Property Deal Tips:- एखादी मालमत्ता खरेदी करणे म्हणजे त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागतात. कारण आपल्याला माहित आहे की आता प्रॉपर्टीचे व्यवहार करणे सोपे राहिले नसून महागाईच्या कालावधीमध्ये लाखो ते कोटी रुपये यासाठी आपल्याला खर्च करावे लागतात व तेव्हा कुठे प्रॉपर्टी खरेदी करता येते.
त्यामुळे अशाप्रकारे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अशाप्रकारे घेतली गेलेली काळजी ही भविष्यातील संभाव्य त्रासापासून आपला बचाव तर करतेच परंतु अशा व्यवहारांमध्ये लाखो रुपये देखील आपले वाचण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण तपास करून किंवा संपूर्ण नियोजन करूनच प्रॉपर्टी खरेदीचा व्यवहार करावा.

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी या टिप्स वापरा आणि लाखो रुपये वाचवा
1- तयार घर खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही बांधकाम सुरू असलेले घर खरेदी केले तर यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसा वाचवू शकतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे बऱ्याचदा बांधकाम सुरू असलेल्या घरांवर जास्त सवलत देखील मिळू शकते.
समजा एखादा गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहे व त्या ठिकाणी जर दोन-चार व्यक्ती मिळून जर गटामध्ये घरांची खरेदी केली तर बिल्डर हा काही अतिरिक्त सवलत देखील देतो. त्यामुळे तयार घर घेण्यापेक्षा बांधकाम सुरू असलेले म्हणजेच बांधकामाधिन घर घेणे फायद्याचे ठरते.
2- तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे व असा व्यवहार करताना तुम्ही जर थेट मालकाशीच व्यवहार केला तर रियल इस्टेट एजंट किंवा इतरांना द्यावी लागणारी कमिशन पोटीची रक्कम वाचू शकते. त्यामुळे थेट बिल्डर किंवा विक्रेत्याकडून घर किंवा इतर प्रॉपर्टी खरेदी करण्याचाच प्रयत्न करावा.
अशा व्यवहारामध्ये तुम्ही पाच टक्क्यांपर्यंत त्यामध्ये बचत करू शकतात. तसेच संबंधित प्रकल्पाच्या बाबतीत बिल्डरने म्हणजेच विकासकाने सर्व आवश्यक कायदेशीर परवानगी घेतल्या आहेत की नाही याची देखील खात्री करून घ्यावी.
3- समजा तुम्हाला ज्या परिसरामध्ये घर किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे तर त्या अगोदर त्या परिसरातील काही लोकांना भेट देणे गरजेचे आहे. अशावेळी लोकांकडून तुम्हाला त्या ठिकाणाच्या प्रॉपर्टीच्या किमती सध्या काय आहेत त्याबद्दल माहिती मिळू शकते.
तुम्हाला त्या परिसरातील किमतींचा अंदाज आल्यानंतर तुम्ही बिल्डर किंवा एजंट सोबत प्रॉपर्टी खरेदी करताना त्या संबंधी डील करू शकतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे सणासुदीचा जर कालावधी असेल व अशा कालावधीत खरेदीदारांसाठी अनेक ऑफर आणि सवलती देखील दिल्या जातात व या माध्यमातून देखील तुम्ही पैसे वाचवू शकतात.
4- तुम्हाला जर घर घ्यायचे असेल तर त्या अगोदर बजेट ठरवणे खूप गरजेचे आहे. तसेच घर किती मोठे घ्यायचे आहे हे देखील निश्चित करणे गरजेचे आहे. घर खरेदी करण्या अगोदर त्या ठिकाणी जर तुमचे मित्र किंवा शेजाऱ्यांनी घरे खरेदी केली असतील तर त्यांच्याशी चर्चा करा.
ते तुम्हाला त्या ठिकाणी विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या घरांबद्दल देखील माहिती देऊ शकतात व त्या ठिकाणच्या किमती देखील सांगू शकतात. असे केल्यामुळे तुम्हाला जास्त पैसे देण्याची गरज राहत नाही व जो वास्तविक रेट त्या परिसरात आहे त्या रेटमध्ये तुम्हाला डील करता येते व या पद्धतीने देखील तुम्ही पैसे वाचवू शकता.
5- तसेच कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करणे अगोदर तुम्हाला जितके रोख पेमेंट करणे शक्य होईल तितके करण्याचा प्रयत्न करावा. कारण असं केल्यामुळे तुम्हाला जास्त सूट मिळू शकते. कारण बरेच बिल्डर हे एकरकमी पैसे घेऊन कमी किमतीमध्ये देखील घरे विकतात व अशा पद्धतीने देखील तुम्ही पैसे वाचवू शकतात.