शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पडीक जमिनीच्या बदल्यात मिळणार वार्षिक 75,000 ; पहा डिटेल्स

Ajay Patil
Published:
maharashtra farmer scheme

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केलं जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अजून एक फायदा होणार आहे.

या योजनेसाठी महावितरणला जमीन लागणार असून यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याची योजना महावितरणने आखली आहे. विशेष म्हणजे प्रति हेक्टर 75 हजार रुपये वार्षिक या जमिनीच्या भाड्याच्या मोबदल्यात पैसे मिळणार आहेत. यामुळे निश्चितच या योजनेचा पडीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून जिल्ह्यातील महावितरणच्या ४१ उपकेंद्रांपासून ५ किलोमीटरपर्यंत आणि रस्त्यालगतच्या जमिनीची महावितरणला गरज आहे. यामुळे जर उपकेंद्रांपासून पाच किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांची जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांनी संपर्क करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

या योजनेबाबत अधिक माहिती अशी की , राज्यात ज्या ग्रामीण भागांत गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे, अशा वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जे सौरऊर्जीकरण केलं जाणार आहे ते केवळ कृषी वाहिन्यांचे केलं जाणार आहे. म्हणजे एकूण ३ हजार वीज वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण होणार आहे. यासाठी मात्र १५ हजार एकर जमिन महावितरण ला आवश्यक राहणार आहे. आणि या जमिनीवरून ४ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जीकरण करून तयार केली जाणार आहे.

निश्चितच आता यासाठी शेतकऱ्यांकडून महावितरण भाडेपट्ट्यावर जमीन घेणार आहे. जर जमीन उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असेल अन शेतकऱ्याला भाडेपट्ट्यावर महावितरण साठी जमीन द्यायची असेल तर जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रतिवर्ष ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्यादराने वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच या रकमेत दरवर्षी वाढ होणार आहे. प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर प्रत्येकी वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना जर त्यांची जमीन भाडेतत्त्वावर महावितरण ला द्यायची असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी https://www.mahadiscom.in/land_bank_portal/index_mr.php या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी की महावितरण उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतकरी बांधवांचीचं जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe