महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकणार ! खा. नीलेश लंके यांचा विश्‍वास  मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे घेतले आशिर्वाद 

खा. नीलेश लंके यांनी मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. विधानसभेसाठी नगर जिल्हयातून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची सुरूवात होणार असल्याचे ही निलेश लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Politics : येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचा दावा करतानाच महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची सुरूवात नगर जिल्हयातून करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपणास सांगितले असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. लवकरात लवकर तारीख निश्‍चित करून नगरमध्ये महाविकास आघाडीच्या मोठया मेळाव्याचे नियेाजन करण्यात येणार असल्याचेही खासदार लंके म्हणाले.

लोकसभा निवडणूकीत विजय संपादन केल्यानंतर शनिवारी खा. नीलेश लंके यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेउन त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खा.लंके म्हणाले, लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आशिर्वाद घेउनच दिल्लीला शपथ घेण्यासाठी जाण्याचा मी निर्धार केलेला होता. रविवारी  मी दिल्लीला जाणार आहे. आज उध्दव साहेब यांचे आशिर्वाद घेतले. त्यांचे प्रेरणा घेऊन, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनाचे दर्शन घेतल्याचे लंके म्हणाले.

माझा राजकीय प्रवास हा शिवसेना पक्षातूनच सुरू झाला. शाखाप्रमुख, उपगणप्रमुख, गण, गट, उप तालुकाप्रमुख या पदांवर काम करताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पेे्ररणा घेउन मी काम केले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. नगर जिल्हयात कै. अनिल राठोड अशा नेतृत्वाखाली काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आजही स्व. बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो असे ते म्हणाले.

पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी केली आहे यावर बोलताना त्यांना काय करायचे असेल ते करू द्या, काही लोकांना पराभव मान्य नसतो त्यामुळे ते असे उलटे उद्योग करत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले काम करत रहायचे असे आपले धोरण आहे. उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नगर जिल्हयातील सर्व १२ आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणण्याचा आपण निर्धार केला असल्याचे सांगितल्याचे लंके म्हणाले.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी येता आले नाही याबाबत उध्दव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. मात्र शुभारंभासाठी आदीत्य ठाकरे हे आले होते याची आपण आठवण त्यांना करून दिल्याचे लंके म्हणाले. माइ-या विजयामुळे उध्दव ठाकरे यांना अत्यानंद झाला. माझ्या सारखा कार्यकर्ता खासदार झाला त्याचा त्यांना आनंद आहे कारण आम्ही एका परीवारातील होतो असेही लंके यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

पारनेरच्या डिझाईनचा फलक मातोश्रीबाहेर !

पारनेरचा ढाण्या वाघ मातोेश्रीवर अशा आशयाचे डिझाईन करणाऱ्या तालुक्यातील सारोळा आडवाई येथील ग्राफीक्स डिझाईनर सुदेश आबूज याचा फलक मातोश्रीबाहेर झळकला होता. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe