Tomato Variety:- शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून यामध्ये टोमॅटो, वांगे, मिरची तसेच भेंडी व वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये कारले, दोडके व काकडी सारख्या भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आता शेतीत मोठा बदल घडताना दिसून येत असून कमी खर्चात व कमी कालावधीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता भाजीपाला लागवडीत असल्यामुळे बरेच शेतकरी आता भाजीपाला लागवड करत आहेत. यामध्ये टोमॅटो पिकाची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

अगदी टोमॅटो या पिकाच्या अनुषंगाने बघितले तर हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी मुकेश शर्मा यांनी साधारणपणे अडीच एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची INDAM 1320 वरायटीची लागवड केलेली होती.
यापासून त्यांना टोमॅटोचे भरघोस उत्पादन मिळाले व मुकेश शर्मा यांच्या आर्थिक विकासाला यामुळे खूप पाठबळ लाभले. टोमॅटोची ही सुधारित व्हरायटी केवळ उत्पादनच उच्च देत नाही तर तिच्या विशेष गुणांमुळे बाजारात देखील चांगली मागणी असते.
टोमॅटोच्या INDAM 1320 व्हरायटीचे वैशिष्ट्ये आणि लागवडीचे फायदे
मुकेश शर्मा यांनी साधारणपणे अडीच एकर जमिनीवर टोमॅटोच्या या व्हरायटीची लागवड केली. साधारणपणे एकरमध्ये 300 ते 400 कॅरेट उत्पादन त्यांना मिळत आहे व प्रत्येक कॅरेटचे वजन 25 ते 28 किलोपर्यंत भरते.
या विषयी माहिती देताना मुकेश शर्मा यांनी म्हटले की या जातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतर टोमॅटोच्या व्हरायटी पेक्षा या व्हरायटीचे उत्पादन जास्त मिळते व फळे आकर्षक गडद लाल रंगाचे असल्यामुळे बाजारात देखील मागणी चांगली असते. टोमॅटोच्या या जातीचे वैशिष्ट्ये बघितले तर…
1- उच्च उत्पादनक्षमता- मुकेश शर्मा यांच्या मते ही जात कमी वेळेत अधिक उत्पादन देते. याचा अर्थ शेतकरी कमी वेळेत मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेऊ शकतात व त्यामुळे चांगला नफा मिळू शकतो.
3- आकर्षक आणि मोठ्या आकाराची फळे– टोमॅटोच्या या व्हरायटीच्या एका टोमॅटोचे सरासरी वजन 90 ते 100 ग्रॅम असते. तसेच ते आकाराने गोलाकार, गडद लाल रंगाचे असतात व ज्यामुळे बाजारात चढ्या किमतीमध्ये विकले जातात. टोमॅटोच्या या व्हरायटीमुळे किरकोळ आणि घाऊक बाजारात चांगला नफा मिळतो.
4- रोगप्रतिकारक शक्ती- तसेच टोमॅटोची ही व्हरायटी टोमॅटोच्या प्रमुख रोगांना प्रतिकारक असून ज्यामुळे झाडे निरोगी आणि मजबूत राहतात व फवारणी वरील खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळण्यास मदत होते. तसेच रोगांना प्रतिरोधक असल्यामुळे उत्पादनात देखील घट होत नाही.
5- टिकवण क्षमता चांगली- तसेच टोमॅटोच्या या व्हरायटीचे सेल्फ लाईफ म्हणजेच टिकवण क्षमता देखील चांगली आहे. काढणीनंतर बऱ्याच कालावधीपर्यंत टोमॅटो ताजे राहतात. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठेपर्यंत विक्रीस नेण्यासाठी उपयुक्त अशी व्हरायटी आहे.
6- विविध वातावरणीय परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता- टोमॅटोची ही व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत आणि हवामानात यशस्वीरित्या पिकवता येते. तसेच ती वेगवेगळ्या हवामानात देखील चांगल्या प्रकारे तग धरणारी असल्यामुळे लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना ती लागवडीसाठी सोयीची व फायद्याची आहे.
मुकेश शर्मा यांना प्रति एकर मिळाले वार्षिक सात ते आठ लाखांवर उत्पन्न
या टोमॅटोच्या सुधारित व्हरायटी विषयी बोलताना मुकेश शर्मा यांनी म्हटले की, याचा लागवडीचा खर्च हा हंगामानुसार बदलत असतो. परंतु तरीदेखील लागवडीपासून ते शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहचेपर्यंत एकरी सरासरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो.
परंतु त्यावेळी मात्र एकूण वार्षिक उत्पन्न एकरी सात ते आठ लाखांपर्यंत पोहोचते. त्यामुळे मुकेश शर्मा यांना INDAM 1320 या टोमॅटोच्या व्हरायटीने केवळ उच्च उत्पन्नाचा फायदा दिला नाहीतर त्याची विक्री करून त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा देखील मिळाला आहे.