अखेर देव पावला ! 11 वर्षापासून रखडलेल्या, 127 किलोमीटर लांब विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी 60 हजार कोटींचा निधी मंजूर, पहा डिटेल्स

Ajay Patil
Published:
maharashra news

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या अकरा वर्षापासून राखलेल्या महामार्गांचे काम जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये महामार्गांचा, भुयारी मार्गांचा, सागरी मार्गांचा समावेश आहे. दरम्यान आता विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी राज्य शासनाने 60 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे.

यामुळे विरार अलिबाग कॉरिडोर हा महामार्ग देखील मार्गी लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या महामार्गाची एकूण 127 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे. तसेच हा मार्ग भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या क्षेत्रातून जाणार आहे. हा मार्ग जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावा या ट्रान्सहार्बर लिंकला जोडला जाणार असल्याने मुंबईमधील हा एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.

अकरा वर्षानंतर मिळणार गती

खरं पाहता, या महामार्गाचे काम गेल्या अकरा वर्षांपासून रखले आहे. मात्र आता 2023 मध्ये सिलिंग चे काम पूर्णत्वास येत असतानाच या महामार्गाचे काम देखील जलद गतीने केल जाणार आहे. परंतु हा रस्ता कर्नाळा अभयारण्यातून जात असल्याने मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल यामुळे होणार आहे. परंतु आता या मार्गीकेसाठी निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच हा मार्ग तयार होणार आहे. या मार्गाची विशेष बाब अशी की, १६ मार्गिकेच्या या प्रकल्पातील एक मार्गिका बससाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.

हा कॉरिडोर विरार ते अलिबागदरम्यानच्या अनेक छोट्या मोठ्या गावांना जोडणार आहे. यामुळे विरार ते अलिबाग दरम्यान ग्रामीण भागाचा देखील चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या भागाचा सर्वांगीण विकास या महामार्गामुळे शक्य असल्याचे बतावणी जाणकार देखील करत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, ३, ४, ४-ब, १७ भिवंडी बायपास व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गही या प्रकल्पाने जोडला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान जेएनपीटी, मुंबई पोरबंदर प्रकल्पालाही हा कॉरिडोर जोडला जाणार आहे.

या महामार्गाची अजून एक सर्वात मोठी विशेषता अशी की, जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजे मुंबई ते दिल्ली द्रुतगती मार्गाला देखील हा कॉरिडॉर जोडला जाणार आहे. निश्चितच हा महामार्ग महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासात गेम चेंजर सिद्ध होणार आहे. परंतु हा महामार्ग जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच यासाठी पैसा देखील खर्च करावा लागत आहे. वास्तविक पाहता या प्रकल्पाचा मूळ खर्च हा अंदाजे १२ हजार कोटी रुपये इतका होता.

मात्र हा प्रकल्प काही तांत्रिक आणि अन्य कारणांमुळे रखडल्याने या कॉरिडॉरचा खर्च हा मोठा वाढला आहे. एका अंदाजानुसार आता हा कॉरिडॉर तयार करण्यासाठी ३९ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निश्चितच, हा बहुउद्देशीय महामार्ग विरार ते अलिबाग दरम्यानच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपयोगी राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, या कॉरिडॉर वर एकूण ४८ भुयारी मार्ग आणि ४१ पूल बांधण्यात येणार आहेत. तसेच एकूण तीन जिल्हयातून हा महामार्ग जाणार आहे. दरम्यान निधीची घोषणा झालेली असली तरी देखील प्रत्यक्ष निधी अजून प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. पण निधीची घोषणा झाली असल्याने लवकरच हा निधी संबंधित विभागाकडे वर्ग होईल आणि या प्रकल्पाला गती लाभेल हा आशावाद व्यक्त केला जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe