. अगदी याच पद्धतीने जर आपण फळझाडाचा विचार केला तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पेरूचे रोप लावणे हे खूप फायदेशीर समजले जाते.
घरामध्ये जर पेरूचे रोप लावले तर जीवनात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी व समस्या असतात त्या दूर व्हायला मदत होते.परंतु घरामध्ये पेरूचे रोप लावताना योग्य दिशेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. याविषयी प्रसिद्ध ज्योतिषींनी देखील याबाबत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे.
घरामध्ये पेरूचे झाड लावण्याचे महत्त्व
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरामध्ये पेरूचे झाड लावल्यामुळे अनेक फायदे मिळतात. पेरूचे झाड शुक्र ग्रहाशी संबंधित असल्याचे दिसून येते. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शुक्र हा जीवनातील सर्व प्रकारचे आनंद,
प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक समजला जातो. अशा परिस्थितीमध्ये जर घरात पेरूचे रोप लावले तर घरात सुख शांती नांदते. इतकेच नाहीतर कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सद्भावना वाढीस मदत होते. एकंदरीत संपूर्ण घरामध्ये सकारात्मक असे वातावरण राहते.
घरामध्ये कोणत्या दिशेला लावावे पेरूचे रोप?
घराच्या पूर्व दिशेला पेरूचे रोप लावणे खूप फायद्याचे ठरते. कारण सूर्य पूर्व दिशेपासून उगवतो व ज्यामुळे प्रकाश येतो आणि नवीन ऊर्जा मिळते.
अशा परिस्थितीमध्ये जर घरात पूर्व दिशेला पेरूचे झाड असेल तर तुमच्या घरात नेहमी सकारात्मक असे वातावरण राहते.त्यामुळे अनेक शुभ परिणाम होतात. असे म्हटले जाते की जर पेरूचे रोप किंवा झाड योग्य दिशेने लावले तर ते तुमचे सौभाग्य वाढवते व आयुष्यातील सर्व समस्या दूर करते.