प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू, 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असून यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. कोकणातील एका महत्त्वाच्या घाटमार्गातील बोगदा वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Ghat Marg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अशातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे कोकणातील एक महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि जलद गतीने मुंबईहून कोकणात आणि कोकणातून मुंबईला येता येणे शक्य होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

15 मे 2025 रोजी या बोगद्यामध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला आणि याच दिवसापासून हा दुसरा बोगदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यामुळे आता मुंबई ते कोकण आणि पुढे गोव्यापर्यंतचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

कसा आहे कशेडी घाटातील बोगदा ? 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कशेडी घाटातील बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा आहे. तसेच या बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग हा सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. खरे तर कशेडी घाटातील बोगद्यांमध्ये अंतर्गत गळती सुरू होती.

त्यामुळे या बोगद्यांचे दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. हे काम 15 मे 2025 पर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होण्याच्या आधीच पूर्ण करण्याच्या टारगेट ठेवण्यात आले होते.

यानुसार हे काम 15 मे 2025 च्या आधीच पूर्ण झाले असून आता दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी सुरू आहेत. आता हे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत कारण की आता मुंबईकडे येणाऱ्या बोगद्याप्रमाणेच रत्नागिरीकडे जाणाऱ्या बोगद्यामध्ये देखील वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बोगद्यात दोन्ही बाजूंनी 200 पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की या पैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे आगामी काळात मुंबई ते कोकण तसेच गोवा आणि गोवा ते मुंबई हा प्रवास वेगवान होईल असे बोलले जात आहे. हे बोगदे सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेने खुले झाले असल्याने आता प्रवाशांचा 40 ते 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण होईल असा दावा केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News