Maharashtra Schools : राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर पुढील महिन्यात राज्यभरातील शाळा सुरू होणार आहे. 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष अर्थातच 2025 26 हे नाव शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून 16 जून रोजी विद्यार्थ्यांची शाळा सुरू होईल. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एकूण दिलासादायक बातमी समोर येत आहे.

गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात राज्य सरकारकडून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये मोफत गणवेश योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे राज्य शासनाच्या सदर निर्णयाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकडून स्वागत केले जात आहे. हा निर्णय शिक्षक व शाळा समितींसाठी दिलासादायक राहणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.
आता काय बदल होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचे अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आली आहे, तसेच त्यासाठी लागणारी रक्कम थेट समितीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
याआधी जो निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णया अंतर्गत शासनाकडून कापड खरेदी करून शाळांना वितरित केले जात होते. पण, गेल्या वर्षी वेळेवर गणवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक कमालीचे नाराज झाले होते.
हीच गोष्ट विचारात घेऊन आता सरकारकडून शाळा व्यवस्थापन समितीवर मोफत गणवेशची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने या नव्या निर्णयामुळे मोफत गणवेश योजनेची प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश आता कोण ठरवणार ?
या नव्या निर्णयाअंतर्गत आता शालेय विद्यार्थ्यांची गणवेशाची रचना व रंग शाळा समिती ठरवणार असून, त्यात स्काउट-गाईड मान्य रंगसंगतीचा समावेश असणार अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. महत्त्वाची बाब अशी की गणवेशाच्या गुणवत्तेची जबाबदारी सुद्धा शाळांवरच राहणार आहे.
यामुळे, विद्यार्थ्यांना देण्यात आलेला मोफत गणवेशाचा कापड निकृष्ट आढळला तर शाळा समितीस उत्तरदायी धरले जाणार असे संबंधितांनी सांगितले आहे. दरम्यान या निर्णयाचे पालकांकडून तसेच शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे.