मोबाईलमध्ये ‘हे’ ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि बिनधास्त प्रवास करा! वाहतूक पोलीस नाही विचारणार ड्रायव्हिंग लायसन्स

रस्त्यात मात्र जर वाहतूक पोलिसांनी अडवले व कागदपत्रांची मागणी केली तर तेव्हा आपल्याला अशी कागदपत्रे दाखवता न आल्याने उगीचच आपल्याला चलन भरावे लागते. परंतु आता जर आपण बघितले तर तुमच्याकडे कार किंवा बाईकची फिजिकली डॉक्युमेंट्स सोबत ठेवण्याची अजिबात गरज नाही.

Published on -

जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याकडे वाहनाचे वैध कागदपत्रे आणि स्वतःकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की, एखाद्या वेळेस आपण घाई घाईत प्रवासाला निघतो आणि चुकून आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कारचे किंवा वाहनाचे महत्त्वाची कागदपत्रे घरीच विसरतो

आणि रस्त्यात मात्र जर वाहतूक पोलिसांनी अडवले व कागदपत्रांची मागणी केली तर तेव्हा आपल्याला अशी कागदपत्रे दाखवता न आल्याने उगीचच आपल्याला चलन भरावे लागते. परंतु आता जर आपण बघितले तर तुमच्याकडे कार किंवा बाईकची फिजिकली डॉक्युमेंट्स सोबत ठेवण्याची अजिबात गरज नाही.

कारण तुमच्या मोबाईल मध्ये जर डीजी लॉकर एप्लीकेशन असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कागदपत्रे दाखवू शकतात व ते पूर्णपणे कायदेशीर व वैध आहेत.

यामध्ये ट्रॅफिक पोलीस त्यांच्या मोबाईलमधून क्यूआर कोड स्कॅन करून ड्रायव्हर आणि वाहनाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतात. अशाप्रकारे तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चालान भरण्याची समस्या टाळू शकता.

काय आहेत या संबंधीचे नियम?
जर आपण आयटी कायदा बघितला तर त्यानुसार वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा वाहनाच्या इन्शुरन्स विषयीचे कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीच्या प्रति आता दाखवणे आता बंधनकारक नाही. तुमच्याकडे जर एम परिवहन एप्लीकेशन वर किंवा डीजी लॉकर एप्लीकेशन वर कागदपत्रांच्या डिजिटल प्रति असतील तर वैध मानल्या जातील असे संबंधित मंत्रालयाच्या माध्यमातून देखील नमूद करण्यात आलेले आहे.

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वाहतूक पोलीस व त्यांच्या मोबाईल मधून किंवा क्विआर कोड स्कॅन करून ड्रायव्हर आणि वाहनाशी संबंधित आवश्यक माहिती मिळवू शकता व इतकेच नाहीतर संबंधित वाहनचालकाने जर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर त्या संबंधीची नोंद देखील डिजिटल पद्धतीने ठेवता येते.

परंतु या सुविधेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये डीजी लॉकर आणि एम परिवहन ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागते. या दोन्ही एप्लीकेशनला डाऊनलोड करणे अत्यंत सोपे असून याकरिता एप्लीकेशन मध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागते व याकरिता सगळ्यात अगोदर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि ओटीपी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड सेट करून ॲपमध्ये लॉगिन करावे लागते. त्यानंतर आधार क्रमांक डीजी लॉकर ॲपमध्ये लिंक करावा लागतो आणि ओटीपी द्वारे त्याची पडताळणी करावी लागते.

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, तुमच्या वाहनाच्या आरसी बुक आणि विम्याच्या डिजिटल प्रती डीजी लॉकर वरून डाऊनलोड करू शकतात.

एम परिवहन ॲपमध्ये कशी आहे प्रक्रिया?
एम परिवहन एप्लीकेशन मध्ये वाहन मालकाचे नाव तसेच वाहनाच्या नोंदणीची तारीख तसेच वाहनाचे मॉडेल क्रमांक व इन्शुरन्सची व्हॅलिडीटी इत्यादी सर्व आवश्यक माहिती असतं.

त्यामुळे तुम्ही एम परिवहन एप्लीकेशनचा वापर करून देखील वाहतुक पोलिसांच्या त्रासापासून स्वतःला वाचवू शकतात व त्यांना एप्लीकेशन मधील डिजिटल कागदपत्रे दाखवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe