Cibil Score Improve Tips:- तुम्हाला जर बँक व इतर वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला संबंधित बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या ज्या काही अटी व शर्ती असतात त्या पूर्ण करणे गरजेचे असते व त्यानंतरच तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते.
यामध्ये जेव्हाही तुम्ही कर्जासाठी अर्ज करतात तेव्हा सगळ्यात अगोदर तुमचा सिबिल स्कोर म्हणजे तुमची क्रेडिट हिस्ट्री तपासली जाते व त्यानंतरच तुमचा कर्जाचा अर्ज मंजूर अथवा नामंजूर केला जातो. आपल्याला माहित आहे की तुमची क्रेडिट हिस्ट्री म्हणजेच तुम्ही अगोदर जर लोन घेतले असेल तर ते तुम्ही परतफेड कसे केले आहे या सगळ्या रिपेमेंट हिस्ट्रीच्या आधारे तुमचा सिबिल स्कोर तयार केला जात असतो.
परंतु तुम्ही अगोदर घेतलेले कर्ज व्यवस्थित पद्धतीने फेडले नसेल किंवा ईएमआय थकीत असेल तर मात्र त्याचा वाईट परिणाम हा क्रेडिट स्कोरवर होतो व तुमच्या क्रेडिट स्कोर घसरतो.
अशावेळी तुम्ही जेव्हा बँकेकडे कर्जासाठी अर्ज करतात तेव्हा मात्र तुमच्या कर्जाचा अर्ज नाकारला जातो किंवा तुम्हाला जास्त व्याज दरात कर्ज मिळते. या अनुषंगाने या लेखात आपण बघू की सीबील स्कोर जर खराब झाला असेल तर तो कशा पद्धतीने सुधारावा आणि त्यासाठी किती कालावधी लागतो?
यामुळे खराब होतो सिबिल स्कोर
आपल्याला माहित आहे की सिबिल स्कोर खराब होण्यामागे अनेक कारणे आहेत व त्यामधील प्रमुख कारणे जर बघितले तर समजा तुम्ही एखादे कर्ज घेतले आहे व त्याचे ईएमआय वेळेवर भरले नसतील किंवा एखाद्या कर्जाचे सेटलमेंट केले असेल किंवा कर्ज डिफॉल्ट असेल तर यामुळे देखील क्रेडिट स्कोर घसरतो.
तसेच तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल व त्याचे पेमेंट जर वेळेवर केले नसेल तरी देखील तुमच्या क्रेडिट स्कोर मोठ्या प्रमाणावर घसरतो व क्रेडिट युटिलायझेशन रेशो योग्य नसेल तरी देखील तुमच्या क्रेडिट स्कोरवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
तसेच तुम्ही जर संयुक्त कर्ज घेतले असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने घेतलेल्या कर्जाला जर तुम्ही गॅरेंटर असाल आणि त्या व्यक्तीने जर कर्ज भरले नसेल तरी देखील त्याचा वाईट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होण्याची शक्यता असते.
सिबिल स्कोर कसा सुधाराल?
यामध्ये काळजी घ्यावी की गरजेपेक्षा अधिक आणि मोठ्या स्वरूपाची कर्ज घेऊ नये व जर कर्ज घेतले तर त्याचे ईएमआय कुठल्याही परिस्थितीत वेळेवर भरावेत. तसेच तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचा जो काही लिमिट आहे त्याच्या 30 टक्के पेक्षा जास्त खर्च करू नये आणि क्रेडिट कार्डचे बिल अगदी वेळेवर भरावे.
तसेच असुरक्षित प्रकाराचे कर्ज वारंवार घेऊ नये. तुम्ही जर लोन सेटलमेंट केले असेल तर ते लवकरात लवकर बंद करण्याची काळजी घ्यावी.
एखाद्याला जर तुम्हाला कर्जासाठी गॅरेंटर व्हायचे असेल तर संपूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा व संयुक्त कर्ज घेण्याचा निर्णय देखील काळजीपूर्वक घ्यावा. तसेच तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासत राहावा आणि त्या जर चूक दिसली तर ते ताबडतोब दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा.
घसरलेला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी किती कालावधी लागतो?
तुमचा सिबिल स्कोर घसरला असेल व तुम्हाला तो सुधारायचा असेल तर ते एका दिवसात शक्य होत नाही. याकरिता तुम्हाला जवळपास किमान सहा महिन्यापासून ते एक वर्षाचा कालावधी देखील लागू शकतो.
तसेच सिबिल स्कोर जर खूपच मोठ्या प्रमाणावर घसरलेला असेल तर यापेक्षा देखील जास्त वेळ लागण्याची शक्यता असते.
मायनस सिबिल स्कोर असेल तर कसा सुधाराल?
जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचे लोन घेतलेले नसते तेव्हा तुमचा सिव्हिल स्कोर हा मायनसमध्ये असतो. अशाप्रसंगी जर तुम्ही लोन घ्यायला गेलात तर तुम्हाला बँक लोन द्यायला विचार करते. अशाप्रसंगी तुमचा मायनस सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींचा वापर करावा…
1- बँकेतून क्रेडिट कार्ड घ्यावे व त्याचा योग्य वापर करून त्याचे पेमेंट वेळेवर करावे. असे केल्याने बँकिंग प्रणालीमध्ये तुमचे लोन सुरू होते व दोन-तीन आठवड्यात तुमच्या सिबिल स्कोर अपडेट व्हायला लागतो.
2- किंवा बँकेमध्ये दहा- दहा हजारांच्या दोन लहान स्वरूपामध्ये एफडी कराव्यात एफडी केल्यानंतर त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेतून लोन घ्यावे.एफडीवर जर तुम्ही पैसे काढले तर अशा प्रकारे तुमचे कर्ज बँकेत सुरु होते व लवकर तुमच्या सिबिल स्कोर अपडेट होतो व तो सुधारण्यास मदत होते.