हिंगोलीचा पट्ठ्या ठरलाय आज सक्सेसफुल ! शेतीसाठी उच्चशिक्षित तरुणाने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली मशरूम शेती अन बनला लखपती

Mushroom Farming : सध्या देशात शेतकरी कुटुंबात दोन वर्ग उदयास येत आहेत. पहिला वर्ग उच्च शिक्षण घेऊन शहरातील झगमग दुनियेत नोकरी करून आपला संसाराचा गाडा चालवत आहेत तर दुसरा वर्ग उच्च शिक्षण घेऊनही, चांगली नोकरी असूनही शेती व्यवसायातचं आपलं करिअर घडवू पाहत आहेत.

आज आपण अशा एका शेतकरी पुत्राची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने उच्चशिक्षित असूनही नोकरी ऐवजी शेती व्यवसायात आपलं करियर बनवण्याचं स्वप्न पाहिल आहे. विशेष म्हणजे या नवयुवकाचे हे स्वप्न मशरूम शेतीच्या माध्यमातून आता सत्यात उतरल असून तो खऱ्या अर्थाने आज सक्सेसफुल ठरला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आडगाव येथील हर्षवर्धन पंडित या उच्चशिक्षित तरुणाने एमबीएच शिक्षण घेतल्यानंतर मशरूम शेती करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या या अवलियाची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

खरं पाहता, पंडित हर्षवर्धन यांनी एमबीएच शिक्षण घेतल आहे. शिवाय त्यांना अजून पुढे उच्च शिक्षण घ्यायचे आहे. मात्र सुरुवातीपासूनच त्यांना शेतीमध्ये अधिक आवड असल्याने त्यांनी काही काळ नोकरी केल्यानंतर मशरूम शेती सुरू केली आणि यातून त्यांनी लाखोंची कमाई करण्याची किमया त्यांनी साधली आहे.

अशी झाली शेतीमधील सुरवात :- हर्षवर्धन यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेत जमीन आहे. याच शेतीमध्ये मग त्यांनी मशरूम लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आपल्या शेतात शेडची उभारणी केली. विशेष म्हणजे शेडची उभारणी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब देखील केला. जॉब करून जे पैसे मिळालेत त्यातून त्यांनी मशरूम शेतीसाठी शेड उभारलं. शेड उभारल्यानंतर मुंबई पुणे यांसारख्या शहरांमधून मशरूमचे बीज मागवलेत. यानंतर एका बेड मध्ये दहा ग्रॅम मशरूम बीज टाकले.

मशरूम बीज टाकल्यानंतर मशरूमची उगवण 21 ते 24 दिवसांमध्ये झाली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मशरूमच्या चांगल्या वाढीसाठी तापमान 20 ते 30 अंश लागत असल्याने त्यांनी उभारलेल्या शेडमध्ये यासाठी विशेष अशी सोय केली. मशरूमचे चांगले दर्जेदार आणि विक्रमी असे उत्पादन घेण्यासाठी तापमानातील आद्रता 60 ते 70 लागते. यामुळे मग हर्षवर्धन यांनी शेडमध्ये साखरेचे पोते शेडला लावले.

यामुळे आद्रता कायम ठेवण्यास त्यांना यश आले. हर्षवर्धन यांच्या मते सद्यस्थितीला त्यांना एक किलो मशरूम बीजपासून दहा किलो मशरूम चे उत्पादन मिळत आहे. निश्चितच मशरूम शेतीमध्ये केलेले हे नियोजन त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ऑईस्टर या जातीच्या मशरूमची लागवड केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या जातीचे मशरूम हे बारामाही उत्पादित केले जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी या जातीच्या मशरूमची निवड केली आहे. तसेच त्यांनी उत्पादित केलेले ऑईस्टर जातीचे मशरूम बाजारात कायमच मागणीमध्ये असतात. यामुळे त्यांना मशरूम शेती मधून चांगली कमाई होत आहे.

निश्चितच एकीकडे मोठमोठे प्रयोगशील आणि सधन शेतकरी शेतीमध्ये सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. दुसरीकडे मात्र हर्षवर्धन सारखे नवयुवक उच्च शिक्षित तरुण शेती शिवाय प्रगती अशक्य असल्याचे दाखवून देत आहेत. निश्चितच हर्षवर्धन यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe