Short Term Investment Plan:- पैशांची गुंतवणूक करताना कालावधीनुसार बघितले तर त्यामध्ये अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक असे प्रकार पडतात. गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार एक तर अल्पकालीन उद्दिष्टांसह गुंतवणूक करतात किंवा दीर्घकालीन उद्दिष्टांसह गुंतवणूक करतात.
तुम्हाला जर अचानकपणे कधीही पैशांची गरज भासली तर तुम्ही ज्या पर्यायांमध्ये अल्प मुदती करिता गुंतवणूक करत आहात ते तुम्ही रीडिम करू शकतात. म्हणजे तुम्ही अशा पर्यायातून पैसे काढू शकतात व दुसरे दीर्घकालीन पर्यायांमध्ये तुम्ही पैसे गुंतवले असतील तर त्या पैशांना हात लावण्याची गरज तुम्हाला भासत नाही व तुमची दीर्घकालीन गुंतवणुकीमधील पैसे सुरक्षित राहतात.
त्यामुळे दीर्घकालीन पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असताना अल्पमुदतीच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे देखील फायद्याचे ठरते. यामध्ये जर बघितले तर अल्प मुदतीसाठी काही उत्तम अशी गुंतवणूक पर्याय आहेत. त्यांची आपण थोडक्यात माहिती बघू.
या आहेत चांगला नफा देणाऱ्या अल्प मुदतीच्या गुंतवणूक योजना
1- आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट- तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या करिता आवर्ती ठेव हा उत्तम पर्याय आहे व या पर्यायाची निवड तुम्ही करू शकता. तसे पाहायला गेले तर ही योजना पिगी बँकेसारखी आहे. यामध्ये तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते व मॅच्युरिटी वर तुम्हाला व्याजासह एकूण रक्कम मिळते.
आवर्ती ठेव म्हणजेच आरडीमध्ये तुम्ही एक वर्षापासून विविध कालावधीचे पर्याय निवडू शकतात. तुम्ही सर्व बँकांमध्ये आरडी योजनेत पैसे गुंतवू शकतात.कारण प्रत्येक बँकेत ही सुविधा उपलब्ध आहे.
याकरिता तुम्ही विविध बँकांमधील आरडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदर यांची तुलना करावी आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जास्त व्याज मिळेल त्या ठिकाणी पैसे गुंतवावेत. पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुम्हाला आरडीचा पर्याय मिळतो. या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे.
2- बँकेत एफडी म्हणजेच मुदत ठेव- तुम्हाला जर कमी रक्कम जमा करायचे असेल तर तुम्ही एफडीचा पर्याय निवडू शकतात. एफडी हा अतिशय पसंतीचा गुंतवणूक पर्याय मानला जातो व तुम्ही कोणत्याही बँकेत अगदी सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीकरिता एफडी करू शकतात.
बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कालावधीनुसार व्याजदर देखील वेगवेगळ्या मिळतो. तसेच पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत एफडीचा पर्याय निवडू शकता.
एफडी करण्या अगोदर बँकांचा एफडीवर मिळणारा व्याजदर व पोस्ट ऑफिसचे व्याजदर याची तुलना करावी व त्यानंतर एक वर्ष कालावधीसाठी एफडी मिळवावी.
3- डेट म्युच्युअल फंड- तुम्हाला जर एका वर्षाकरिता गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडू शकता व यामध्ये बारा महिने म्हणजेच एक वर्ष कालावधी करिता पैशांची गुंतवणूक करू शकतात.
तुम्ही डेट म्युच्युअल फंडामध्ये जी काही गुंतवणूक करतात ती सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर खूप चांगले रिटर्न मिळतात.
4- एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान- तसेच तुम्ही बाजारात अल्पमुदती करिता एसआयपी या पर्यायाची देखील निवड करू शकतात. एसआयपी या गुंतवणूक पर्यायांमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक बजेटनुसार प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करू शकतात व एसआयपी बंद करून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमचे पैसे तुम्हाला मिळू शकतात.
एसआयपीच्या अनेकविध योजना असून तुम्हाला त्या माध्यमातून चांगले परतावे मिळतात. अनेक आर्थिक तज्ज्ञांचा विचार केला तर ते एसआयपीतील गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्क्यांचा परताळ मिळतो असे म्हणतात. एसआयपी हा पर्याय बाजाराशी निगडित असल्यामुळे त्यामध्ये थोडीफार जोखीम असते.त्यामुळे मिळणारा परतावा कमी जास्त होऊ शकतो.
5- कार्पोरेट एफडी- अनेक कंपन्या त्यांना त्यांच्या व्यवसायाकरिता हवा असलेला पैसा गोळा करतात आणि त्यासाठी ते एफडी जारी करतात. त्यांच्या एफडी या बँक एफडीप्रमाणेच काम करतात. यामध्ये कंपनी एक फॉर्म जारी करते व जो फॉर्म ऑनलाईन देखील भरता येतो. कार्पोरेट एफडी मधील व्याजदर बँक एफडीपेक्षा जास्त असतात.
परंतु कॉर्पोरेट एफडी मधील केलेल्या गुंतवणुकीवर बँक एफडीच्या तुलनेत थोडी जास्त जोखीम असते. परंतु मजबूत आणि उच्च दर्जाच्या कंपन्यांच्या कार्पोरेट एफडीमध्ये कमी धोका असतो.
कार्पोरेट एफडीचा परिपक्वता कालावधी एक ते पाच वर्षापर्यंत असतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही कालावधी निवडू शकतात. कार्पोरेट एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरांचा विचार केला तर यामध्ये उच्च रेटिंग असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कार्पोरेट एफडीवर साधारणपणे 9.25% ते 10.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतात.